शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार ' गोरक्ष नेहे पाटील यांनप्रदान

' पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार ' गोरक्ष नेहे पाटील यांनप्रदान



शिर्डी 

महामहिम राज्यपाल यांच्या वतीने देण्यात येणारा 'विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार' संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील गोरक्ष नेहे पाटील यांना देऊन गौरविण्यात आले.
   अहमदनगर जिल्हा मुख्यालय येथे संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्या चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या वतीने राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे प्रमुख उपस्थिती  पोलीस पाटील गोरक्ष रामनाथ नेहे यांना पोलीस पाटील म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्काराने गौरविण्यात आले.
        यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
        गोरक्ष नेहे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सेवाकाळात गावामध्ये लोककल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनाच्या अनेक योजना गावपातळीवर लोकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहचवून त्यांची अंमलबजावणी केली आहे. ई पीक पाहणी प्रकल्प गावात यशस्वी केला, महसूल व कृषी विभागाच्या अनेक जनकल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. पाणी फाउंडेशन  लोकचळवळीच्या माध्यमातून जलसंधारणचे मोठे काम उभे केले, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, ग्रामविकास याचबरोबर गावात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी कार्य केले. कोविड च्या काळात गाव सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. पोलीस पाटील म्हणून करत असलेल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही अत्यंत प्रभावी कार्य करत आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...