योग प्राणायाम शिबिरास उदंड प्रतिसाद

सालाबादप्रमाणे योगदिनाचे औचित्य साधत राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे पाच दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराच्या पहिल्या दिवशी योगसाधकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.जनसामान्यात निरोगी आरोग्याची सजगता वाढविण्यासाठी साईयोग फाउंडेशन गेल्या अकरा वर्षांपासून राहाता शहरात सावता महाराज मंदिरात पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन करत आहे.तसेच नंतर वर्षभर राहाता नगरपालिकेच्या हॉल मध्ये पहाटे सर्वांसाठी मोफत योग वर्ग सुरु आहेत.
या शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर,नायब तहसीलदार हेमंत पाटील,दहेगावच्या सरपंच पूनम डांगे,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,अरुण मोकळ,प्रमोद तोरणे,बाळासाहेब गाडेकर,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ अंजली पानगव्हाणे,सुष्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते साई प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी योगगुरू भिंगारदिवे यांच्या शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीने योग शिकवण्याच्या कलेचे कौतुक करत सर्व योगसंधकांनी या शिबिराला नियमित उपस्थित राहून सहभागी होत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,दशरथ तुपे,भाऊसाहेब बनकर,दीपक गाडेकर,माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ,प्रकाश पुंड,गोरखनाथ दंडवते,विलास वाळेकर,मनोज पिपाडा,संजय बाबर,संदीप डांगे,ॲड दिगंबर धनवटे,बबलू फटांगरे,दीपक दंडवते,मिलिंद बनकर,संजय वाघमारे,अनिल सातव,विष्णू गाडेकर,रंगनाथ सदाफळ,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,म्हसुपाटील सदाफळ,रवींद्र धस,अंकुश गांधी,उज्वला गाडेकर,नीलम चेनुके,आरती सदाफळ,कांचन बावके,सातव मॅडम,स्नेहल भागवत,दिव्या बाबर,सिद्धी डांगे,साईशा चव्हाण,नामदेव गवते,मेजर बाभुळखे,देविदास नागरे,परमेश चव्हाण,स्वप्निल गवते,सागर माळवेडॉ प्रवीण राठोड,सचिन डांगे आदी साईयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील चार दिवस जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करत सर्वांचे आभार मानले.शेवटी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रवाश्यांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा