श्री गणेश विद्यालयामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर च्या भव्य प्रांगणामध्ये 21 जून 2025 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले जीवनातील प्राणायाम आणि योग याचे महत्त्व सांगितले शरीर निरोगी राहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रोज प्राणायाम आणि योगा करावे असे आव्हान केले
यावेळी विद्यालयातील श्री धनवडे सर यांनी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम आणि योगा करून घेतले विद्यालयातील शिक्षक श्री तनपुरे सर ,झडे सर ,वसावे सर , घोरपडे सर ,श्रीमती वराडे मॅडम ,सौ उंडे मॅडम श्रीमती शहारे मॅडम, गांगुर्डे मॅडम, भांगरे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांसमवेत योगा आणि प्राणायाम करण्यामध्ये सहभाग नोंदवला.
मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधून मनशांतीसाठी अतिशय छान पैकी सर्व योगासने मन लावून केली विद्यार्थ्यांना यावेळी अतिशय आनंद वाटला श्री भोये कैलास सर यांनी सर्व कार्यक्रमाचे फोटोशूट व व्हिडिओ तयार केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा