सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा






धनगरवाडी  तालुक्यातील 
जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे 78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      सर्वप्रथम जि.प.शाळा धनगरवाडी येथून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा,भारत देशाचा जयजयकार यामुळे वातावरण प्रसन्न बनले.
     ग्रामपंचायत कार्यालय धनगरवाडी येथे धनगरवाडी गावचे सरपंच गोपीनाथ खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ग्रामपंचायत येथून प्रभातफेरी जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे आली. सर्व पदाधिकारी,ग्रामथ व पालकवर्ग शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित झाले.
      शाळेचे मुख्याध्यापक शरद होडगर सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.धनगरवाडी गावचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव राशिननकर यांची निवड करण्यात आली.माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजू रक्टे, अशोक रक्टे,गणेश राशिनकर,माजी उपसरपंच अनिल रक्टे, रंगनाथ राशिनकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र भोंडे, उपाध्यक्ष गणेश राशिनकर,पत्रकार बाबासाहेब मंडलिक,अंबादास रक्टे, संजय राशिनकर,दिगंबर रक्टे, प्रकाश लांडे,चंद्रभान रक्टे, हरिभाऊ रक्टे, सोपान आदमाने,संभाजी आदमाने,ग्रामविकास अधिकारी सरला कहार मॅडम आदि प्रमुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत धजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
     शाळेतील विद्यार्थिनी कु.सायली रक्टे व धनश्री राशिनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.बालचित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर क्रमांक मिळविल्याबद्दल अथर्व गीताराम आदमाने यास चित्रकला सेट बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले.पालकांच्या वतीने उपाध्यक्ष गणेश राशिनकर,उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विविध उपक्रम,गुणवत्ता याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
    कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.शिक्षक बंडू कोरडे यांनी आभार मानले.ग्रामपंचायत धनगरवाडी यांनी विद्यार्थ्यांना खाऊची व्यवस्था केली.संपत रक्टे, नानासाहेब रक्टे, संजय राशिनकर,संपत भुसारी यांनी  खाऊसाठी सहकार्य केले.
     कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षक विजय जगताप,किशोर जगताप,अनिल धिरडे,गीता गलांडे,विवेक मोरे,अंगणवाडी ताई मंदाबाई रक्टे, वैशाली आदमाने ,ग्रामपंचायत कर्मचारी विलास साळुंके तसेच मदतनीस इंदूबाई बागडे,कविता माळी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...