राहाता प्रतिनिधी -
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान सोहळा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृती प्रमाणे अतिशय मोठी आहे .सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना गुरु समान मानले पाहिजे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणली पाहिजे. त्याच्यातून आपले जीवन यशस्वी होऊ शकते असे सांगितले.
संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहमदनगर यांनीही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात व्यसनमुक्त राहिले पाहिजे. गुरूंचा आदर केला पाहिजे .गुरु मुळे आपले जीवन घडते असे सांगितले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. त्यांनी गुलाब, पुष्प ,शाॅल ,श्रीफळ देऊन संकुलातील सर्व शिक्षकांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भाषणातून गुरूंच्या प्रति आदर व्यक्त केला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे ,प्राचार्या निशाचे चेंगोट, उपप्राचार्य अशोक बोरसे, प्रा.शरद गमे ,रमेश आहेर ,प्रा.राजेंद्र पटारे ,रणजीत पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा