नामदार विखे पाटील यांच्या सहकार्याने साकुरीत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज स्वीकृति प्रारंभ
राहता - प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी हातावर काम करणारे कारागीर यांचे साठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नुकतीच सुरू केली आहे या योजने अंतर्गत कारागिराणा रुपये एक लाख पर्यन्त अर्थसंहाय तसेच शिलाई मशीन साठी महिलाना रुपये पंधरा हजार पर्यन्त अर्थ सहयाय देण्यात येणार आहे या योजने मध्ये सुतार,लोहार,सोनार,कुंभार,न्हावी,माळी ,धोबी,शिंपी,गवंडी,चर्मकार,असरकर,अवजार बांधणारे,खेळणी बांधणारे,कुलूप बांधणारे,विणकर कामगार,यांना आपला व्यवसाय वाढ करणे साठी शासकीय बँक मार्फत अर्थसाहाय करण्यात येणार आहे या योजनेचा अर्ज स्वीकृति प्रारंभ आज साकुरी येथून करण्यात आला सदरील योजना जास्तीत जास्त महिलानी लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री ट्रस्ट च्या संचालिका वनिता जाधव व साकुरी च्या सरपंच मेघना दंडवते यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा