बुधवार, ३१ जुलै, २०२४

शिर्डीतील सर्कल रोडला जो चौक निर्माण झाला त्या चौकास क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे सर्कल हे नाव द्यावे - मुख्याधिकारी सतीष दिघे यांना निवेदन


शिर्डीतील सर्कल रोडला जो चौक निर्माण झाला त्या चौकास क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे सर्कल हे नाव द्यावे - मुख्याधिकारी सतीष दिघे यांना निवेदन

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )


    आज शिर्डी येथील लो.आण्णाभाऊ साठे नगर ते बिरोबा रोड येथील बायपास रोड लगत जो चौक निर्माण झाला त्या चौकास क्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याबाबत मा. मुख्याधिकारी दिघे साहेब यांना निवेदन दिले,त्यात रोड पूर्ण झाल्यावर लगेच करू असे आश्वासन त्यांनी दिले,या निवेदन देताना, शिर्डीतील युवक मोठ्या संख्येने हजर होते,त्यात,सुरेश आरने,शिवाजी आर ने,शिवाजी भोडगे,मनोज नवगिरे,किशोर हतांगळे,गणेश गायकवाड,विलास नाटकर, अजित साठे, गोरख पावशे, सचिन बोरगे, आकाश जगताप, चंद्रकांत गायकवाड, विलास आरणे, सागर आर्मी, आकाश शेजवळ, आकाश आरणे, साई शेलार, अनिल आरणे, चंद्रकांत गायकवाड, भाऊसाहेब रोकडे, नंदू कांबळे, सतीश पगारे, रोहित बंदरे, प*** *खरात, विलास आरणे, सागर आरणे, पिनू आरणे, आदित्य आरणे, रोहित आरणे, भूषण* *आरने, ज्ञानेश्वर हातांगळे, अनिल आरणे, संतोष भोंडगे, भगवान चव्हाण, विजय गायकवाड, नवनाथ गायकवाड, पवन वीर, नितीन काकडे*, *साई सोळशे, साई आरणे, अंबादास मनगरे, ऋषिकेश आरणे, सनी उमाप, राजू अहिरे, योगेश आरणे, साईप्रसाद आरणे,सनी आरणे, सचिन आरणे, राजू वाघ, सुनील आरणे, नितीन पेटारे,आकाश आरणे, चंद्रकांत खरात, रुपेश आरने, अनिल साठे, किरण आरणे, पोपट खरात, गणेश आरने, अमोल धोतरमल,आधी कार्यकर्ते हजर होते.

मंगळवार, ३० जुलै, २०२४

कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार

कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार

शिर्डी प्रतिनिधी :

कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा जाधव, संपत भोर, विद्यार्थी वेदीका विवेक वाकचौरे ,ज्ञानदा प्रशांत वाकचौरे,गौरी विष्णू वाकचौरे,अरूधंती सुहास कातोरे,पूर्वा विकास वाकचौरे, विराज जयराम वाकचौरे,ईश्वरी प्रशांत हुजबंद,यश योगेश वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थी
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोन्याबापू वाकचौरे गुरुजी हे होते. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर साखर कारखाने संचालक संभाजी वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे, डी. टि.वाकचौरे, माजी सरपंच यादव वाकचौरे आदि उपस्थित होते.
  यावेळी विद्यार्थ्यांना रामनाथ वाकचौरे सर व महेश वाकचौरे यांच्या वतीने अकराशे रुपये, एन. आर. वाकचौरे सर व किसनराव वाकचौरे सर यांनी रुपये दोनशे बक्षीस,कॉम्रेड गंगाधर नाना मोहिते बहुउद्देशीय सेवा भावी संस्था राजापूरयांच्या वतीने ट्रॉफी, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, शिक्षण समितीचे सदस्य इमरान शेख यांनी स्कूल बॅग व प्रकाश आल्हाट पेन, अशोक ढगे गुरुजी छत्री, भाऊसाहेब धोंडीबा वाकचौरे वृक्ष देण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर सूत्रसंचालन योगेश थोरात यांनी केले. आभार स्वप्ना गुरव यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे उपाध्यक्ष सारीका चौधरी मनीषा वाकचौरे सुवर्णा ढगे शाळेतील शिक्षक माधवी गोरे, बाळासाहेब शिंदे, बाळू चौधरी, पुष्पा सूर्यवंशी, वृषाली बर्वे, हर्षल सोनवणे, यासिर सय्यद यांनी प्रयत्न केले.

परमार्थ हा अंतरंगातून असला पाहिजे- महंत स्वामी रामगिरीजी महाराज

परमार्थ हा अंतरंगातून असला पाहिजे- महंत स्वामी रामगिरीजी महाराज .

 धनगरवाडी =

    योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन महंत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, वै. सदानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच प. पू. महंत रामगिरीजी महाराज (मठाधीपती गोदावरी धाम सरला बेट) यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने.
 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष ४४ अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी येथे संपन्न झाला. याप्रसंगी परमार्थ हा अंतरंगातून असला पाहिजे, असे प्रतिपादन महाराजांनी केले .काल्याच्या किर्तन सेवे करिता गवळण
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥ काला वांटूं एकमेकां ।
 वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥ वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥
 तुका म्हणे भूमंडळीं ।आम्ही बळी वीर गाढे ॥३॥ या गवळणीवर ते बोलत असताना महाराजांनी भगवान कृष्णाच्या लीलाच वर्णन केलं.भगवंताने कुणाकुणाचा उद्धार केला, याचेही वर्णन महाराजांनी केले. याप्रसंगी बोलत असताना महाराजांनी सांगितले की ,परमार्थ हा अंतरंगातून असला पाहिजे. परमार्थ करत असताना मतभेद व षदविकार बाजूला सारले पाहिजे.
व्यासपीठ चालक अशोक महाराज ठेंग, रोजचे कीर्तनकार शिवाजी महाराज खोचे,विजयानंदगिरीजी महाराज, दत्तात्रय महाराज रक्टे, सुदाम महाराज कातकडे, हरीशरणगिरीजी महाराज,अर्जुनगिरीजी महाराज,आदित्य महाराज आदमाने, मधुकर महाराज, सराला बेटाचे चोपदार जानकिराम नाना आदमाने, चंद्रकांत महाराज रक्टे या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. बाळासाहेब लहारे, गायनाचार्य वैभव भराडे, दादाभाऊ तोडमल,संदीप गायकवाड, रामभाऊ नादिक,मृदंगाचार्य महेश आदिक ,भरत डोखे, डॉ विजय कोते, माननिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित दादा वाकचौरे यांनी भेट दिली. वाकडी शिवसेना शाखाप्रमुख मच्छिंद्र भवार, धनगरवाडी शाखाप्रमुख अमोल साखरे, पत्रकार बाबासाहेब मंडलिक, अंबादास उघडे , शिवसेना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष राधाकिसन बोरकर, धनगरवाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल रक्टे, किरण शेळके, संजीव ढोकचौळे, ज्ञानेश्वर ढोकचौळे, मधुसूदन महाराज,नंदलाल महाराज, ज्ञानेश्वर महाराज, रामभाऊ महाराज, वैभव भराडे ,केरू रक्टे , विठ्ठलराव राशिनकर यांचे घरी ज्ञानेश्वरी ग्रंथ हरिपाठ या अमृत भाव चांगदेव पासष्टी या हस्तलिखित ग्रंथाचे पूजन गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. धनगरवाडी परिसरातील दिघी वाकडी जळगाव ,चितळी, खैरी निमगाव ,खंडाळा, गोंधवणी ,नांदूर, श्रीरामपूर सूतगिरणी ,लांडेवाडी, पुणतांबा ,गोंडेगाव ,बेलापूर ,शिरसगाव इत्यादी ठिकाणावरून भजनी मंडळ व भाविक गायक वृंद वादक रुंद व गुणीजन भजनी मंडळ व धनगरवाडी भजनी मंडळ,तरुण मंडळ यांनी अतिशय चांगले नियोजन केले. कीर्तनानंतर महाप्रसादाची पंगत झाली .

सोमवार, २९ जुलै, २०२४

जीवनात सातत्य ठेवल्याने यश मिळते -विजय साळवे


जीवनात सातत्य ठेवल्याने यश मिळते -विजय  साळवे

शिर्डी प्रतिनिधी : 

जीवनात सातत्य ठेवा विजय साळवे 
अ नगर: विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा कोणताही उपक्रम करताना त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे तरच जीवनात यश मिळते असं प्रतिपादन माजी सैनिक विजय साळवे यांनी केले 

श्रीमती अॅबर्ट विद्यालय भिंगार येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

श्री साळवे म्हणाले कि,सैनिक देशासाठी खूप अनमोल असून सैनिक 
हे देशाची शान आहे सैनिकांचा आदर कायम स्वरूपी असावा
व्यक्त केली
  सैनिक हा देशाचा महत्त्वाचा घटक असून सैनिकांना देशासाठी खूप त्रास सहन करावा लागतो विद्यार्थ्यांनीही सैनिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्राचार्य तोरणे म्हणाले की,सैनिकांमुळेच आपणास सुरक्षित आहोत सैनिक देशाचा प्राण आहेत विद्यालयाच्या वतीने सैनिकांना आम्ही वंदन करतो . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्वर सरांनी केले तर आभार एसपी खंडागळे मॅडम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताराबाई ची साडी ठरली जीवनाची दोरी...नदीपात्रात बुडणाऱ्या दोघांचे वाचवले प्राण....


ताराबाई ची साडी ठरली जीवनाची दोरी...
नदीपात्रात बुडणाऱ्या दोघांचे वाचवले प्राण....

शिर्डी =.राजेंद्र दूनबळे 

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात असलेल्या आपल्या विद्युत मोटारी वरती काढत असताना पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यामुळे त्या प्रवाहात संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण वाहून जात असताना शेजारी शेळ्या चारणाऱ्या ताराबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीसाठी धावून आले. ताराबाईने प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरील साडी क्षणार्धात सोडून ती बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली त्या साडीच्या साह्याने त्यातील दोन तरुणांना वाचवण्यात यश आले परंतु संतोष भीमाशंकर तांगतोडे वय वर्ष 25 या तरुणाचा दुर्दैवी बुडून अंत झाला. ताराबाईच्या चेहऱ्यावरती दोघांना वाचवल्याचा आनंद तर दिसतोच परंतु एकाला वाचू शकले नाही याचे दुःख व्यक्त करताना ती धाय मोकलून रडते. दोन तरुणांना जीवदान देणाऱ्या अशा या शूरवीर मातेच्या शौर्याचे कौतुक करून तिचा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी सत्कार केला. ताराबाई या आदिवासी महिलेची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून तिला राहायला चांगल्या प्रकारे घर नाही. शासनाकडून तिला आर्थिक मदत व शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी व्यक्त केली.

आयडीएफसी बँकेची पहिले एटीएमची शिर्डीतून सुरुवात


आयडीएफसी बँकेची पाहिले एटीएमची शिर्डीतून सुरुवात

शिर्डी प्रतिनिधी : 

साई भक्तांच्या सुविधे साठी आयडीएफसी बँकेने शिर्डीतून आपल्या पहिल्या एटीएम सुरुवात करण्यात आलेली आहे साईभक्तांची खूप गैरसोय होत असल्यामुळे एटीएम साठी ग्राहकांना वणवण करावा लागत असल्यामुळे बँकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे तरी साई भक्तांनी व ग्राहकांनी एटीएम चा लाभ घ्यावा. पत्ता द्वारकामाईच्य समोर लक्ष्मीबाई शिंदे 9 कॉइन मंदिर जवळ ताजीमखान बाबा चौक शिर्डी येथे आहे.

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसा.लि, शिर्डीची वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसा.लि, शिर्डीची वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

शिर्डी प्रतिनिधी :

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे साई आश्रम नंबर दोन इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली उपस्थित सभासदांचे संचालक श्री रविंद्र बाबू गायकवाड यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व अध्यक्ष पदाची सूचना मांडली त्यास संचालक श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पाटील यांनी अनुमोदन दिले त्यानंतर विद्यमान चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले सभेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता विषय पत्रिकेप्रमाणे विषयांचे वाचन संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पाटील यांनी केले सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले सभेचे अध्यक्ष श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती श्री सुधाकर जी यार्लगड्डा साहेब, जिल्हाधिकारी माननीय श्री सिद्धराम सालीमठ साहेब आयएएस, तदर्थ समिती सदस्य तसेच माननीय श्री गोरक्ष गाडीलकर साहेब आयएएस मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय श्री तुकाराम हुलवळे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी मुख्य लेखाधिकारी सर्व विभाग प्रमुख त्याचप्रमाणे सर्व सभासदांचे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले सभेत सभासदांच्या हिताचे व संस्थेच्या हिताच्या अनेक विषयांवर चर्चा झाली संस्थेच्या इतिहासात तब्बल एकूण 20 विषयांवर चर्चा झाली त्यात अनेक मान्यवर सभासदांनी भाग घेतला त्यास दीपावली शिधावाटप मकर संक्रांत वस्तू वाटप मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा शिधावाटप तसेच संस्थेत शिर्डी शहरांचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामा सह जागा खरेदी करण्याचा विषय ही बहुमताने मंजूर झाला परंतु संस्थेचे अद्यावत नूतन कार्यालय उभारण्यास सभासद श्री प्रतापराव होते श्री वाल्मीक धरम श्री विजय डांगे श्री रवींद्र चौधरी श्री पांडुरंग धुमसे यांनी विरोध दर्शविला तर उर्वरित सर्व सभासदांनी बहुमताने शिर्डी शहराचे मध्यवर्ती ठिकाणी बांधकामा सह जागा खरेदी करून संस्थेचे अद्यावत कार्यालय उभारण्यास मंजुरी दिली याप्रसंगी सन 2023 - 24 करिता सभासदांचे शेअर्सवर 15% डिव्हीडंट देण्यास तसेच सभासद ठेवीवर नऊ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सर्वानुमते मान्यता दिली तर संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांचे संकल्पनेतून जामीनदार मुक्ती बाबत पहिले पाऊल म्हणून सर्व सभासदांचा नैसर्गिक मृत्यूचा विमा उतरविण्यात येऊन होणाऱ्या विमा हप्त्यापैकी 50% विमा हप्ता सभासदांनी तर उर्वरित 50 टक्के हफ्ता संस्थेने भरण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व सभासद व कर्मचारी यांना दीपावली 2024 निमित्त 50 किलो साखर पाच लिटर गोड तेल दोन किलो मिठाई व सप्रेम भेट वस्तू देण्यास या सभेने मान्यता दिली सभेस संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील व्हाईस चेअरमन श्री पोपटराव भास्करराव कोते पाटील संचालक श्री महादू बापूसाहेब कांदळकर श्री कृष्णा नाथा आरणे श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पाटील श्री संभाजी शिवाजी तुरकणे पाटील श्री देविदास विश्वनाथ जगताप श्री विनोद गोवर्धन कोते पाटील श्री मिलिंद यशवंत दुनबळे श्री तुळशीराम रावसाहेब पवार पाटील श्री रवींद्र बाबू गायकवाड श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पाटील श्री इकबाल फकीर महंमद तांबोळी श्री गणेश अशोक अहिरे सौ सुनंदा किसन जगताप पाटील सौ लता मधुकर बारसे पाटील श्री रंभाजी काशिनाथ गागरे श्री भाऊसाहेब भानुदास लबडे पाटील तज्ञ संचालक सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पाटील सहसचिव श्री विलास गोरक्षनाथ वाणी तसेच मोठा सभासद वर्ग उपस्थित होता सभेच्या शेवटी संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार पाटील यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल उपस्थित सभासदांचे आभार मानले.

रविवार, २८ जुलै, २०२४

प्रेरक व्यक्तिमत्व अक्षयजी महाजन..!जिवेत शरद शतम्!

प्रेरक व्यक्तिमत्व अक्षयजी महाजन..!

जिवेत शरद शतम्!

श्री अक्षय संजय महाजन आदर्श व्यक्तिमत्व....
यांचा आज जन्मदिवस प्रथमतः मनस्वी शुभेच्छा. शांतप्रिय तसेच नेहमी हास्यविनोद करणारे व्यक्तीमहत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिर्डीची संघटनात्मक ताकद उभी करून शिर्डीतील कॉलेज प्रश्नासाठी अविरत संघर्ष करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून शिर्डीत साई संस्थांनचे कॉलेज खेचून आणणारे विद्यार्थी नेतृत्व, एक समाजाभिमुख सुसंस्कृत व बाणेदार युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते, अक्षयजी महाजन यांना सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिर्डी शहर सहप्रमुख, त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख राहता तालुकाप्रमुख पदी त्यांनी काम केले. अ.भा.वि.प माध्यमातून संघटनेच्या बससेवेसाठी आंदोलन, शिर्डी वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने निवेदन दिले. व त्यांच्या कार्यास यश मिळाले. त्याचबरोबर शिबिर, रक्तदान, भव्य वृक्षारोपण, अनाथालय खाऊ वाटप, ४०१ फूट राष्ट्रध्वजाच्या यात्रा व युवा सांस्कृतिक महोत्सवचे असे अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या. अतिरिक्त शुल्क, मुलींसाठी बससेवा सुरू करणे, असे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम अक्षय भाऊ यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले. सामाजिक बांधिलकी असलेल्या व विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना आणि सर्व सहकारी यांच्या वतीने सदिच्छा.

लेखक आणि शब्दांकन
विशाल रायते,
पत्रकार दै. सकाळ

शनिवार, २७ जुलै, २०२४

बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबर सात नंबर फॉर्म वर शेती सिंचनाचे खरीप आवर्तन द्यावे

बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबर सात नंबर फॉर्म वर शेती सिंचनाचे खरीप आवर्तन  द्यावे

राहाता=

   पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी होत असताना ही राहाता तालुक्यात परिसरात अद्यापही रिमझिम पाऊस वगळता समाधानकारक मोठा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यासह नागरिकात चिंता व्यक्त केली जात असून गोदावरी कालव्यांना खरिपाची आवर्तनची मागणी गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातून होत आहे गोदावरीला दुसऱ्यांदा पाणी सोडल्याने गोदामाई दुथडी भरून वाहू लागली आहे गोदाकाठी समाधान व्यक्त केले जात आहे

पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहे. मात्र तालुक्यात तसेच राहता परिसरात मुसळधार पाऊस झालेला नसून ओढ, नाले वाहते झाले नसल्याने विहिरींच्या पाणीपातळीत ही वाढ झाली नाही. आठ दिवसांनी एखादा रिमझिम पाऊस हजेरी लावीत आहे. अपुऱ्या पावसावरच खरीप पिकांच्या काही प्रमाणात पेरण्या झालेल्या असून पेरण्या केलेले शेतकऱ्यासह नागरिक समाधानकारक मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा अकरा हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी आता दुथडी भरून वाहती झाली आहे. त्यामुळे नदीकाठ सुखावला आहे परंतु तालुक्यात पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली असून विहिरी, बोरवेल यांना पाणी उतरलेले नाही. जुन महिन्यातील झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कापूस, चारा पिकांची पेरणी केली आहे. परंतु जवळपास दीड ते पावणेदोन महिने पावसाने उघडी दिल्यामुळे सध्या उतरून पडलेली पिके पाण्याअभावी सुकून चालली आहे. गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातील फळबागा, ऊस या बारामाही पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने सध्या सुरू असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तना बरोबरच सात नंबर फॉर्मवर शेती सिंचनाचे खरीप आवर्तन देखील द्यावे अशी मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 
पुणतांबा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट यामुळे पाण्याखाली गेला आहे गोदामाई दुथडी भरून वाहती झाल्याने पुणतांबा परिसरातील नदी काठावरील गावांना मोठा फायदा होणार असून तसेच धाकट्या आषाढी एकादशीला पुणतांबा येथे मोठ्या संख्येने भाविक संत चांगदेव महाराज यांच्या दर्शनासाठी व गंगा स्नानासाठी येत असतात. गोदामाईच्या पाण्यात पवित्र स्नानाची परवणी यामुळे साधता येणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

लायन्स क्लब च्या वतीने हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या 6 मुलींना नवीन ड्रेस, खाऊ व शाळाउप्योगी वस्तू देऊन वाढदिवस साजरा

लायन्स क्लब च्या वतीने  हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या 
 6 मुलींना नवीन ड्रेस, खाऊ व शाळाउप्योगी वस्तू देऊन वाढदिवस साजरा

