संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
सोमवार, ३० जून, २०२५
साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पुन्हा गुणवंत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायकल वितरण.
साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पंधरावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न*- नेत्रसेवा हीच साईसेवा
रविवार, २९ जून, २०२५
साई भक्तांकडून सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
शनिवार, २८ जून, २०२५
भारतीय जैन संघटना उत्तर आहिल्यानगर मेळावा शिर्डी येथे संपन्न
भारतीय जैन संघटना उत्तर आहिल्यानगर मेळावा शिर्डी येथे संपन्न
महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन राज्यभर जलक्रांतीचे काम झाले. ओढे नाले तलाव भरल्यामुळे शेतक-यांना शेती व पशुधनासाठी नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे ब-याच अंशी गोहत्या होण्याला रोख बसला. लातुरचा भुकंप असो किंवा पुरग्रस्तांचा विषय,कोविड सारखी आपत्तीच्या काळात भारतीय जैन संघटना अहोरात्र कार्य करत होती सामाजिक कामामध्ये देशपातळीवर निस्पृहपणे काम करणारी संघटना म्हणुन भारतीय जैन संघटनेची ख्याती आहे. अधुनिक युगातील कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे काम भारतीय जैन संघचटनेच्या माध्यमातुन चालु आहे. असे मनोगत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले. शिर्डी येथे भारतीय जैन संघटनेचा उत्तर अहिल्यानगर जिल्हाचा मेळावा पार पाडला. यात भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय,राज्य व जिल्हास्तरिय पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा, संघपती अनिलजी पिपाडा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडा,अँड.बाठीया, स्वप्निलजी भंडारी, संतोषजी लोढा,निलेशजी गंगवाल,आशिष राका,प्राजक्ता भंडारी, संतोषजी चोरडीया,ललितजी मुनावत, जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला, भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,संघपती अनिलजी पिपाडा,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडाआदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकलाजी पुढे म्हणाले की, समाजातील नव युवक व युतींसाठी जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुळ उद्देश होता. 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या नैतीक जबाबदा-या न विसरता समाजपयोगी कार्य करत राहणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची होती त्यावेळी घरातील जेष्ठ सदस्यांचा आदरपूर्वक वचक होता. कुटुंब प्रमुख म्हणून तेच मुलामुलींच्या विवाहाचे निर्णय घेत होते, आता मुलामुलींच्या पसंती शिवाय पुढील निर्णय होत नाहीत. कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम बीजेएसच्या माध्यमातून होत आहे. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या सहित इतरही वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा समाजातील तरुण युवकांनी अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. घरातील जेष्ठ मंडळींनी तरुणांना धाडसी बनवले पाहिजे. गुंडगिरी व दहशत यांच्या विरोधात तरुणांनी एकत्र येवुन प्रतिकार केला पाहिजे. अहिंसेचा अर्थ अन्याय सहन करणे असा नाही. दडपशाहीला न जुमानता तरुणांनी संघटन वाढवुन पुढे येण्याची गरज आहे. धाडसी समाज असल्याची ओळख निर्माण कऱणे गरजेचे आहे. फक्त व्यापार व्यवसाय न बघता समाजिक व राजकीय क्षेत्रात येवुन आपले योगदान देणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचा सिंहाचा वाटा आहे. दान धर्म असेल किंवा गो-रक्षा असेल अशा प्रत्येक क्षेत्रात जैन समाज आपले योगदान देत असतो.
(डॉ.राजेंद्र पिपाडा)
शुक्रवार, २७ जून, २०२५
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
मंगळवार, २४ जून, २०२५
शिर्डीतील साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर
कृषि विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन
मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट देखील जागा पाण्यापासून वंचित ठेवणार नाही ◻️माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही
सोमवार, २३ जून, २०२५
दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !डॉ. सुजय विखे
दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथमस्थानी !
डॉ. सुजय विखे :
संवत्सर येथे 210 दिव्यांग, वयोवृद्धांना सहाय्यक साहित्य वाटप

कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी
कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नुकतेच काही स्नेही, नातेवाईक व हितचिंतक व्यक्तींचे दुःखद निधन झाले.
रहिमपूर येथील कै.भीमाजी बाबुराव शिंदे, मनोली येथील कै.अलका सोपान शिंदे, कोल्हेवाडी येथील कै. प्रयागाबाई देवराम दिघे आणि सोनगाव सात्रळ येथील कै.अमरीश किशोर भांड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कृषीभूषण सौ.प्रभावती जनार्दन घोगरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या दु:खद प्रसंगात आपण कुटुंबीयांसोबत आहोत, ही भावना सौ.घोगरे यांनी व्यक्त केली.
त्यांनी सर्व दिवंगत आत्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत ईश्वरचरणी प्रार्थना केली की, “या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला लाभो.”
रविवार, २२ जून, २०२५
AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न
AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न
शेतकऱ्याचा आपल्या प्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो डॉ सुजय विखे
राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचे काम करीत होत्या. या महिलेने अतिशय साधेपणाने "या ना शेतात... थोड्या शेंगा खा!" म्हणून बोलावले असता, तेथे थांबलो आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.

त्यांच्या साधेपणात आणि स्वागतात असणारी आपुलकी यावेळी मनाला खूप भावली. शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो. दरम्यान शेतात गेलो, जमिनीवर बसलो, मातीचा गंध घेतला आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिला.

यावेळी पीक, पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या. ही फक्त एक भेट नसून माणुसकीची, मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती. एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली.
श्री गणेश विद्यालयामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
शुक्रवार, २० जून, २०२५
सौ.प्रभावतीताई घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; वृक्षारोपण, सन्मान कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जपली
साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत
साई आश्रम येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा साई भक्ताचे मौल्यवान वस्तू पैसे परत
शिर्डी
श्री साई आश्रम भक्तीनिवास येथे दिनांक 19.06.2025 शिफ्ट 22/6 मध्ये H इमारतीच्या आऊट गेटवर गोरे केशव बारकू आणि साई सुभाष गायके यांना 01 सोन्याची चैन व 02 सोन्याच्या बांगड्या अंदाजे किंमत 02 लाख रोख रक्कम 3100 रुपये पर्स व त्या व्यक्तीचे पासपोर्ट फोटो सापडले होते. सदरच्या वस्तू ह्या प्रमोद सिहं राहणार उत्तर प्रदेश यांच्या होत्या त्यांनी H इमारतीत रूम नंबर H119 व H127 रूम बुक केलेली होती. सदर साईभक्त यांची त्या पर्स मधील फोटो पाहून ओळख पटवून मुद्देमाल त्यांना परत केला त्यांना त्यांचा ऐवज परत मिळाल्याबाबत लेखी घेण्यात आले. श्री विजय वाणी अधीक्षक म्हणाले की कर्मचाऱ्यांनी साई भक्तांशी प्रामाणिकपणे काम केल्यास साईबाबा निश्चित फळ देतील
जि. प. प्रा. शाळा एकरूखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
जि. प. प्रा. शाळा एकरूखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

राहता तालुक्यातील एकरुखे येथील जि.प. प्राथमिक शाळा एकरूखे येथे इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या नवागत मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाची संपूर्ण गावात प्रवेश फेरी झाली. नवीन दाखल मुलांना बैलगाडी सजवून गाडीतून संपूर्ण गावामध्ये संगीत ,ढोल ताशांच्या वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी नवीन मुलांना चॉकलेट, खाऊचे वाटप केले. प्रवेश फेरी शाळेत आल्यानंतर सर्व नवागत मुलांचे शाळेच्या गेट पासूनच फुलांच्या पाकळ्या फेकून जोरदार स्वागत करण्यात आले. मुलांना विविध खेळणी, फुगे देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

नवागतांचे पहिलं पाऊल ठसे घेऊन त्यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जितेंद्र पा. गाढवे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी श्री जालिंदर पाटील गाढवे, श्री मधुकर सातव एस एम सीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पगारे, सदस्य श्री रविंद्र भवर व इतर बहुसंख्य पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश , पाठ्यपुस्तक, बूट,साँक्स व वहयांचे वाटप करण्यात आले. मुख्या. श्री राधाकिसन दळवी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,

निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पायी दिंडी (वारी) करत जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रंबकेश्वर येथून निघणारी *संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी* अहिल्यानगर जिल्ह्यात 16 जून रोजी पारेगाव या ठिकाणी दाखल झाली होती. या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. तसेच मंगळवार दिनांक 17 जून रोजी राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता.
गोगलगाव या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या BBA अभ्यासक्रमाच्या 30 विद्यार्थ्यांनी नाशिक चे सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेष तज्ञ डॉ. भरत केळकर यांच्या समन्वयाने व संजीवनीचे प्रा. सुधांशू भट यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल वारी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
*निर्मल वारी अभियान हे वारी मार्गाच्या मुक्कामाच्या ठिकाणी राबविले जाते. या अभियानाला 2015 पासून सुरुवात झाली*. या अभियाना अंतर्गत वारी ज्या ठिकाणी मुक्काम करते त्या ठिकाणी काही फिरत्या शौचालयांची उभारणी केली जाते. व वारकऱ्यांना आग्रह केला जातो की त्यांनी शौचालयांचा वापर करावा. एका ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर ही सगळी शौचालय पुन्हा दुसऱ्या गावांमध्ये नेली जातात. म्हणजे वारकरी दुसऱ्या गावात जाऊन पोहोचेपर्यंत ही सगळी व्यवस्था त्या गावात पोहोचलेली असते. या अगोदर अशा विविध मुक्कामांच्या ठिकाणी वारकरी आपला प्रातर्विधी उघड्या जागेवर करत असत, त्यामुळे वारी गावातून गेल्यानंतर त्या ठिकाणी अस्वच्छता, रोगराई वाढत असे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत असे. त्यावर उपाय म्हणून निर्मल वारी अभियान राबविण्यात येते.

बुधवार, १८ जून, २०२५
प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...
सरकारने दुधाला प्रति लिटर 50 रुपये दर द्यावा. विठ्ठलराव शेळके
जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट- गटविकास अधिकारी
मंगळवार, १७ जून, २०२५
योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद
Featured post
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील दाढ बुद्रुक आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...
-
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी नियुक्ती राहाता तालु...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणप...
