शिर्डीत मंगळवारी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
शिर्डी
मंगळवारी गोपाल काल्यानिमित्त जागृती युवक मंडळाच्यावतीने मानाची दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस मिळवणाऱ्या स्पर्धकांना १ लाख ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्सवासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने भरघोस सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये शिर्डी शहरातील व पंचक्रोशीतील सर्व कलाकारांना स्टेज उपलब्ध असणार आहे. महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. लकी ड्रॉ विजेत्या महिलेस प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्याकडून सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. द्वितीय लकी ड्रॉ विजेत्या महिलेस माजी उपनगराध्यक्ष गोपिनाथ गोंदकर यांच्यावतीने पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे व तृतीय लकी ड्रॉ विजेत्या महिलेस भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विकास गोंदकर यांच्या वतीने गॅस शेगडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरूष प्रेक्षकांसाठी लकी पुरूषास युवा शिर्डीचे किरण कोते यांच्यावतीने रेंजर सायकल, कॉर्ड डान्स स्पर्धेत तिन्ही क्रमांकासाठी माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांच्यावतीने ५ हजार द्वितीय बक्षीस ३ हजार व तृतीय बक्षीस २ हजार देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील पात्र भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जागृती युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय कोते, रावसाहेब देशमुख, उपाध्यक्ष कैलास भुजबळ, रुपेश देवकर, पांडुरंग गिरी, ज्ञानेश्वर जगदाळे, राहुल देशमुख, सुरेश सोनवने, सुनील देशमुख, त्रंबक मोहीते, दामोधर उमाप, कुणाल सांबारे, सचिन देशमुख, भिमा गाजरे, विशाल गुलदगड, दीपक शेलार, हरिभाऊ पाटोळे, संपत हतांगळे, प्रशांत ठोंबरे, गोरख पवार, ज्ञानेश्वर पवळे, महेश गायकवाड, सनी देशमुख, प्रसाद देशमुख, साई सोनवणे, किरण गुलदगड, यश कोते, मिरा वर्मा आदी प्रयत्नशिल आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा