बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन साजरा

साईसेवा मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन साजरा



शिर्डी प्रतिनिधी 

   आज दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थिनींकडून शिर्डी परिसरात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. 
    रक्षाबंधन म्हणजे रक्षण करण्याचे बंधन .रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण मराठी महिन्याच्या श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचेच औचित्य साधून साईसेवा मतिमंद विद्यालयातील विद्यार्थिनींकडून शिर्डी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचे औक्षण करून राखी बांधण्यात आली. 
   त्यामध्ये शिर्डी विभागाचे खासदार श्री भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम माजी नगराध्यक्ष श्री कैलास बापू कोते साहेब, पुढारी वृत्तपत्र शिर्डी पत्रकार श्री प्रवीणजी टाटू, रोटरी क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष श्री निलेशजी गंगवाल व संचालक, शिर्डी नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी श्री दिघे साहेब, शिर्डी नगरपंचायत शिर्डीचे नगराध्यक्ष श्री शिवाजीभाऊ गोंदकर, शिर्डी प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ यादगुडे व दिव्यांग बांधव, नगरसेवक नितीनभाऊ कोते, अशोकभाऊ गोंदकर तसेच हॉटेल साईदीप विलासचे मालक व पंचमुखी गणपती मंदिराचे ट्रस्टी श्री एच. पी. शर्मा साहेब, श्री बस स्थानक व्यवस्थापक व विभाग, साईबाबा स्तवन मंजिरी पठण करणारे सर्वेसर्वा शिर्डीतील डॉ. धनंजयजी जगताप, साई सेल्स कार्पोरेशन मालक श्री कमलेशजी धाडीवाल साकुरी (राहाता) या सर्वांचे निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन साजरे करण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
    हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर, कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर तसेच श्री शंकर सोनवणे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...