एकरूखे येथे ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगता
एकरुखे येथिल सात दिवसीय साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता वरद विनायक सेवाधाम लोणी संस्थानचे ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली यावेळी पारायणार्थीं व ग्रंथाची गावातुन ढोल ताश्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणुक काढण्यात आली होती यावेळी मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली, काल्याच्या किर्तनात उध्दव महारांजानी बोलतांना सांगितले की ज्ञानेश्वर माऊलींपासुन आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच साधु संतानी समानतेची जपवणुक करण्याची शिकवण दिली आहे, साई बाबांनी श्रद्धा सबुरी आणि सबका मलिक एकचा मुलमंत्र दिला, आपण सामाजिक राजकीय व धार्मिक किंवा अन्य कोणत्याही क्षेञात काम करतांना सर्व जाती धर्मातील घटक एकच आसुन कोणीही लहान मोठा असा भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केल्यास परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळाल्या शिवाय राहणार नाही, त्याच बरोबर पारायणार्थींनी देखिल पारायणाचे सात दिवस मनोभावे वाचन केले त्यांना देखिल साईंची नक्कीच चांगली अनुभूती मिळेल असे सांगितले. तर यावेळी सुजयदादा विखे पाटील यांनी बोलतांना सांगितले की आज एकरुखे येथे काल्याच्या किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगाता आसल्याने एकरुखेसह परिसरात जोरदार पाऊस पडुन ओढे नाले भरभरुन वाहावेत अशी माता वज्रेश्वरी व साई चरणी प्रार्थना करतो असे म्हणाले, सात दिवसाच्या महाप्रसादासाठी ललित मुनावत, विलास सातव अजय बिलबिले, योगेश सापिके, आकाश कार्ले, जगन्नाथ सोनवणे, संदीप आग्रे या मान्यवरांनी अन्नदान केले, पारायणच्या उत्कृष्ट नियोजनासाठी जितुभाऊ मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, जालिंदर गाढवे, गोरक मोटे, विलास सातव, हर्षल सातव मिनिनाथ आग्रे, शिवाजी भवर, उमेश आग्रे, गोरक बोर्डे, देवेंद्र भवर, नवनाथ शेळके, शंकर कुऱ्हाडे, रवींद्र गायधने, अमोल तागड, कृष्णा जाधव, डॉ.संतोष भवर, बाळासाहेब सापिके, गोरख खिलारी, भाऊसाहेब गाढवे, बाबासाहेब महाराज गाढवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा