जात वैधता प्रमाणपत्र चा आग्रह न धरता महाविद्यालय मध्ये प्रवेश देण्यात यावा - मा. उच्च न्यायालय
शिर्डी
State Common Entrance Test यांनी घेण्यात आलेल्या सन २०२४-२०२५ च्या विधी शाखा प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रवेशाची अंतिम तारीख २९/०८/२०२४ होती आणि प्रवेशा करिता जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधन कारक आहे असे CET कडून notice द्वारे सांगण्यात आले. जात प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यत येईल, परंतु राज्य सरकार यांच्या २२/०७/२०२४ च्या GR मध्ये असे नमूद आहे कि “उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.” या मुद्द्यांना अनुसरून ॲड. ऐश्वर्या राजेश डांगळे हिने आपली लहान बहिण कु. पूर्वा राजेश डांगळे हिच्या प्रवेशा करिता ॲड. अमर अशोक घरटे यायच्या मार्फत मा. उच्च न्यायालयात Writ Petition No. 12207 of 2024 दाखल केली. सदर प्रकरणात वरिष्ठ वकील ॲड. किशोर पाटील, ॲड. अमर अशोक घरटे आणि ॲड. अशोक कदम यांनी युक्तीवाद केला असुन मा. उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निकालात कु. पूर्वा राजेश डांगळे यांना जात वैधता प्रमाणपत्र चा आग्रह न धरता नरहर बळवंत ठाकूर विधी महाविद्यालय मध्ये प्रवेश देण्यात यावा व समाज कल्याण यांना ४ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थिनीला देण्यात यावे असा आदेश दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा