शुक्रवार, २६ जुलै, २०२४

साई सेवा मतिमंद विद्यालयाचे विशेष यश

साई सेवा मतिमंद विद्यालयाचे विशेष यश

शिर्डी प्रतिनिधी : 

    आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी प्रवरानगर लोणी ता. राहाता जि.अहमदनगर येथे बौद्धिक अक्षमता ( दिव्यांग) विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय कला व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये विशेष यश मिळवले. 
    समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) अहमदनगर व स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र, अहमदनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौद्धिक अक्षमता विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय कला व स सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ प्रवरानगर लोणी PVP कॉलेज येथे पार पडल्या.
   सदर कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व गायन स्पर्धा अशा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विशेष यश मिळविले.      
     त्यामध्ये वयोगट ८ ते १२ चित्रकला रंगभरण -साई किरण शिंदे : द्वितीय गायन -गणेश कृष्णा जाधव : द्वितीय, वयोगट १७ ते २१ चित्रकला रंगभरण -दत्ता वाल्मिक धाकतोडे : द्वितीय, क्राफ्ट, कागदी वस्तू बनवणे- साहिल गणेश बोधक: तृतीय अशी पारितोषिक मिळवली.
     सदर पारितोषिके ही नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले. सदर विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे तसेच कर्मचारी श्री संकेत जगधने व साईसेवा टिचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथील विद्यार्थी अतुल शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...