राहाता=
लायन्स क्लब च्या टेमर लायन आसावरी बेंद्रे यांचे 
चि.अविश विशाल बेंद्रे याच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब राहाता यांचे सहकार्याने क्लबचे टेमर लायन सौ, आसावरी बेंद्रे 
यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला सेंट जॉन स्कूल 
येथील हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या 
 6 मुलींना नवीन ड्रेस, खाऊ व शाळाउप्योगी वस्तू देऊन व 2 आंबा वृक्षाचे वृक्षारोपण करून त्या मुली सोबत वाढदिवस साजरा केला यासाठी बेंद्रे काका व त्यांचे सर्व कुटुबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते
राहाता लायन्स क्लबच्या वतीने प्रत्येक लायन्स सभासद यांचा वाढदिवस घरी साजरा न करता गरजू मध्ये जावून साजरा करण्याचे ठरले आहे,त्यामुळे सर्व एकत्र येतात विचाराची देवाणघेवाण होते, लायन्स क्लबचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन प्रकशजी सदाफळ,डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ,संजय उबाळे यांच्या पुढाकाराने वाढदिवस साजरा केला, झाडे लाऊन नवीन पायंडा पडला आहे,त्यामुळे प्रत्येकाने वर्षभर आपल्या घरातील सभासद यांच्या वाढदिवशी एक तरी झाड लावण्याची लायन्स सभासद यांना विनंती केली व सर्वांनी मान्य करून घरी साजरा न करता गरजू लोकांना,गरजू मुले व मुली यांना मदत करण्याचे ठरले आहे, फादर पॉली यांनी अविश बेंद्रे साठी प्रार्थना केली व त्याला शुभेच्छा देऊन वाढदिवस या मुलीसोबत साजरा केला म्हणून लायन्स क्लब राहता चे कौतुक करून असेच सामाजिक कामे करून एक आदर्श निर्माण केला आहे, प्रत्येकाने आपले दातृत्व दाखवण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मोठेपणा बेंद्रे कुटुंबाने दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानले
या कार्यक्रमासाठी फादर पॉली डिसिल्वा, फादर आनंद बोधक, फादर जॉन गुलदेवकर, सिस्टर एलिझाबेथ फर्नांडिस सिस्टर
प्रियांका, सिस्टर वर्षा त्रिभुवन
रवींद्र गायकवाड सर,लायन्स क्लब च्या मा. अध्यक्षा अंजली उबाळे ट्रेजरर व्यंकटेश अहिरे.सेक्रेटरी लायन ऍड दिनेश कारले, लायन विजय धनवटे लायन्,राजेंद्र बांगर उपाध्यक्ष,पत्रकार राजुभाई पठाण,लायन सरला तायडे , सौ .मंडलिक मॅडम,प्रकाश बेंद्रे,संजय वाघमारे,हरीश श्रीखंडे, रोहम काका, सोहन उबाळे व सर्व बेंद्रे फॅमिली तील सभासद हजर होते 
रवी गायकवाड सर यांनी आभार मानले

शिर्डी वि का स सोसायटी शिर्डीचे नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी गोंदकर व व्हा चेअरमन बाळासाहेब काटकर यांचा सत्कार


शिर्डी वि का स सोसायटी शिर्डीचे नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी गोंदकर व व्हा चेअरमन बाळासाहेब काटकर यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी वि का स सोसायटी शिर्डीचे नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी आप्पासाहेब गोंदकर व व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर यांचा सत्कार करताना श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते तसेच संचालक देविदास जगताप, इकबाल तांबोळी, मिलिंद दुनबळे, विनोदजी कोते, तुळशीराम पवार, गणेश आहिरे, भाऊसाहेब कोकाटे, कृष्णा आरणे, रवींद्र गायकवाड व महादू कांदळकर, संस्थेचे सचिव नबाजी डांगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

साई सेवा मतिमंद विद्यालयाचे विशेष यश

साई सेवा मतिमंद विद्यालयाचे विशेष यश

शिर्डी प्रतिनिधी : 

    आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी प्रवरानगर लोणी ता. राहाता जि.अहमदनगर येथे बौद्धिक अक्षमता ( दिव्यांग) विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय कला व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये विशेष यश मिळवले. 
    समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) अहमदनगर व स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, अहमदनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौद्धिक अक्षमता विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय कला व स सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ प्रवरानगर लोणी PVP कॉलेज येथे पार पडल्या.
   सदर कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व गायन स्पर्धा अशा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विशेष यश मिळविले.      
     त्यामध्ये वयोगट ८ ते १२ चित्रकला रंगभरण -साई किरण शिंदे : द्वितीय गायन -गणेश कृष्णा जाधव : द्वितीय, वयोगट १७ ते २१ चित्रकला रंगभरण -दत्ता वाल्मिक धाकतोडे : द्वितीय, क्राफ्ट, कागदी वस्तू बनवणे- साहिल गणेश बोधक: तृतीय अशी पारितोषिक मिळवली.
     सदर पारितोषिके ही नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले. सदर विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे तसेच कर्मचारी श्री संकेत जगधने व साईसेवा टिचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथील विद्यार्थी अतुल शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.

राहता वकील संघाच्या उपाध्यक्ष पदी विधीज्ञ श्री शामराव डांगे पाटील यांची निवड करण्यात आली

राहता वकील संघाच्या उपाध्यक्ष पदी  विधीज्ञ श्री शामराव डांगे पाटील यांची निवड करण्यात आली

 राहाता=
राहाता वकील संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री ॲड शामराव डांगे यांची नुकतीच निवड झाली   गेल्या दहा बारा दिवसां पासून प्रचंड उत्साह आणि इच्छाशक्तीने विधीज्ञ श्री शामजी डांगे पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतली व दणदणीत विजय मिळविला आहे हा विजय शामराव यांच्या सोज्वळ स्वभावाचा विजय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ श्री जयंतरावजी जोशी साहेब यांनी सत्कार करताना केले, सत्कार प्रसंगी जेष्ठ विधिज्ञा सौ शितल वारुळे, राहाता वकील संघाच्या मा.उपाध्यक्षा सौ.योगिनी बेल्हेकर ,जेष्ठ विधीज्ञ योगेश कोरडे, ॲड. व्यंकटेश खिस्ते, ॲड.योगेश दाभाडे, ॲड. अमोल सदाफळ , ॲड. विकास डांगे, ॲड.अतूल माळवदे, ॲड. माऊली डोंगरे ॲड. उल्हास कालेकर ॲड. प्रशांत कोते, ॲड. संदीप उगले, ॲड. सौ रश्मी बोथरा, ॲड. सौ शिवानी झाडे, ॲड. सौ आरती सरोदे,सूरज बनसोडे, हे सर्व जण उपस्थित होते व शामराव डांगे पाटील यांना भावी काळा साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 
राहाता वकील संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री ॲड शामराव डांगे पाटील यांनी आपल्या सर्वांचे अमूल्य योगदान,मत आणि जेष्ठ विधीज्ञ श्री जयंतराव जोशी साहेबांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत व राहाता वकील संघाच्या उन्नती व्हावी यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व कामे करत राहू अशी भावना व्यक्त केली आणि सर्वांचे आभार मानले 

राहाता येथे २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.

राहाता येथे २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.


राहाता=
राहाता तालुका  माजी सैनिक संघटना व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिलकुमार निकाळे चौक येथे "कारगिल विजय दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला..*

*याप्रसंगी तहसिलदार अमोल मोरे,नायब तहसीलदार हेमंत पाटील,  मुख्याधिकारी वैभव लोंढे, राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ साहेब, माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे,माजी सैनिक  संघटना अध्यक्ष फ्रान्सिस भारुड, तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व राहाता ग्रामस्थ , हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांचे बंधू राजेंद्र निकाळे या कार्यक्रमाला हजर होते..*

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी करताना सांगितले की, हा २५ वा कारगिल विजय दिवस भारतभर साजरा होत असून यामुळे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठ, सामाजिक आदर्श  समाजात वाढीस लागले.. यानंतर माजी सैनिक सत्यशोधक भानुदास गाडेकर यांनी सांगितले की, "कारगिल विजय दिवस हा कारगिल युध्दात शहीद झालेल्या युध्दवीरांना स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच देशातील नागरिक व तरुणांमध्ये देशप्रेम व कर्तव्याची भावना वाढीस लागावी यासाठी साजरा केला जातो.." याप्रसंगी मेजर संजय राजगुरू यांनी मनोगत व्यक्त करुन ते स्वतः कारगिल युध्दात सहभागी होते हे सांगितले..

  यानंतर डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांनीही पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.. याप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान कोरडे, तलाठी कोळगे,अरुण टिळेकर, तात्यासाहेब कोरडे,संजय राजगुरू,अशोक राजगुरू,गिते,वसंत सदाफळ, अविनाश निर्मळ,डांगे,दगडूपंत काटे, विष्णू गायकवाड,महेश हिरवे, कॅप्टन गायकवाड तसेच ग्रामस्थ अरुण कोरडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत सदाफळ,रवी बोठे,विजय आवारे उपस्थित होते..शेवटी आभार अरुण टिळेकर यांनी मानले.

राहाता सह्याद्रीच्या पर्यावरण निबंधस्पर्धेचे निकाल जाहीर

राहाता सह्याद्रीच्या पर्यावरण निबंधस्पर्धेचे निकाल जाहीर

 राहाता=
    प्रथम डॉ. दिग्विजय जाधव, द्वितीय कवी संतोष तांदळे , तृतीय कु. वैष्णवी निर्मळ तर उत्तेजनार्थ ऍड. रुपाली हिरवे, भारती सावंत व प्रकाश खंडागळे मानकरी.* 
वार्ताहर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री यांचे वतीने पर्यावरणावर आधारित घेण्यात आलेल्या खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मुंबई येथील डॉ. दिग्विजय जाधव, द्वितीय क्रमांक कोपरगांव येथील कवी संतोष तांदळे, तर तृतीय क्रमांक पिंपरी निर्मळ येथील कु. वैष्णवी निर्मळ तर उत्तेजनार्थ ऍड. रुपाली हिरवे, श्रीम. भारती सावंत , मुंबई, व श्री. प्रकाश खंडागळे, जामखेड, यांनी पटकाविले असल्याची घोषणा क्लबचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांनी केली आहे. 
           या स्पर्धेसाठी तीन विषय ठेवण्यात आले होते त्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपले विचार, झाडे बोलू लागली तर व राहाता शहरातील नागरिकांसाठी खास राहाता शहर पर्यावरणपूरक होण्यास आपण काय योगदान देणार ? हे विषय ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकंदर 65 निबंध स्पर्धेत दाखल झाले होते. यातून वरील सहा निबंधाची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. 
                  प्रथम पुरस्कार क्लबचे व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे यांचेकडून " एअर बॅग " व प्रशस्तीपत्र, द्वितीय पुरस्कार " ज्ञानेश्वर जेजुरकर यांचेकडून इलेक्ट्रिक केटल व प्रशस्तीपत्र,तर तृतीय पुरस्कार कु. वैष्णवी निर्मळ हिला क्लबचे संस्थापक ला. विनोद गाडेकर यांचेकडून क्रॉम्प्टन इस्त्री, उत्तेजनार्थ बक्षिसे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड, ला. ऋषिकेश गव्हाळे व निलेश पर्वत यांचेकडून टी सेट देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जातील.
                राहाता सह्याद्री लायन्स क्लबच्या द्वितीय पदग्रहण समारंभात लवकरच मा. डि. गव्हर्नर ला. गिरीश मालपाणी व इतर मान्यवर यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिसे देवून सन्मानित करण्यात येईल. बक्षीसपात्र व सर्व स्पर्धकांचे लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे संस्थापक ला. विनोद गाडेकर , सेक्रेटरी ला. सागर रोकडे व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. स्वाधीन गाडेकर व ला. सुनील धाडगे, ला. डॉ. दत्ता कानडे, ला. डॉ. मिलिंद नाईक, ला. डॉ. वैभव मालकर, ला. डॉ. निर्मला गाडेकर,ला. गायत्री म्हस्के ला. राजश्री फंड, ला. राजश्री रोकडे, ला. राजश्री डांगे, ला. ज्ञानेश्वर नळे , ला. मिलिंद कडलग , ला. सचिन लोढा, ला. ॲड. सुधीर बोठे, ला.नितीन दिवटे, ला. सिराज शेख, ला. शिवम सपिके, ला. सत्यम सदाफळ, ला. विजय बनकर, ला. प्रतिक वाघे, ला. कृष्णा बोठे , ला. सुनील काळोखे, ला. संदीप पुंड, ला. राजेंद्र म्हस्के, यांनी अभिनंदन केले आहे.

गुरुवार, २५ जुलै, २०२४

अँड संतोष रंगनाथ थेटे यांची राहता तालुका वकील संघाचे सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार


अँड संतोष रंगनाथ थेटे यांची राहता तालुका वकील संघाचे सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी अँड संतोष रंगनाथ थेटे यांची राहता तालुका वकील संघाचे सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते पोपटराव काका भालके, रंगनाथ थेटे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

लायन्स क्लब राहाता यांचे सहकार्याने क्लबचे ट्रेझरर श्री.व्यंकटेश अहिरे यांनी 35 विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप

लायन्स क्लब राहाता यांचे सहकार्याने क्लबचे ट्रेझरर श्री.व्यंकटेश अहिरे यांनी 35 विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप

राहाता=
लायन्स क्लबचे ट्रेजरर लायन व्यंकटेश आहीरे यांचे 
चि.देवांशु अहिरे याच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब राहाता यांचे सहकार्याने क्लबचे ट्रेझरर श्री.व्यंकटेश अहिरे  यांनी 35 विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
राहाता लायन्स क्लबच्या वतीने प्रत्येक लायन्स सभासद यांचा वाढदिवस घरी साजरा न करता गरजू मध्ये जाऊन साजरा करण्याचे ठरले आहे,त्यामुळे सर्व एकत्र येतात विचाराची देवाणघेवाण होते, लायन्स क्लबचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन प्रकशजी सदाफळ,डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ,संजय उबाळे यांच्या पुढाकाराने वाढदिवस साजरा करून 2 आंबे,2 चिंच,1 जांभूळ असे 5 मोठी झाडे लाऊन नवीन पायंडा पडला आहे,त्यामुळे प्रत्येकाने वर्षभर आपल्या घरातील सभासद यांच्या वाढदिवशी एक तरी झाड लावण्याची लायन्स सभासद यांना विनंती केली व सर्वांनी मान्य करून घरी साजरा न करता गरजू लोकांना,गरजू मुले व मुली यांना मदत करण्याचे ठरले आहे
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब च्या मा. अध्यक्षा अंजली उबाळे ,ट्रेजरर व्यंकटेश अहिरे, लायन विजय धनवटे,लायन ऍड.दिनेश कारले सेक्रेटरी, लायन आसावरी बेंद्रे, मुख्याध्यापक श्री.गोरक्ष पटारे  सर 
उपाध्यापक श्री.बबन कोकाटे सर, भूपाळी अहिरे,आशाताई अहिरे,सोहन उबाळे उपस्थित होते 
बबन कोकाटे सर यांनी सर्वांचे आभार मानले

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चोरडीया कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन मंजुर


ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चोरडीया कुटुंबीयांचा अटकपूर्व
 जामीन मंजुर


राहाता प्रतिनिधी=
    दि. १४/०७/२०२४ रोजी राहाता शहरातील नगर मनमाड महामार्गावरील जितेंद्र वुमन्स च्या मालकाच्या मुलाने पिडीतेस जिवे मारण्याची धमकी दिली व जाब विचारण्यास गेली असता पिडीता व तीचे नातेवाईकांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राहाता पोलिस स्टेशन मध्ये सार्थक चोरडीया, निलेश चोरडीया, कमलेश चोरडीया, जिनेश चोरडीया यांचे विरूद्ध भारतीय न्याय संहीतेच्या कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११५ (२) व ३५२ व ॲडव ॲट्रॉसीटी कायद्याचे कलम ३ (१) (आर) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

चोरडीया कुटुंबीयांचे वतीने राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामी ॲड. श्री. जयंत आत्माराम जोशी यांनी कामकाज पाहीले. चोरडीया कुटुंबीयांविरूद्ध दाखल गुन्हा हा खोटा असुन त्यांना झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याला शह देण्यासाठी खोटा ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद केला. सोबतच जितेंद्र वुमन्स येथील घटणेच्या वेळचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व चोरडीया कुटुंबीयांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून ॲट्रॉसीटीचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तीवाद करून प्रथमदर्शनी ॲट्रॉसीटी कायद्याच्या तरतुदी प्रकरणास लागु होत नसल्याने अटकपूर्व जामीन मंजुर करण्याची विनंती त्यांनी मा. न्यायालयास केली.

प्रकरणात सरकारी वकील, मुळ फिर्यादीचे वकील व चोरडीया कुटुंबीयांचे वतीने ॲड .श्री. जयंत जोशी यांचे युक्तीवाद ऐकुन तसेच सदरील युक्तीवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी शर्तीसह चोरडीया कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन राहाता येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. अमेटा साहेब यांनी दि. २३/०७/२०२४ रोजी मंजुर केलेला आहे.
  
  तसेच यावेळी जेष्ठ विधीज्ञ श्री जयंतराव जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ॲड. व्यंकटेश खीस्ते, ॲड.योगेश दाभाडे,ॲड. प्रशांत कोते व ॲड.आरती सरोदे यांनी काम पाहिले.
  सदर जामीन प्रकरणाकडे राहाता तालुक्यातील संपुर्ण व्यावसायीक क्षेत्राचे लक्ष लागलेले होते.

सोमवार, २२ जुलै, २०२४

भाविकांना हॉटेलचालकाचा सुखद धक्कामलेशियन ४४ जणांचे खोलीभाडे माफ : त्या सर्वांचा सत्कार




भाविकांना हॉटेलचालकाचा सुखद धक्का

मलेशियन ४४ जणांचे खोलीभाडे माफ : त्या सर्वांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी 

मागील आठवड्यात चेन्नई विमानतळावरून शिर्डीला येणारे विमान सलग दोन दिवस रद्द झाले. त्यामुळे साई दर्शनासाठी मलेशियातून आलेल्या ४४ भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र येथील एका हॉटेलचे कार्यकारी संचालक दीपक निकम यांनी या भाविकांनी आरक्षित केलेल्या खोल्यांचे भाडे माफ करून चमूला सुखद धक्का दिला.
सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, योग प्रशिक्षक व त्यांचे सहकारी मिळून ४४ भाविकांसाठी आमच्या गोरडीया हॉटेलचे रूम व सूट आरक्षित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सलग दोन दिवस विमान रद्द झाल्याने त्यांना नाइलाजाने तेथे मुक्काम करावा लागला. तिसऱ्या दिवशी पुणे व मुंबई विमानतळावर उतरून त्यांना वाहनभाड्याचा अतिरिक्त खर्च करून शिडॉत यावे लागले. दुप्पट तिप्पट खर्च आणि मुक्कामही वाढला. शिर्डीत साईदर्शन झाल्यावर या भाविकांनी आरक्षित काळातील खोल्यांचे भाडे अदा करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यांना झालेला मनस्ताप आणि वाढलेला खर्च लक्षात घेऊन निकम यांनी या आरक्षित काळातल्या भाड्याची आगाऊ भरलेली मोठी रक्कम त्यांना परत केली. त्यांच्या या कृतीमुळे या चमूला सुखद धक्का बसला. येथून रवाना होण्यापूर्वी या चमुतील प्रत्येकाचा सत्कार करण्यात आला. साईदर्शनासाठी भारतात आल्यानंतर झालेला मनस्ताप दूर व्हायला निकम यांच्या या कृतीमुळे मदत झाली.

शिर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी विखे गटाचे श्री तान्हाजी गोंदकर, तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब काटकर यांची निवड



शिर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी विखे गटाचे श्री तान्हाजी गोंदकर, तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब काटकर यांची निवड 
 
शिर्डी प्रतिनिधी : 
 
शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तान्हाजी आप्पासाहेब गोंदकर तर व्हा.चेअरमनपदी बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची चुरशीच्या लढतीत नुकतीच निवड झाली. यावेळी तान्हाजी आप्पासाहेब गोंदकर यांना ९ मते तर विजय भाऊसाहेब गोंदकर यांना ४ मते पडली तान्हाजी गोंदकर यांचे सूचक म्हणून किरण मधुकर कोते व अनुमोदक म्हणून विजय ज्ञानेश्वर गोंदकर हे होते तर बाळासाहेब काटकर यांना सूचक म्हणून नितीन पाराजी कोते व अनुमोदक म्हणून बाळासाहेब भागवत जगताप हे होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक सहकारी संस्था राहाता येथील अधिकारी श्री संजय पाटील साहेब व शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव श्री संदीप बढे साहेब यांनी काम पाहिले, नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी गोंदकर व व्हा.चेअरमन बाळासाहेब काटकर यांचे राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा.डॉ सुजय(दादा) विखे पाटील यांनी अभिनंदन केले.
     याप्रसंगी राहाता बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, माजी सरपंच दिगंबर (नाना) कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, गणेश कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, मा. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, श्री साईबाबा संस्थानचे मा.विश्वस्त महेंद्र शेळके व सचिन कोते, गणेशचे मा.संचालक मधुकर कोते,शिर्डी नागरीचे चेअरमन सुधाकर शिंदे, मा.नगरसेवक नितीन शेळके, मा.उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे,मा.उप नगराध्यक्ष सुजित गोंदकर , संचालक सर्वश्री बाळासाहेब जगताप, प्रमोद गोंदकर, विलास कोतें,विजय गोंदकर,नितीन कोते, विकास कोते,किरण कोते,बाळासाहेब गायकवाड,श्रीमती प्रमिलाताई शेळके, सौ.सुनीताताई कोते, आप्पासाहेब कोते, रवींद्र कोते,भाजपा मा.जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, विनायक कोते, युवा मोर्चाचे चेतन कोते, साहेबराव काटकर, अर्जुन जगताप ,कैलास जगताप, भारत शेळके, भास्कर जगताप,दिनुममा कोते,प्रकाश गोंदकर,अविनाश गोंदकर ,महेश गोंदकर, भूषण जगताप, नवनाथ गोंदकर, गणेश कोते,गणेश अनिल गोंदकर आदींसह मोठ्या संख्येने शिर्डी सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेती पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी - विठ्ठलराव शेळके

गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेती पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी - विठ्ठलराव शेळके

राहाता =

   गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रातील उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तन तातडीने सोडावे तसेच शेती पाणीपट्टीत केलेली 10 पट वाढ रद्द करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे 

उपअभियंता, गोदावरी उजवा तट कालवा, राहता यांना दिलेल्या निवेदनात विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देतो की, दारणा धरण समूहात जवळजवळ 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. कालवा लाभ क्षेत्रात यावर्षी जून महिन्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके सोयाबीन, मका, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. शिवाय शेतात चारा पिके, फळबागा, ऊस इत्यादी पिके उभी आहेत. जवळजवळ एक महिन्यापासून पाउस उघडला असल्याने शेतातील उभी पिके जळू लागली आहे. तरी तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडून उभ्या पिकांना सात नंबर फॉर्मवर पाणी द्यावे तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत दहापट वाढ केली आहे. सन 2018-19 यासाठी बारामाही पिकांसाठी पाणीपट्टी दर स्थानिक करासह 538 रुपये होते नवीन दरवाढीप्रमाणे एकरी 5443 रुपये नवीन पाणीपट्टी दर असतील यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतमाल सोयाबीन, कांदा व इतर पिकाची निर्यात बंदी केल्यामुळे कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्यात पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत मोठी वाढ केल्याने पाटपाणी कसे घ्यावे? अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे. नवीन पाणीपट्टी दर खरीप पिकासाठी 1890 रुपये आणि रब्बीसाठी 3680 रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी  हंगामात दुष्काळामुळे पिके जळून गेली आहे तरी यावर्षी खरीप व रब्बी हंगामात किमान दोन-दोन आवर्तने व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीची बैठक ही राहाता पाटबंधारे विभागात घेऊन लाभक्षेत्रातील शेतकरी यांना निमंत्रित करून नियोजन करण्यात यावे तसेच आता वाट  न पाहता शेतातील खरीप पिके, चारा पिके, ऊस, फळबागा यांना तातडीने आवर्तन सोडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकरी या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडतील याची नोंद घ्यावी असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे 

पत्रकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे, राजेंद्र गोर्डे, भाऊसाहेब एलम, दादासाहेब गाढवे, हौशीराम चोळके, पुंजाराम आहेर, मीनानाथ पाचरणे, सावळेराम आहेर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

रविवार, २१ जुलै, २०२४

श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीची माळ या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा


श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीची माळ या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

शिर्डी प्रतिनिधी : 

श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ या ठिकाणी गुरु पौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वेळी सरस्वती मातेचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पाथ रूट गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वस्तीग्रह अधीक्षक मल्लिनाथ पटणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा शिक्षक तानाजी कुंभार सर कर्मचारी संभाजी चौगुले हे होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पटणे सर यांनी गुरुचे महत्व मानवी जीवनामध्ये माणसाला गुरुशिवाय आणि अध्यात्मिक वारसा शिवाय माणसाचे जीवन सफल होत नाही असे सांगितले व तानाजी कुंभार सर यांनी गुरुचा महिमा या ठिकाणी नमूद केला उपस्थिताने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षक बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विद्यालयातील कलाशिक्षक श्री ज्ञानदेव गुरमे सर यांनी सूत्रसंचालन केले व विशेष शिक्षक गणेश सातपुते सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

वृक्षारोपण करून केली गुरुपौर्णिमा साजरी

वृक्षारोपण करून केली गुरुपौर्णिमा साजरी

राहाता =

राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे दरवेळी सामाजिक उपक्रम राबवून विविध सण अथवा उत्सव वा महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात.रविवारी दहेगाव ग्रामस्थांच्या मदतीने योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांच्या हस्ते खटकाळी परिसर दहेगाव येथे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.साईयोग फाउंडेशन द्वारे गेली १८ वर्षांपासून रोज पहाटे ५.३० ते ७ पर्यंत राहाता नगरपालिका हॉल मध्ये मोफत योगवर्ग घेणारे योगगुरू सुरेश भिंगरादिवे,विलास वाळेकर व भाऊसाहेब बनकर यांचा फेटा बांधून साईशाल व गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.ॲड दत्तात्रय धनवटे,नारायण गाडेकर व रविंद्र धस यांनी गुरूंची महती विषद केली.सत्काराला उत्तर देताना योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील कारणमीमांसा सांगून सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,संदीप डांगे, ॲड गोरखनाथ दंडवते,संजय बाबर, सिताराम बावके,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,विठ्ठल निर्मळ,बाळासाहेब तारगे,पांडुरंग गायकवाड,सुभाष डांगे,प्रभाकर डांगे,रामहरी डांगे,सदाशिव डांगे,माऊली आरणे,शिवाजी पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे खटकळी परिसरात वृक्षरोपणाला खड्डे करण्यासाठी माळवदे बिल्डकॉन चे नंदकुमार माळवदे व साईप्रसाद माळवदे यांनी जेसीबी मशिन देऊन अनमोल सहकार्य केले.शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कै.मच्छिंद्र पाटील टेमक संस्था पुन्हा सत्ताधारी गटाकडे विरोधी गटाला एक जागा


कै.मच्छिंद्र पाटील टेमक संस्था पुन्हा सत्ताधारी गटाकडे विरोधी गटाला एक जागा

पानेगांव - 
   नेवासा तालुक्यातील करजगांव ( ता नेवासे) येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कै मच्छिंद्र पाटील टेमक संस्थेची निवडणूक समिती व्यवस्थापन सन २०२२-२०२७ निवडणूक रविवार दिनांक २१रोजी करजगांव (ता नेवासे )येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडली मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली सायंकाळी ६वा सह्हा निबंधक कार्यालय नेवासे निवडणूक निर्णय अधिकारी एस व्हि ठोंबरे निकाल जाहीर करण्यात आला.सत्ताधारी गटाला १२जागा विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
सर्वसाधारण मतदार संघ विजयी उमेदवार १) टेमक दिनकर एकनाथ २) टेमक प्रदीप पोपट, ३)माकोणे किसन सुभाष ,४)नांगरे अमोल गोरक्षनाथ, ५)कंक अशोक अर्जुन, ६)देवखिळे मोहन सावळेराम ,७)माकोणे संजय भाऊसाहेब,८) टेमक अशोक साहेबराव (एक जागा विरोधी गट विजयी उमेदवार), अनु जाती जमाती- गायकवाड रमेश चंद्रभान,महिला राखीव- टेमक वैशाली सुर्यकांत,पुराणे तुळसाबाई बापू इतर मागासवर्गीय- पुंड बाबासाहेब हरि भटक्या -मदने विठ्ठल भागवत 
विजयी बजरंग सहकार पॅनल नेतृत्व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब माकोणे, उपसरपंच सतिश फुलसौंदर, माजी सरपंच चंद्रकांत टेमक, रितेश टेमक, विद्यमान उपाध्यक्ष आण्णासाहेब कोळेकर संजय कंक आदींनी केले.जय तुळजाभवानी सहकार पॅनल नेतृत्व माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक टेमक, अॅड. बीएस टेमक नवनाथ कंक यांनी केले.विजयी उमेदवारांचे अभिनंदन जेष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख पाटील,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील,युवा नेते उदयन गडाख पाटील यांनी केले. 
नेवासे सह्यायक निबंधक अधिकारी देविदास घोडेचोर यांचा मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्हि ठोंबरे, जंगले एस व्हि, जंगले बी पी, यांनी काम पाहिले. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके यांचा मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दहिफळे महिला हेडकॉन्स्टेबल आयनर यांनी चोख बंदोबस्त बजावला.

शनिवार, २० जुलै, २०२४

सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे  यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 

राहाता =
 सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे (वय 36) यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोर्डे यांच्यावर केलवड या त्यांच्या गावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना काल रात्री 8 वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. केलवड पिंपळस शिवेवरील गोर्डे वस्तीवरुन तर केलवड मधील स्मशानभुमिपर्यंत सैन्यदलाच्या वाहनामधून मिरवणूक काढण्यात आली होती.
अमर रहे... अमर रहे... नायक गणेश गोर्डे अमर रहे। भारत माता की जय, देश सेवा करणार्‍या या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. राहात्याचे तहसिलदार अमोल मोरे यांनी तसेच विखे कुटूंबियांच्या वतीने सौ. सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील, गणेश चे माजी अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, सरपंच दिपकराव कांदळकर, पोलिस पाटील सुरेश गमे, माजी पोलिस पाटील सुभाषराव गमे, डॉ. राजेंद्र पिपाडा, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, सैन्यदलातील अधिकार्‍यांकडून, माजी सैनिकांकडून, तसेच वैयक्तिकरित्याही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. सैन्यदलाकडून तसेच पोलिस दलाकडून या जवानाला बंदूकीतुन हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप दिला. नायक गोर्डे यांच्या पत्नी कविता यांनी साश्रु नयनांनी आपले पतीस व मुलगी काव्य हिने साश्रू नयनांनी आपल्या पित्यास पुष्पअर्पण करत श्रध्दांजली वाहिली.
 नायक गणेश गोर्डे हे उत्तरप्रदेशातील झाँसी येथे सैन्यदलात कर्तव्यास होते. सेवाबजावत असतानेच त्यांना म्युकर मायकोसिस या आजाराची बाधा झाली. लखनौ येथे सैन्यदलाच्या कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतानाच त्यांची शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. जवान गोर्डे हे 16 वर्षापुर्वी सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, आई, असा परिवार आहे. बाळासाहेब दगडू गोर्डे बंधू तर नरेश राऊत फौंडेशनचे सेक्रेटरी प्रा. लक्ष्मण गोर्डे यांचे ते पुतणे होत.

कन्येच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण : एक स्तुत्य उपक्रम


कन्येच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण : एक स्तुत्य उपक्रम

श्रीरामपूर: 

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी आपली कन्या कु. वैष्णवी मोरे हिच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या वया इतकेच झाडे लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्य त्यांचे पुतणे प्रमोददादा मोरे हे राज्यात नेटाने पुढे नेत असून या संस्थेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व पर्यावरण समतोल राखण्यासाठी वर्षभरातून विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी देखील प्रमोददादा मोरे यांनी पक्षांसाठी ज्वारीचे एक एकर क्षेत्र राखीव ठेवले होते. उन्हाळ्यात पक्षांसाठी मुठभर अन्न घोटभर पाणी ही योजना दरवर्षी ते राबवित असतात, त्यासाठी मातीची भांडी वाटप केली जातात. नुकतेच त्यांची कन्या कु. वैष्णवी मोरे हिच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या वया इतकेच झाडे लावण्याचा उपक्रम त्यांनी नुकताच हाती घेतला. प्रत्येक घरात असा उपक्रम राबविला तर पर्यावरणाचा समतोल आणि वृक्षसंवर्धन होण्यास मदत होणार आहे. त्यांनी राजस्थानमधील पिंपलात्री गावचे सरपंच पद्मश्री, वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी शामसुंदर पालीवाल यांनी त्यांच्या गावात मुलीच्या जन्मानिमित्ताने १११ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा नियमच घालून दिला आहे. त्याचाच आदर्श म्हणून प्रमोददादा मोरे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, सचिव वनश्रीताई मोरे, सचिव मुख्याध्यापक अनिल लोखंडे, लतिका पवार, उत्तमराव पवार, उपाध्यक्ष प्रकाश केदारी, राज्य संघटक डॉ. शरद दुधाट, जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, सुभाष वाखारे, प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब साबळे, अमोल चंदनशिवे, पत्रकार कोंडीराम नेहे, पत्रकार विजय बोडखे, चंद्रकांत भोजने, बाळासाहेब ढोले सरपंच, बाळासाहेब गाडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.

पिंपळनेरच्या प्रा प्रायमरी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व दप्तराचे वाटप


पिंपळनेरच्या प्रा प्रायमरी स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व दप्तराचे वाटप

शिर्डी प्रतिनिधी :

आचार्य प्री-प्राइमरी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तराचे वाट, शिक्षणाच्या नवनवीन पद्धती वापरून अध्यापन व विद्यार्थी केंद्रित असलेली पिंपळनेर येथील आचार्य प्री- प्राइमरी पब्लिक स्कूलमध्ये गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि दप्तरांचे वितरण करण्यात आले.यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. 
कार्यक्रमात सुरुवातीला आचार्य स्कूलचे प्राचार्य यांनी स्कूलची ध्येय धोरणे, उद्दिष्ट आणि आचार्य प्री-प्राइमरी स्कूल स्थापनेचा इतिहास व व्यवस्थान मंडळाची दूरदृष्टी यावर भाष्य केले. विविध मॉडल वापरून शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आकलन करायला सोपे जात असल्यामुळे पालकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर येथील रामचंद्र भामरे, धनराजशेठ जैन, सोमनाथ कोठावदे, भालचंद्र दुसाने, प्रदीप कोठावदे, आचार्य प्री-प्राइमरी पब्लिक स्कूल चे व्यवस्थापन मंडळाचे सुरेंद्र मराठे, जयवंत बागड, रिखबचंद जैन, प्रा. वाल्मीक पाटील व प्राचार्य. प्रा.पंकज पाटील, सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी आणि आचार्य स्कूल चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

पाऊले चालती पंढरीची वाट, व्ही.पी.एस.मध्ये पालखी सोहळा संपन्न

पाऊले चालती पंढरीची वाट, व्ही.पी.एस.मध्ये पालखी सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : 

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक

श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा

देशपांडे आणि मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक श्री. योगेश कोठावदे, श्री. चंद्रकांत

जोशी, श्री. महेश चोणगे, श्री. धनंजय काळे, श्री. विक्रम शिंदे आणि

पालखी सजावटीसाठी सेवक श्री. गजानन कदम यांचे सहकार्य

मिळाले.

वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम सोनुणे (सातवी अ), द्वितीय क्रमांक स्वराज निकम (सातवी अ), तृतीय क्रमांक रुद्र इंगुळकर (सहावी क) तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी मधून प्रथम क्रमांक मयुरेश पवार, द्वितीय क्रमांक शुभ्रा बदर तृतीय क्रमांक विराज गिद्दी, सहावी मधून प्रथम क्रमांक हर्षद ठोंबरे, द्वितीय क्रमांक तनुजा वाघ, तृतीय क्रमांक युवराज विलाने आणि इयत्ता सातवी मधून प्रथम क्रमांक समर्जित पोटफोडे, द्वितीय क्रमांक रुद्र शिंदे, आणि तृतीय क्रमांक भक्ती हुंडारे या विद्यार्थ्यांनी मिळवले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी शालेय साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन केले. तसेच नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

पालखी सोहळा प्रशालेच्या मैदानावरती पार पडला. पालखीचे पूजन प्राचार्य तसेच उपस्थित मान्यवरांनी केले. त्यानंतर पालखी प्रशालेच्या मैदानावरती प्रदक्षिणा घालून विद्यार्थ्यांना दर्शनासाठी पालखी मैदानाच्या मधोमध ठेवण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्गशिक्षक, शिक्षक तसेच सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. पालखी सोहळा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. 
पालखी सोहळ्यानिमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, अभंग गायन स्पर्धा, काव्य गायन स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे परीक्षण प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम. क्षमा देशपांडे यांनी केले.

शारदा शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा


शारदा शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
 
 राहाता प्रतिनिधी -

      रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान सोहळा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केला होता. 
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृती प्रमाणे अतिशय मोठी आहे .सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना गुरु समान मानले पाहिजे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणली पाहिजे. त्याच्यातून आपले जीवन यशस्वी होऊ शकते असे सांगितले. 
        संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहमदनगर यांनीही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात व्यसनमुक्त राहिले पाहिजे. गुरूंचा आदर केला पाहिजे .गुरु मुळे आपले जीवन घडते असे सांगितले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. त्यांनी गुलाब, पुष्प ,शाॅल ,श्रीफळ देऊन संकुलातील सर्व शिक्षकांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भाषणातून गुरूंच्या प्रति आदर व्यक्त केला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे ,प्राचार्या निशाचे चेंगोट, उपप्राचार्य अशोक बोरसे, प्रा.शरद गमे ,रमेश आहेर ,प्रा.राजेंद्र पटारे ,रणजीत पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते.

रेशनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करा – गवारे


रेशनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करा – गवारे

बाभळेश्वर - 

 राहाता तालुक्यातील बाभळेश्वर सह संपूर्ण तालुक्यात रेशनच्या सर्व्हर डाऊनची रोजची समस्या झाली आहे. लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी तासंतास वाट पाहावी लागतेय. गेल्या महिना दोन महिन्यांपासून रेशनचं सर्व्हर कधी बंद तर कधी सुरु असते. सर्व्हर डाऊन असल्याने बायोमेट्रीक मशीन बंद होत आहे. त्यामुळे याला पर्यायी व्यवस्था निर्माण करून लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
            रेशन सर्व्हर डाऊनची रोजची समस्या झाली आहे बायोमेट्रीक मशीन बंद होऊन त्याचा धान्य वितरणाला मोठा फटका बसतोय, धान्य वितरणात अडचणी येतात, असं रेशन दुकानदार यांच म्हणण आहे. गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी बायोमेट्रीक पद्धती अवलंबली जाते. पण, सर्व्हर डाऊनचा ग्राहकांना आता संताप आलाय. रेशनसाठी लोकं रांगेत उभे राहतात. कधीकधी दुकानदारांशी भांडण होतात. मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही. 
           गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं रेशन दुकानांसमोर गर्दी होती. ग्राहकांना तास दोन तास रांगेत उभे लागावे लागले. रोज रोज दुकानात सर्व कामधंदे सोडून जायचे तरीही धान्य मिळत नसतील, तर काय करायचे असा संपात ग्राहक व्यक्त करत आहेत. तर सर्व्हर डाऊन असल्याने धान्य विक्री करताना त्रास होत असल्याचं रेशन दुकानदार म्हणातात. ग्राहक आणि दुकानदार दोघेही यामुळं त्रस्त आहेत. 
         त्यामुळे याची दखल घेवून रेशन वितरणासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी गवारे यांनी केली आहे.

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

शेतीसाठीची पाणीपट्टी 10 पट वाढवण्याचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा - डॉ.राजेंद्र पिपाडा

शेतीसाठीची पाणीपट्टी 10 पट वाढवण्याचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा - डॉ.राजेंद्र पिपाडा 

राहाता=
          महाराष्ट्रातील शेतकरी मागील वर्षीच्या दुष्काळातून अजून सावरलेला नाही. नसल्यामुळे शेतीसाठीची पाणीपट्टी 10 पट वाढवण्याचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशा मागणाचे निवेदन मुंबई येथे भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले.

         मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली या वेळी त्यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीमध्ये दहा पटीने वाढ केलेली असल्यामुळे शेतकऱ्यांची तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याचे बजेट कोलमडले आहे, राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत तब्बल दहा पटीने वाढ केलेली आहे. 2018 व 2019 या साली बारमाही पिकासाठी पाणीपट्टीचा दर स्थानिक करा सह वार्षिक एकरी 538 रुपये होता, नवीन दरवाडी प्रमाणे हा दर बागायती शेतीसाठी वार्षिक एकरी 5443 रुपये इतका असणार आहे. खरिपाच्या शेतक-यांसाठी हीच पाणीपट्टी 1890 रुपये आणि रब्बीसाठी 3680 रुपये करण्यात आली आहे. एका झटक्यात दहा पटीने झालेली ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.

          या निर्णयामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मागील वर्षीच्या दुष्काळातून अजून सावरलेला नाही. दूध व अन्य शेतमालाला अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यातच गणेश परिसरात ऐन उन्हाळ्यातही धरणात पाणी असुनही शेतीसाठी पाणी मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर शेतीच्या पणीपट्टीत दहापट वाढ केल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. तरी या बाबींचा गांभीर्याने विचार करून शेतीसाठीची पाणीपट्टी वाढवण्याचा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाणीपट्ट्याच्या दर वाढीस आम्ही तात्काळ स्थगिती देत आहोत असे सांगितले.  

शेतीसाठी वाढलेल्या पाणीपट्टीस आम्ही तात्काळ स्थगिती देत आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.

गुरुवार, १८ जुलै, २०२४

ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्या निलंबनाची युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी


ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्या निलंबनाची युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी 

राहाता:
 
 राहाता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामसेवक व तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्या निलंबनाची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे 
   यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याबद्दल नागरिकांमधून अनेकदा संघाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यासंदर्भात ग्रामसेवक यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आलेली माहिती न देणे, माहिती अधिकार अर्ज न स्विकारणे तसेच माहिती प्राप्त करण्यासाठी पाठविलेले पैसेही न स्विकारणे असे गंभीर कृत्य करण्याचे आरोप करण्यात आले आहेत 
 संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक यांनी दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायती संदर्भातील विविध कामकाजाची माहिती मागितली होती ती प्राप्त करण्यासाठी २४ जानेवारी रोजी माहिती अधिकारातील प्रतींच्या संख्येनुसार रक्कम रूपये ३२० व पोष्टल खर्च रू ९० असे एकूण ४१० रूपये रूपये ग्रामपंचायतीच्या प्रवरानगर येथील एडीसीसी बॅंकेच्या खात्यावर भरणा करण्याचे कळविण्यात आले होते मात्र श्री मंडलिक यांनी सदरची रक्कम मनी ऑर्डरने पाठविली सदर ग्रामसेवकाने ती न स्विकारता परत पाठविली असल्याचे निवेदनात सांगत माहिती जाणूनबूजून लपविण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. 
  यासंदर्भात श्री मंडलिक यांनी राहात्याचे गटविकास अधिकारी यांच्याकडे १२ जानेवारी रोजी अपिल दाखल केले त्यावर ११ मार्चला सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आले मात्र परस्पर दुसरे पत्र काढत आपण सुनावणीसाठी गैरहजर असल्याने २६ मार्चला सुनावणी घेण्याचे नमुद केले मात्र तसे पत्र मंडलिक यांना दिले नसल्याचे व अपिल निकाली काढल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
  गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे कृत्य करून त्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्याचा प्रकारच त्यांच्या या कृतीतून दिसून येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या सर्व प्रकाराची विस्तृत चौकशी करून लोहगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांना पाठीशी घालण्याचे काम करणारे राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

न्याहाळोद येथील हेमांगी रोकडे चार्टर अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण-प्रा.मोतीलाल सोनवणे

न्याहाळोद येथील हेमांगी रोकडे चार्टर अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण-प्रा.मोतीलाल सोनवणे

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 

     धुळे तालुक्यातील मूळ न्याहाळोद येथील रहिवाशी हेमांगी रोकडे चार्टर अकाउंटंट परीक्षा पास झाली. तिला तिच्या वडिलांकडून शिक्षणाची प्रेरणा मिळाली.तिने घेतलेले अथक परिश्रम,जिद्दीच्या जोरावरच, तिला घवघवीत यश आले आहे. ही न्याहाळोदकरांच्या दृष्टीने व रोकडे परिवाराच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची गोष्ट आहे. ही मुलगी खूप मेहनती आणि कष्टाळू असून सतत पाच वर्षे मीडियापासून लांब राहिली व सतत पाच वर्ष मनापासून अभ्यास केला.ती पुणे येथे वास्तव्यास असलेले सीएफओ (चीप फायनान्शियल ऑफिसर) देविदास दौलत रोकडे यांची मुलगी आहे. देविदास रोकडे यांची सन १९८१-८२ साली अत्यंत गरिबीची परिस्थिती होती.घरात अठरा विश्व दारिद्र्य होते. शिक्षण घेणे शक्य नव्हते त्यावेळी त्यांचे मामा उद्यान पंडित नथू जयराम माळी यांनी पाच वर्षे शिक्षणाचा, खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च केला.परिस्थितीची जाणीव असल्यामुळे सीएस सारख्या कठीण अभ्यासक्रमात त्यांनी यश संपादन केले.*
    *हेमांगी रोकडे ही न्याहाळोद येथील सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक मुरलीधर रोकडे व आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास रोकडे, सावता रोकडे, वकील चुनीलाल रोकडे यांची पुतणी तर कापडणे येथील उद्यान पंडित नथू जयराम माळी यांची नात आहे. रोकडे शब्दाचा अर्थ - रोखठोक,साक्षात यश संपादन करून रोकडे आडनाव सार्थ करून दाखवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.

शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा आर्ची व पूजापाठ करुन शिर्डीतील आदर्श विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणी फोटोची ट्रॅक्टर ला सजावट करून शिर्डी शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलीय..
ही मिरवणूक विठ्ठल मंदिरात आल्यानंतर शाळेचे आधारस्तंभ डॉक्टर प्रबोध जोशी यांनी विठ्ठल नामाचा जय घोष करत विद्यार्थ्यांसमवेत भजन कीर्तन करून विद्यार्थ्यांना व भाविकांना मंत्रमुग्ध केले त्याचप्रमाणे शाळेतील कर्मचारी वृद्ध यांनी यांनी भजन किर्तन सादर केले  
यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा करून आलेले शाळेतील विद्यार्थी कलाकार व इतर शाळेतील मुलांनी आपल्या कला सादर केल्याय.. कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना व भाविकांना आदर्श शाळा तसेच विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट तसेच स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम पाटील ट्रस्ट , साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी साई द्वारका सिक्युरिटी च्या वतीने महाप्रसाद केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले...
 वै लक्ष्मण महाराज वाकचौरे यांच्या प्रेरणेने ट्रस्टचे प्रेरणास्थान वै,भास्करावसखाराम गोंदकर यांच्या पत्नी गं, भा, श्रीमती सुमनबाई भास्कर गोंदकर , ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गोंदकर सर्व विश्वस्त मंडळ , राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, मा उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, किशोर गोंदकर , दीपक गोंदकर , सुशांत अवताडे , आशिष गोंदकर ,अभिजीत गोंदकर , अमोल सुपेकर , रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर, साई द्वारका सिक्युरिटी शिर्डी परिसरातील विठ्ठल भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवार, १६ जुलै, २०२४

शारदा शैक्षणिक संकुलातील चिमूरड्यांनी घेतला पायी दिंडी सोहळ्याचा आनंद

शारदा शैक्षणिक संकुलातील चिमूरड्यांनी घेतला पायी दिंडी सोहळ्याचा आनंद 

राहाता =
  रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पांडुरंगाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ, मृदंग, विना वाद्यांच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाची प्रत्यक्ष अनुभूती राहाता वासियांना दिली. चिमूरड्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केलेला होता. पाई वारी शारदा संकुलातून निघाली व वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात पोचली .या पायी दिंडीचे गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी स्वागत केले. शारदा शैक्षणिक संकुल हे एक उत्तम शिक्षण देणारे संकुल आहे .या संकुलामध्ये शिक्षणाबरोबरच संस्कृती जपली जाते असे सांगितले .
       संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी या बाल वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या .शुभेच्छा पर मनोगतामध्ये त्यांनी महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे .आज संपूर्ण महाराष्ट्र हा आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिमय झालेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये संतांची शिकवण व संत परंपरा आज आपल्याला दिसून येत आहे .आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर अहमदनगर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे इंग्लिश मीडियम च्या प्राचार्यां निशा चेंगोट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बाल वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते .

साईसेवा मतिमंद विद्यालयात विठ्ठल दिंडी सोहळा संपन्न

साईसेवा मतिमंद विद्यालयात विठ्ठल दिंडी सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


   आज दिनांक १६ जुलै २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून आषाढी वारी काढण्यात आली.
    पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिक-ठिकणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. त्याच अनुषंगाने साईसेवा निवासी मतिमंद मुला- मुलांची शाळा शिर्डी येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून विद्यालय प्रांगण ते श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डी इथपर्यंत विठ्ठलाच्या नामघोषात दिंडी काढण्यात आली. 
   दिंडीमध्ये विद्यार्थ्यांची वेशभूषा करण्यात आली. त्यामध्ये विठ्ठल, वारकरी, पालखी अशाप्रकारे वेशभूषा करण्यात आली. वेशभूषा करण्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर यांचे सहकार्य लाभले तसेच विशेष शिक्षक श्री बालाजी हनमंते सर व विशेष शिक्षक श्री दिपक कोकणे सर यांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगितली.          
     दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विविध वारकरी नृत्य सादर केले. यामध्ये शिर्डी परिसरातील ग्रामस्थांनी आनंदाने सहभाग घेतला व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
    हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.

आजारावर प्रतिबंध उपाय याबाबत मुलांनी आपल्या घरी व शेजारी ही जनजागृती करून डासांपासून संरक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे - डॉ संजय उबाळे


आजारावर प्रतिबंध उपाय याबाबत मुलांनी आपल्या घरी व शेजारी ही जनजागृती करून डासांपासून संरक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे 
   - डॉ संजय उबाळे

राहाता -
ग्रामीण रुग्णालय राहता आदर्श इंग्लिश मीडियम हायस्कूल शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने सात रोग प्रतिबंध उपाय जनजागृती कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला 
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातरोग व प्रतिबंध उपाय जनजागृती पर कार्यक्रम आदर्श इंग्लिश मीडियम हायस्कूल शिर्डी येथे पार पडला मलेरिया चिकन गुण्या व डेंगू आजाराबाबत माहिती देण्यात आली 
श्री संतोष भडांगे समुपदेशक राहता यांनी प्रास्ताविक केले व साथरोग व त्यावरील विद्यार्थी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले
संजय जासूद आरोग्य सहाय्यक यांनी गप्पी मासे व त्यांची उत्पत्ती स्थाने व उपाय यावर सखोल माहिती दिली व गप्पी मासे याबाबत ही मुलांच्या समस्यांचे निराकरण केले 
डॉक्टर संजय उबाळे यांनी मलेरिया चिकनगुनिया डेंगू कशामुळे होतो त्यावर उपाय व घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले डासांची निर्मिती ही निकामी टायर्स नारळाच्या करवंट्या ,कुलर मधील पाणी ,सेफ्टी टॅंक, परिसरात साठलेले पाणी, तुंबलेल्या गटारी यामध्ये प्रामुख्याने डासाची उत्पत्ती होते म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून व डेंगू आजार टाळू असे म्हटले व आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे उलटी होणे डोके दुखणे सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन औषध उपचार व रक्त तपासणी करून घेण्याचे व प्रतिबंध व उपाय याबाबत मुलांनी आपल्या घरी व शेजारीही जनजागृती करून डासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले 
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप परजणे सर सौ राजश्री धनवटे मॅडम सौ खुळे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. ग्रामीण रुग्णालयातील नवनाथ तायडे शरद मोरे गणेश चितळे आरोग्य सेवक यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी साठी खूप मेहनत घेतली 
 सौ खुळे मॅडम यांनी वेळात वेळ काढून ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले

सोमवार, १५ जुलै, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयात अंध प्रशिक्षण

साईसेवा मतिमंद विद्यालयात अंध प्रशिक्षण

शिर्डी  

 दिनांक १३ जुलै २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे अंध व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड असोसिएशन श्रीरामपूर कम्युनिटी अवरनेस प्रोग्राम ऑन डेफ ब्लाइंडनेस अँड मल्टी-सेन्सरी इम्पारमेंट संस्थेतर्फे विद्यालयातील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी या संस्थेतील रेश्मा तांबोळी, ठोकळ सर, खंडाळे सर, वैद्य मॅडम, चव्हाण सर यांचेकडून अंध प्रशिक्षण देण्यात आले. विद्यालयातील शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. या प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.
     हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

श्री साईबाबा संस्थानच्या महाविद्यालय स्थळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे नाम फलकाचे अनावरण

श्री साईबाबा संस्थानच्या महाविद्यालय स्थळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे नाम फलकाचे अनावरण

शिर्डी प्रतिनिधी : 
      राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या महाविद्यालय स्थळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेच्या नाम फलकाचे अनावरण 
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ गोंदकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून शिर्डी येथील विद्यार्थी शाखा सुरू करण्यात आली साईबाबा संस्थान प्रशासनाने भव्य दिव्य असे अद्यावत शैक्षणिक संकुल उभारले व सुरू केले हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गरजेचे होते त्याबद्दल संस्थांनचे स्वागतच आहे येथील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा या ठिकाणी सुरू केली आहे या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पाठीशी विद्यार्थी व विद्यार्थिनींची एक मजबूत बळकट फळी उभी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ गोंदकर यावेळी म्हणाले की श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मंडळाच्या त्रिसदस्यीय समितीने साईबाबा संस्थांनचे नवीन अद्यावत शैक्षणिक संकुल सुरू करून पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर केली आहे समितीचा हा निर्णय अत्यंत स्वागतहार्य आहे या शैक्षणिक संकुला कडे जाणारे रस्ते मात्र अरुंद असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून येजा करताना जीव मुठीत धरून चालावे लागते दरम्यान एखादे मोठे वाहन समोरून अथवा पाठीमागून आले तर विद्यार्थ्यांना मोठी तारेवरील कसरत करण्याची वेळ येते ही परिस्थिती बदलण्या करिता स्थानिक रहिवाशी अथवा नागरिकांना अबाधित ठेवत नवीन शैक्षणिक संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान होईल अशी उपाय योजना करणे गरजेचे आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासह इतर समस्यांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी तसेच शिर्डी शहरातील पदाधिकारी व विद्यार्थी मिळून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत शैक्षणिक संकुल व विद्यार्थ्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्याची विनंती करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ गोंदकर यांनी सांगितले याप्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे निलेश कोते अमित शेळके शहराध्यक्ष दीपक गोंदकर सरचिटणीस सुशांत औताडे तालुका अध्यक्ष पवन तुरकणे विद्यार्थी साई कोतकर साहिल मणियार निलेश चव्हाण पंकज गायकवाड साई त्रिभुवन साई धीवर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवार, १४ जुलै, २०२४

वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथी निमित्त रामदरा येथे वृक्षारोपण

वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथी निमित्त रामदरा येथे वृक्षारोपण 

शिर्डी प्रतिनिधी : 

इतिहासात अजरामर झालेले वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदीर परिसर येथे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या हस्ते पिंपळ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी गणेश काळभोर हवेली तालुकाध्यक्ष, गणेश पातडे,दादा कोळपे,सचिन महानवर,प्रविण जाधव,अभिषेक शेंडगे उपस्थित होते. 
दोन मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता. या वेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसातसुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. वीर शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. वीर शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यास ठार केले. तोपर्यंत छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर, सिद्दीने, सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले. त्या वेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना ‘ते विशाळगडावर पोहोचून तोफांनी इशारा करत नाहीत, तोपर्यंत ही खिंड लढवली जाईल,’ असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत वीर बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला प्राण सोडला. वीर बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड, पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

शनिवार, १३ जुलै, २०२४

श्री साईबाबा संस्थान ने संस्थानच्या माध्यमातून त्यांच्या जागेतील विविध दुकाने टेंडर पद्धतीने द्यावे अमृत गायके

श्री साईबाबा संस्थान ने संस्थानच्या माध्यमातून त्यांच्या जागेतील विविध दुकाने टेंडर पद्धतीने द्यावे
            अमृत  गायके 

शिर्डी =

        श्री.साईबाबा संस्थानने मंदिर परिसरातच प्रसाद व इतर व्यवसाय हे सर्व नोकरांच्या एम्प्लॉईज सोसायटीला दिल्यामुळे शिर्डीतील व्यावसायिक तसेच हातावर विक्री करून पोटभरणारे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.वास्तविक पाहता श्री.साईबाबा संस्थानची जागा ही एम्प्लॉईज सोसायटीला मोक्याच्या ठिकाणी दिलेली आहे.श्री.साईबाबा संस्थानचे कुठल्याही स्वरूपाचे निर्बंध नाहीत तसेच वस्तूच्या किमतीवर निर्बंध त्यामुळे खरेदी करणाऱ्या साईभक्तांना त्याची झळ ही साईभक्तांच्या खिशाला बसते.साईभक्त सुद्धा त्या वस्तूवर श्री.साईबाबा संस्थानचे नाव असल्याने कुठल्याही प्रकारचा संकोच न करता खरेदी करतात. तसेच दर्शन रांगेत मंदिर परिसरात साईनाथ मंगल कार्यालय,दारावतीधर्मशाळा, पाचशेरूम भक्त निवास  तसेच हजार रूम भक्तनिवास,साई प्रसादालय श्री.साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी अत्यंत अश्या मोक्याच्या ठिकाणी  एम्प्लॉईज सोसायटीला  जागा उपलब्ध करून दिली. असून सर्व ठिकाणी दुकाने  थाटले असून तसेच चप्पल व मोबाईल स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध करून दिली.असून चप्पल ठेवण्यासाठी मोफत तसेच मोबाईल लॉकर मध्ये ठेवण्यासाठी प्रत्येकी पाच रुपये घेतात,मोठ्या प्रमाणात साईभक्त हे मोबाईल लॉकर मध्ये ठेवत असतात,अमृतसरच्या तसेच शेगावच्या धरतीवर श्री.साईबाबा संस्थानने संस्थाच्या माध्यमातून चप्पल स्टॅन्ड व मोबाईल लॉकर साई भक्तांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांच्या हिताच्या दृष्टिकोनातून  विचार केला पाहिजे. यापासून श्री.साईबाबा संस्थानला काय उत्पन्न मिळते असा प्रश्न शिर्डी नागरिकांना पडला आहे.जर संस्थेला असा नियम असेल तर श्री.साईबाबा संस्थानने ऑनलाइन टेंडर काढून शिर्डीतील व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.त्यातून नक्कीच श्री.साईबाबा संस्थानचा आर्थिक फायदा होऊन श्री.साईबाबा संस्थान चे उत्पन्नात वाढ होईल.शिर्डी मधील शिर्डी विकास सोसायटी असेल शिर्डी शहरातील नागरी पतसंस्था   असेल त्याचप्रमाणे   शिर्डीतील महिला बचत गट असेल यांना श्री.साईबाबा संस्थानने व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी.याबाबत गांभीर्याने  श्री.साईबाबा संस्थानचे त्रीसदस्यीय समितीचे अध्यक्ष,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गोरक्ष गाडीलकर साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून निशिम साईभक्त आहे आणि आम्हाला खात्री आहे की श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांचा तसेच शिर्डीतील व्यवसायिकांचा हिताचा निर्णय घेतील वरील निवेदनाची त्रिसदस्यीय समितीने गांभीर्याने दखल घ्यावी अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे  ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...