सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

साईसेवा मतिमंद विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान





शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

      आज दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी व साईसेवा टिचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२४ या निमित्ताने नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम घेण्यात आला.
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात नशा मुक्त भारत प्रतिज्ञा (शपथ) घेण्यात आली. व शिर्डी शहरात विद्यालय व ट्रेनिंग सेंटरच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. साईसेवा टिचर ट्रेडिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून नशा मुक्त भारत अभियान पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.       
        हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले  मॅडम व मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...