आजारावर प्रतिबंध उपाय याबाबत मुलांनी आपल्या घरी व शेजारी ही जनजागृती करून डासांपासून संरक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे
- डॉ संजय उबाळे
राहाता -
ग्रामीण रुग्णालय राहता आदर्श इंग्लिश मीडियम हायस्कूल शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने सात रोग प्रतिबंध उपाय जनजागृती कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातरोग व प्रतिबंध उपाय जनजागृती पर कार्यक्रम आदर्श इंग्लिश मीडियम हायस्कूल शिर्डी येथे पार पडला मलेरिया चिकन गुण्या व डेंगू आजाराबाबत माहिती देण्यात आली
श्री संतोष भडांगे समुपदेशक राहता यांनी प्रास्ताविक केले व साथरोग व त्यावरील विद्यार्थी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले
संजय जासूद आरोग्य सहाय्यक यांनी गप्पी मासे व त्यांची उत्पत्ती स्थाने व उपाय यावर सखोल माहिती दिली व गप्पी मासे याबाबत ही मुलांच्या समस्यांचे निराकरण केले
डॉक्टर संजय उबाळे यांनी मलेरिया चिकनगुनिया डेंगू कशामुळे होतो त्यावर उपाय व घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले डासांची निर्मिती ही निकामी टायर्स नारळाच्या करवंट्या ,कुलर मधील पाणी ,सेफ्टी टॅंक, परिसरात साठलेले पाणी, तुंबलेल्या गटारी यामध्ये प्रामुख्याने डासाची उत्पत्ती होते म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून व डेंगू आजार टाळू असे म्हटले व आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे उलटी होणे डोके दुखणे सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन औषध उपचार व रक्त तपासणी करून घेण्याचे व प्रतिबंध व उपाय याबाबत मुलांनी आपल्या घरी व शेजारीही जनजागृती करून डासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप परजणे सर सौ राजश्री धनवटे मॅडम सौ खुळे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. ग्रामीण रुग्णालयातील नवनाथ तायडे शरद मोरे गणेश चितळे आरोग्य सेवक यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी साठी खूप मेहनत घेतली
सौ खुळे मॅडम यांनी वेळात वेळ काढून ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा