शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण पूरक "बाप्पा माझा मातीचा" कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर: येथील महिला मंडळ संचालित शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा येथे दि. १७ रोजी पर्यावरण पूरक "बाप्पा माझा मातीचा" कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत एकूण ८८ गणपती तयार करण्यात आले. या कार्यशाळेचे वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षीप्रमाणे शाडू माती पासून गणपती न बनवता साध्या बागेतील मातीपासून गणपती बनवण्यात आले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती टाकळकर ,पर्यवेक्षिका माधवी जंगले, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख मनीषा आदमने, सुरेखा जोनवाल आदींनी मेहनत घेतली. कार्यशाळेसाठी दीपशिखा फाउंडेशन च्या मनिषा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा