गुरुवार, २५ जुलै, २०२४

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चोरडीया कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन मंजुर


ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चोरडीया कुटुंबीयांचा अटकपूर्व
 जामीन मंजुर


राहाता प्रतिनिधी=
    दि. १४/०७/२०२४ रोजी राहाता शहरातील नगर मनमाड महामार्गावरील जितेंद्र वुमन्स च्या मालकाच्या मुलाने पिडीतेस जिवे मारण्याची धमकी दिली व जाब विचारण्यास गेली असता पिडीता व तीचे नातेवाईकांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राहाता पोलिस स्टेशन मध्ये सार्थक चोरडीया, निलेश चोरडीया, कमलेश चोरडीया, जिनेश चोरडीया यांचे विरूद्ध भारतीय न्याय संहीतेच्या कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११५ (२) व ३५२ व ॲडव ॲट्रॉसीटी कायद्याचे कलम ३ (१) (आर) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

चोरडीया कुटुंबीयांचे वतीने राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामी ॲड. श्री. जयंत आत्माराम जोशी यांनी कामकाज पाहीले. चोरडीया कुटुंबीयांविरूद्ध दाखल गुन्हा हा खोटा असुन त्यांना झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याला शह देण्यासाठी खोटा ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद केला. सोबतच जितेंद्र वुमन्स येथील घटणेच्या वेळचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व चोरडीया कुटुंबीयांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून ॲट्रॉसीटीचा गुन्हा खोटा असल्याचा युक्तीवाद करून प्रथमदर्शनी ॲट्रॉसीटी कायद्याच्या तरतुदी प्रकरणास लागु होत नसल्याने अटकपूर्व जामीन मंजुर करण्याची विनंती त्यांनी मा. न्यायालयास केली.

प्रकरणात सरकारी वकील, मुळ फिर्यादीचे वकील व चोरडीया कुटुंबीयांचे वतीने ॲड .श्री. जयंत जोशी यांचे युक्तीवाद ऐकुन तसेच सदरील युक्तीवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी शर्तीसह चोरडीया कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन राहाता येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. अमेटा साहेब यांनी दि. २३/०७/२०२४ रोजी मंजुर केलेला आहे.
  
  तसेच यावेळी जेष्ठ विधीज्ञ श्री जयंतराव जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ॲड. व्यंकटेश खीस्ते, ॲड.योगेश दाभाडे,ॲड. प्रशांत कोते व ॲड.आरती सरोदे यांनी काम पाहिले.
  सदर जामीन प्रकरणाकडे राहाता तालुक्यातील संपुर्ण व्यावसायीक क्षेत्राचे लक्ष लागलेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...