सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेत शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्न सेवा ट्रस्ट काशी व शिर्डी यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेत शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्न सेवा ट्रस्ट काशी व शिर्डी यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप




रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेश नगर शाळेत दिनांक 16 ऑगस्ट रोजी शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्नसेवा ट्रस्ट काशी आणि शिर्डी यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. या ट्रस्टचे प्रमुख श्री धनशेखरन  व एन आदर्श यांनी प्रथम या सेवाभावी संस्थेची माहिती दिली हे ट्रस्ट शिर्डी येथे रोज अन्नदान कार्यक्रम चालवते तसेच परिसरातील शाळांनाविविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटपही करते या उपक्रमाचे गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अनिल काका गाढवे, स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब पांडुरंग गाढवे, श्री अण्णासाहेब कोते , श्री दादासाहेब गाढवे, श्री जयाभाऊ कालेशेठ ,श्री गणेशभाऊ गाढवे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के .के.सर यांनी कौतुक करून अभिनंदन केले. श्री धनशेखरन यांनी भविष्यात विद्यालयासाठी आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्कूल बॅग व मिष्टान्न भोजन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकांनी प्रयत्न केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...