शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

उद्योजक दिपक निकम यांची रुग्णाला ६० हजाराची मदत

उद्योजक दिपक निकम यांची रुग्णाला ६० हजाराची मदत





शिर्डी प्रतिनिधी 

शिर्डीचे हॉटेल व्यावसायिक व उद्योजक 
व एम डी एब्बिगेल रिजेंसी प्रा लि: युनिट ऑफ गोराडीयाज , शिर्डी चे संचालक दिपक निकम यांनी  श्री साईबाबांच्या शिकवणी  प्रमाणे आरोग्य सेवा करत  लासगाव तालुक्यातील  पाचोरा येथील  नितीन गुलाबसिंग पाटील या रुग्णाला    ६० हजार रुपयांची मदत करत त्यांनी सामजिक भान जपत मदतीचा हाथ पुढे केला आहे. नितीन पाटील हे ८ ते १० दिवसांपासून दुर्धर आजाराने  होवून ब्रेन हैमरेजने त्रस्त झाले होते . यावेळी त्यांची घराची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्यांचे परिवाराला खर्च करणे शक्य नव्हते. यावेळी काही गावकऱ्यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दिपक निकम यांना संपर्क केला असता तत्काळ विचारणा करून सदर पेशंटचे नातेवाईकांना पेशंटचा खर्च म्हणून ६० हजार रुपयांची मदत करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे एकीकडे समाजात माणुसकी विरळ होत असताना निकम यांनी समाजासमोर हा एक मदतीचा आणि एकमेकांना सहकार्याचा पायंडा जणू त्यांनी पाडला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यानी या अगोदर देखील सामाजिक सांस्कृतिक अनाथ वयोवृद्ध निराधार साईभक्त गरजवंतांना अडचणीच्या काळात मदत करून सामाजिक दातृत्व निभावलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...