सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

वाकडी शिव येथे अखंड हरिनाम सप्ताह


वाकडी शिव येथे अखंड हरिनाम सप्ताह


धनगरवाडी 

तालुक्यातील वाकडी खंडोबाची, राजुरी ममदापूर शिवावर  चालू होणारा अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज व समर्थ किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह वर्षा 53 वे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण तसेच  महादेव मंदिर जीर्णोद्धार, श्री गणेश, शिवलिंग पिंड, नंदी, कासव, शिवाआई स्थापना सोहळा  शनिवार दिनांक २४/८/२०२४ते शुक्रवार दिनांक ३०/८/२०२४ पर्यंत २४/०८/२०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता ह. भ. प. रावसाहेब बाबा शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आहे .किर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प. सुनील महाराज कोळपकर.  ह.भ.प. अमोल महाराज गाढे. ह.भ.प. मीराताई वाघचौर. मंगळवार दिनांक २७/८/२४ रोजी भेट प.पु. महंत रामगिरीजी महाराज (मठाधिपती गोदावरी धाम सराला बेट) यांची कार्यक्रमाला नंतर शिवशाहीर ह.भ.प.शरद महाराज ढवळे बुधवार दिनांक २८/८/२०२४ रोजी महंत भास्करगिरीजी महाराज क्षेत्र देवगड भेट महंत  राजेश्वगिरीजी महाराज यांच्या दोघांच्या हस्ते शिवलिंग पिंड स्थापना नंतर ह.भ.प.सुरेखाताई साखरे शुक्रवार ३०/८/२०२४ सकाळी ९ ते ११ ग्रंथ मिरवणूक होणार आहे महंत राजेश्वगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यांनंतर महाप्रसादाचे पंगत होईल या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे पंचकोशीतील भजनी मंडळ वाकडी धनगरवाडी, नांदुर, लांडेवाडी, यादव मळा, जळगाव, चितळी, पांढरी वस्ती शेळके वस्ती, जाधव वस्ती, काकडा आई, सावता महाराज भजन मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, खंडोबा वाडी भजनी मंडळ, रामेश्वर भजनी मंडळ, डीजे रस्ता भजनी मंडळ या परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे. ठिकाण :- श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर वाकडी खंडोबाची. राजुरी ममादापुर शिवेवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...