संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४
आज संपूर्ण नगरपरिषद व नगरपंचायत मधील सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी बेमुदत संपावर
आज संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत मधील सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्याने येऊ घातलेली यूपीएस लागू असताना राज्यातील सुमारे 6000 संवर्ग अधिकारी व 60000 पेक्षा जास्त नपा कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील कित्येक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मयत पावले त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही. त्याचप्रमाणे एका बाजूला नगर विकास विभाग संवर्ग अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचारी नाहीत असे घोषित करून सेवार्थ आयडी देण्यास नकार देत आहे.तसेच इतरही मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत.अशा परिस्थितीत राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष पसरल्याने आज नाईलाजाने संपावर जावे लागत आहे. त्यामधे राहाता नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचारी या संपात आजपासून सहभागी होवुन राहाता नगरपरिषदे समोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अखत्यारीत नगर विकास विभाग येत असल्याने नक्कीच कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील असा कर्मचाऱ्यांना विश्वास आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा