मंगळवार, १६ जुलै, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयात विठ्ठल दिंडी सोहळा संपन्न

साईसेवा मतिमंद विद्यालयात विठ्ठल दिंडी सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


   आज दिनांक १६ जुलै २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून आषाढी वारी काढण्यात आली.
    पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिक-ठिकणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. त्याच अनुषंगाने साईसेवा निवासी मतिमंद मुला- मुलांची शाळा शिर्डी येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून विद्यालय प्रांगण ते श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डी इथपर्यंत विठ्ठलाच्या नामघोषात दिंडी काढण्यात आली. 
   दिंडीमध्ये विद्यार्थ्यांची वेशभूषा करण्यात आली. त्यामध्ये विठ्ठल, वारकरी, पालखी अशाप्रकारे वेशभूषा करण्यात आली. वेशभूषा करण्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर यांचे सहकार्य लाभले तसेच विशेष शिक्षक श्री बालाजी हनमंते सर व विशेष शिक्षक श्री दिपक कोकणे सर यांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती सांगितली.          
     दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विविध वारकरी नृत्य सादर केले. यामध्ये शिर्डी परिसरातील ग्रामस्थांनी आनंदाने सहभाग घेतला व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
    हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...