जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट- गटविकास अधिकारी
शैक्षणिक वर्ष 2025 26 आज दिनांक 16 जून पासून सुरू झाले, शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे आपल्या सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतही नवागतांचे स्वागत खूप उत्साहात संपन्न झाले .
या कार्यक्रमासाठी उपसंचालक ,अर्थ व सांख्यिकी अधिकारी अहिल्यानगर येथील शिरीष व्हरसाळे, गटविकास अधिकारी पंडित वाघेरे, लोकनियुक्त सरपंच ओमेश् जपे, उपसरपंच विकास जपे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे ,पत्रकार राजू दुनबळे ,पत्रकार राज गडकरी , माजी उपसरपंच गणेश कापसे, ग्रामविकास अधिकारी कार्ले भाऊसाहेब , ग्रामपंचायत सदस्य आशिष आगलावे, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे, मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर जपे ,साईनाथ निकम ,उपाध्यक्ष अनिता ढगे उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी आलेल्या सर्व मुलांची वाद्यसह मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ला दाखल झालेल्या सर्व मुलांचे शाळेतील शिक्षकांनी औक्षण केले. सुंदर प्रकारे शाळेची रंगरंगोटी झालेली असल्याने सजावट आकर्षक केली. मान्यवरांच्या असते सर्व मुलांना गुलाब पुष्प वाटप करण्यात आले. आलेले अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व मुलांना गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शूज सॉक्स, देखील वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी पंडित वाघेरे म्हणाले ,की जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवनाची उजेड वाट आहे. या शाळेत शिक्षक वृंद अतिशय अभ्यासू, हुशार आणि मेरिट चे आहेत, त्याचप्रमाणे शाळेतील गुणवत्ता देखील खूप उत्कृष्ट आहे ,त्यामुळे बाहेरील झगमगटाकडे पाहण्यापेक्षा गुणवत्तेकडे पाहून या ठिकाणी आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा. शाळेतील सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केले .
त्याचप्रमाणे अर्थ व सांख्यिकी अधिकारी शिरीष व्हरसाळे म्हणाले की जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षणाचा पाया भक्कम झाला की पुढे जीवनामध्ये कुठलीही अडचण येत नाही. शाळेतील वातावरण निसर्गरम्य, प्रसन्न आहे. शाळेतील स्वच्छता आणि सुविधा पोषक आणि पूरक आहेत.
शाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड सर यांनी केले तर आभार श्रीमती विद्या गोर्डे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक सिताराम गुरसळ ,रूपाली मंद्रे, सुचित्रा चवाळे, प्रियंका जाधव ,संगीता याईस,सविता बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा