शुक्रवार, २० जून, २०२५

सौ.प्रभावतीताई घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; वृक्षारोपण, सन्मान कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जपली

सौ.प्रभावतीताई घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; वृक्षारोपण, सन्मान कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जपली

लोणी खुर्द (ता. राहाता) :



काँग्रेसच्या महिला नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटी व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम केला.


सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. प्रभावतीताई घोगरे या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब, शेतकरी, महिला व सामान्य जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवणाऱ्या संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

वाढदिवसानिमित्त लोणी खुर्द येथील युवक कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून सामाजिक जागृती आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


सकाळपासूनच जिल्ह्यातील मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, पोस्टर, फोटो आणि व्हिडीओद्वारे मोठ्या प्रमाणात काकींना शुभेच्छा मिळाल्या.

गणेश परिसर व प्रवरा परिसरातील अनेक चाहत्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सौ. प्रभावतीताईंचा सत्कार केला व त्यांच्या कार्याची स्तुती केली.


घराणं गौरवशाली...

सौ. प्रभावतीताई यांचं कुटुंब हे राजकीय व सामाजिक परंपरेने समृद्ध आहे –
🔹 वडील- स्व. शंकरनाना पाटील खर्डे, कोल्हार येथील अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष
🔹 भाऊ - श्री.सुरेंद्र पाटील खर्डे, कोल्हारचे माजी सरपंच
🔹 सासरे - शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील
🔹 पती - लोणी खुर्दचे सध्याचे सरपंच श्री. जनार्दन घोगरे

या गौरवशाली कुटुंबाची परंपरा पुढे नेत, सौ. प्रभावतीताई घोगरे या सामाजिक न्याय आणि जनसेवेची नवी दिशा ठरवताना दिसतात. वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेले उपक्रम हे त्यांच्या लोकसंग्रहाचे आणि कार्याबद्दलच्या विश्वासाचे प्रतीक ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...