श्रीरामपूर:
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी आपली कन्या कु. वैष्णवी मोरे हिच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या वया इतकेच झाडे लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्य त्यांचे पुतणे प्रमोददादा मोरे हे राज्यात नेटाने पुढे नेत असून या संस्थेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व पर्यावरण समतोल राखण्यासाठी वर्षभरातून विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी देखील प्रमोददादा मोरे यांनी पक्षांसाठी ज्वारीचे एक एकर क्षेत्र राखीव ठेवले होते. उन्हाळ्यात पक्षांसाठी मुठभर अन्न घोटभर पाणी ही योजना दरवर्षी ते राबवित असतात, त्यासाठी मातीची भांडी वाटप केली जातात. नुकतेच त्यांची कन्या कु. वैष्णवी मोरे हिच्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या वया इतकेच झाडे लावण्याचा उपक्रम त्यांनी नुकताच हाती घेतला. प्रत्येक घरात असा उपक्रम राबविला तर पर्यावरणाचा समतोल आणि वृक्षसंवर्धन होण्यास मदत होणार आहे. त्यांनी राजस्थानमधील पिंपलात्री गावचे सरपंच पद्मश्री, वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी शामसुंदर पालीवाल यांनी त्यांच्या गावात मुलीच्या जन्मानिमित्ताने १११ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा नियमच घालून दिला आहे. त्याचाच आदर्श म्हणून प्रमोददादा मोरे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, सचिव वनश्रीताई मोरे, सचिव मुख्याध्यापक अनिल लोखंडे, लतिका पवार, उत्तमराव पवार, उपाध्यक्ष प्रकाश केदारी, राज्य संघटक डॉ. शरद दुधाट, जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, सुभाष वाखारे, प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब साबळे, अमोल चंदनशिवे, पत्रकार कोंडीराम नेहे, पत्रकार विजय बोडखे, चंद्रकांत भोजने, बाळासाहेब ढोले सरपंच, बाळासाहेब गाडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा