राहाता=
राहाता वकील संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री ॲड शामराव डांगे यांची नुकतीच निवड झाली गेल्या दहा बारा दिवसां पासून प्रचंड उत्साह आणि इच्छाशक्तीने विधीज्ञ श्री शामजी डांगे पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतली व दणदणीत विजय मिळविला आहे हा विजय शामराव यांच्या सोज्वळ स्वभावाचा विजय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ श्री जयंतरावजी जोशी साहेब यांनी सत्कार करताना केले, सत्कार प्रसंगी जेष्ठ विधिज्ञा सौ शितल वारुळे, राहाता वकील संघाच्या मा.उपाध्यक्षा सौ.योगिनी बेल्हेकर ,जेष्ठ विधीज्ञ योगेश कोरडे, ॲड. व्यंकटेश खिस्ते, ॲड.योगेश दाभाडे, ॲड. अमोल सदाफळ , ॲड. विकास डांगे, ॲड.अतूल माळवदे, ॲड. माऊली डोंगरे ॲड. उल्हास कालेकर ॲड. प्रशांत कोते, ॲड. संदीप उगले, ॲड. सौ रश्मी बोथरा, ॲड. सौ शिवानी झाडे, ॲड. सौ आरती सरोदे,सूरज बनसोडे, हे सर्व जण उपस्थित होते व शामराव डांगे पाटील यांना भावी काळा साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
राहाता वकील संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री ॲड शामराव डांगे पाटील यांनी आपल्या सर्वांचे अमूल्य योगदान,मत आणि जेष्ठ विधीज्ञ श्री जयंतराव जोशी साहेबांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत व राहाता वकील संघाच्या उन्नती व्हावी यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व कामे करत राहू अशी भावना व्यक्त केली आणि सर्वांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा