शनिवार, २० जुलै, २०२४

सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे  यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 

राहाता =
 सैन्य दलातील नायक या पदावर कार्यरत असणारे राहाता तालुक्यातील केलवड येथील गणेश दगडू गोर्डे (वय 36) यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोर्डे यांच्यावर केलवड या त्यांच्या गावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना काल रात्री 8 वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. केलवड पिंपळस शिवेवरील गोर्डे वस्तीवरुन तर केलवड मधील स्मशानभुमिपर्यंत सैन्यदलाच्या वाहनामधून मिरवणूक काढण्यात आली होती.
अमर रहे... अमर रहे... नायक गणेश गोर्डे अमर रहे। भारत माता की जय, देश सेवा करणार्‍या या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देतांना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. राहात्याचे तहसिलदार अमोल मोरे यांनी तसेच विखे कुटूंबियांच्या वतीने सौ. सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील, गणेश चे माजी अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, सरपंच दिपकराव कांदळकर, पोलिस पाटील सुरेश गमे, माजी पोलिस पाटील सुभाषराव गमे, डॉ. राजेंद्र पिपाडा, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, सैन्यदलातील अधिकार्‍यांकडून, माजी सैनिकांकडून, तसेच वैयक्तिकरित्याही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. सैन्यदलाकडून तसेच पोलिस दलाकडून या जवानाला बंदूकीतुन हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. दोन हजार नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप दिला. नायक गोर्डे यांच्या पत्नी कविता यांनी साश्रु नयनांनी आपले पतीस व मुलगी काव्य हिने साश्रू नयनांनी आपल्या पित्यास पुष्पअर्पण करत श्रध्दांजली वाहिली.
 नायक गणेश गोर्डे हे उत्तरप्रदेशातील झाँसी येथे सैन्यदलात कर्तव्यास होते. सेवाबजावत असतानेच त्यांना म्युकर मायकोसिस या आजाराची बाधा झाली. लखनौ येथे सैन्यदलाच्या कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतानाच त्यांची शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. जवान गोर्डे हे 16 वर्षापुर्वी सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, आई, असा परिवार आहे. बाळासाहेब दगडू गोर्डे बंधू तर नरेश राऊत फौंडेशनचे सेक्रेटरी प्रा. लक्ष्मण गोर्डे यांचे ते पुतणे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...