लायन्स क्लब च्या वतीने हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या
6 मुलींना नवीन ड्रेस, खाऊ व शाळाउप्योगी वस्तू देऊन वाढदिवस साजरा
राहाता=
लायन्स क्लब च्या टेमर लायन आसावरी बेंद्रे यांचे चि.अविश विशाल बेंद्रे याच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब राहाता यांचे सहकार्याने क्लबचे टेमर लायन सौ, आसावरी बेंद्रे
यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला सेंट जॉन स्कूल
येथील हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या
6 मुलींना नवीन ड्रेस, खाऊ व शाळाउप्योगी वस्तू देऊन व 2 आंबा वृक्षाचे वृक्षारोपण करून त्या मुली सोबत वाढदिवस साजरा केला यासाठी बेंद्रे काका व त्यांचे सर्व कुटुबातील सदस्य आवर्जून उपस्थित होते
राहाता लायन्स क्लबच्या वतीने प्रत्येक लायन्स सभासद यांचा वाढदिवस घरी साजरा न करता गरजू मध्ये जावून साजरा करण्याचे ठरले आहे,त्यामुळे सर्व एकत्र येतात विचाराची देवाणघेवाण होते, लायन्स क्लबचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन प्रकशजी सदाफळ,डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ,संजय उबाळे यांच्या पुढाकाराने वाढदिवस साजरा केला, झाडे लाऊन नवीन पायंडा पडला आहे,त्यामुळे प्रत्येकाने वर्षभर आपल्या घरातील सभासद यांच्या वाढदिवशी एक तरी झाड लावण्याची लायन्स सभासद यांना विनंती केली व सर्वांनी मान्य करून घरी साजरा न करता गरजू लोकांना,गरजू मुले व मुली यांना मदत करण्याचे ठरले आहे, फादर पॉली यांनी अविश बेंद्रे साठी प्रार्थना केली व त्याला शुभेच्छा देऊन वाढदिवस या मुलीसोबत साजरा केला म्हणून लायन्स क्लब राहता चे कौतुक करून असेच सामाजिक कामे करून एक आदर्श निर्माण केला आहे, प्रत्येकाने आपले दातृत्व दाखवण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मोठेपणा बेंद्रे कुटुंबाने दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानले
या कार्यक्रमासाठी फादर पॉली डिसिल्वा, फादर आनंद बोधक, फादर जॉन गुलदेवकर, सिस्टर एलिझाबेथ फर्नांडिस सिस्टर
प्रियांका, सिस्टर वर्षा त्रिभुवन
रवींद्र गायकवाड सर,लायन्स क्लब च्या मा. अध्यक्षा अंजली उबाळे ट्रेजरर व्यंकटेश अहिरे.सेक्रेटरी लायन ऍड दिनेश कारले, लायन विजय धनवटे लायन्,राजेंद्र बांगर उपाध्यक्ष,पत्रकार राजुभाई पठाण,लायन सरला तायडे , सौ .मंडलिक मॅडम,प्रकाश बेंद्रे,संजय वाघमारे,हरीश श्रीखंडे, रोहम काका, सोहन उबाळे व सर्व बेंद्रे फॅमिली तील सभासद हजर होते
रवी गायकवाड सर यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा