राहाता येथे २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.
राहाता=
राहाता तालुका माजी सैनिक संघटना व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिलकुमार निकाळे चौक येथे "कारगिल विजय दिवस" उत्साहात साजरा करण्यात आला..*
*याप्रसंगी तहसिलदार अमोल मोरे,नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी वैभव लोंढे, राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ साहेब, माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे,माजी सैनिक संघटना अध्यक्ष फ्रान्सिस भारुड, तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व राहाता ग्रामस्थ , हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांचे बंधू राजेंद्र निकाळे या कार्यक्रमाला हजर होते..*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी करताना सांगितले की, हा २५ वा कारगिल विजय दिवस भारतभर साजरा होत असून यामुळे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठ, सामाजिक आदर्श समाजात वाढीस लागले.. यानंतर माजी सैनिक सत्यशोधक भानुदास गाडेकर यांनी सांगितले की, "कारगिल विजय दिवस हा कारगिल युध्दात शहीद झालेल्या युध्दवीरांना स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच देशातील नागरिक व तरुणांमध्ये देशप्रेम व कर्तव्याची भावना वाढीस लागावी यासाठी साजरा केला जातो.." याप्रसंगी मेजर संजय राजगुरू यांनी मनोगत व्यक्त करुन ते स्वतः कारगिल युध्दात सहभागी होते हे सांगितले..
यानंतर डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांनीही पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.. याप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान कोरडे, तलाठी कोळगे,अरुण टिळेकर, तात्यासाहेब कोरडे,संजय राजगुरू,अशोक राजगुरू,गिते,वसंत सदाफळ, अविनाश निर्मळ,डांगे,दगडूपंत काटे, विष्णू गायकवाड,महेश हिरवे, कॅप्टन गायकवाड तसेच ग्रामस्थ अरुण कोरडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत सदाफळ,रवी बोठे,विजय आवारे उपस्थित होते..शेवटी आभार अरुण टिळेकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा