सोमवार, २९ जुलै, २०२४

ताराबाई ची साडी ठरली जीवनाची दोरी...नदीपात्रात बुडणाऱ्या दोघांचे वाचवले प्राण....


ताराबाई ची साडी ठरली जीवनाची दोरी...
नदीपात्रात बुडणाऱ्या दोघांचे वाचवले प्राण....

शिर्डी =.राजेंद्र दूनबळे 

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात असलेल्या आपल्या विद्युत मोटारी वरती काढत असताना पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यामुळे त्या प्रवाहात संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण वाहून जात असताना शेजारी शेळ्या चारणाऱ्या ताराबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीसाठी धावून आले. ताराबाईने प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरील साडी क्षणार्धात सोडून ती बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली त्या साडीच्या साह्याने त्यातील दोन तरुणांना वाचवण्यात यश आले परंतु संतोष भीमाशंकर तांगतोडे वय वर्ष 25 या तरुणाचा दुर्दैवी बुडून अंत झाला. ताराबाईच्या चेहऱ्यावरती दोघांना वाचवल्याचा आनंद तर दिसतोच परंतु एकाला वाचू शकले नाही याचे दुःख व्यक्त करताना ती धाय मोकलून रडते. दोन तरुणांना जीवदान देणाऱ्या अशा या शूरवीर मातेच्या शौर्याचे कौतुक करून तिचा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी सत्कार केला. ताराबाई या आदिवासी महिलेची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून तिला राहायला चांगल्या प्रकारे घर नाही. शासनाकडून तिला आर्थिक मदत व शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...