सरकारने दुधाला प्रती लिटर ५० रूपये दर ध्यावा असी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की मागील वर्षी शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने राज्यात मोठे आंदोलन झाले यावेळी भाव वाढ करण्याऐवजी दुग्ध मंत्री यांनी प्रती लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले त्यात काही महिनेचे अनुदान दुध उत्पादक यांच्या बॅक खात्यात जमा झाले अनेक महीन्याचे अनुदान रखडले आहेत याचा पाठपुरावा शेतकरी माध्यमातून चालू आहे आज सरकारी अधिकारी सांगतात शाशनाकडे निधी नाही आम्हाला अनुदान नको दुधाच्या उत्पादन खर्चावर गायीच्या दुधाला किमान ५० रुपये व म्हशींच्या दुधाला प्रती लिटर ८० रुपये भाव द्यावा तरच दुध उत्पादक टीकेल आज पशुसंवर्धनाचे औषधे चारा पशुखाद्य मजुरी यांचे दर भरमसाठ गेली दोन वर्षांत कुठलही दर वाढ न झाल्यामुळे दुध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे दोन वर्षांपुर्वी एक लाख रुपये किंमतीने विकणारे गाय आज तीस चाळीस हजार रुपये किंमतीने विकत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुध धंदा बंद करत आहे याचे एकमेव कारण दुध भेसळमुळे दुधाचा तुटवडा दिसत नाही अनेक दुध संस्थांमध्ये दुध पुरवठा करणारे अनुदानापासून वंचीत आहे तरी शहरी लोकांना चांगल्या प्रकारे दुध पुरवणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे तरी सरकारने दुधाला व सर्व शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा आम्हाला कुणाकडे भिक मागण्याची वेळ येणार परंतु राज्यांमध्ये शेतकरी संघटना व सर्व
सामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत असल्याचे विठ्ठलराव शेळके यांनी सांगितले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा