गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा प्रमुख भारती दीदी व पद्मा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा

संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा प्रमुख भारती दीदी व पद्मा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा


शिर्डी 

                          रक्षाबंधन सणानिमित्त हाताला बांधला जाणारा स्नेहधागा अर्थात राखी ही बहीण भावांच्या सर्वश्रेष्ठ नात्याचे प्रतीक असून हा स्नेहाचा धागा बहिणींना जिव्हाळा प्रेम आपुलकी जपण्यासाठी तर भावाला कर्तव्याची सुरक्षिततेची कायमस्वरूपी आठवण व जाणिव ठेवण्याकरिता पवित्र बंधन रुपी असतो असे प्रतिपादन शिर्डी येथील प्रजापिता ईश्वरीय विद्यालयाच्या योगिनी दीदी यांनी केले आहे.
       राखी पौर्णिमा सणानिमित्त प्रजापती ईश्वरीय ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने सर्वत्र रक्षाबंधन सन साजरा केला जातो.संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या प्रमुख   भारती दीदी. व पद्मा दीदी. यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी केंद्रातील योगिनी दीदी यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार निस्सीम साईभक्त रमेश भाऊ गोंदकर या सर्व बांधवांना आत्मिक स्मृतीचे तिलक लावून रक्षाबंधनाचा स्नेहाचा धागा बांधला योगिनी दीदींनी सर्व बांधवांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी साईबाबा चरणी प्रार्थना केली शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करताना आपल्या संस्कृतीत  रक्षाबंधन चे असलेले विशेष महत्त्व यावेळी योगिनी दीदी यांनी विशद केले सर्व बांधवांना स्नेहाच्या धाग्या बरोबरच ईश्वरीय शिवबाबा ची प्रतिमा भेट स्वरूपी देण्यात आली .या राखी बंधन सोहळ्याप्रसंगी बोलताना शिर्डी शहरातील धार्मिक व सामाजिक कामात  अग्रेसर असलेले रमेश भाऊ गोंदकर म्हणाले की आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे प्रत्येक सण व उत्सवाचे एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व व पावित्र्य आहे याचे महत्त्व आपणास संत महंत साध्वी यांच्या कडून तसेच कुटुंबातील ज्येष्ठां कडून समजते रक्षाबंधन हा सण बहिण भावाचे अतूट बंधन व नाते जपणारा धागा आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या माध्यमातून योगिनी दीदी व ओम शांती परिवार अध्यात्मिक संस्कृती व संस्कार रुजविण्याचे पवित्र कार्य करताहेत प्रत्येक सणावाराचे महत्त्व व अनमोल विचार या संस्कारा द्वारे ओम शांती परिवार देशभर देत आहेत ही आपणा सर्वांचे तसेच राष्ट्रहित व भारतीय संस्कृतीचे दृष्टीने महत्त्वाची बाब आहे धर्म कार्यास वाहून घेतलेल्या तपस्वी साध्वीं भारती दीदी. पद्मा दीदी .योगिनी दीदी. यांच्या शुभहस्ते आशीर्वाद रुपी स्नेहाचा धागा मिळाला हे  आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार मोठे भाग्य लाभले असल्याचे रमेश भाऊ गोंदकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...