सोमवार, २३ जून, २०२५

कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी

कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांची दु:खद प्रसंगी सांत्वनपर भेटी


शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नुकतेच काही स्नेही, नातेवाईक व हितचिंतक व्यक्तींचे दुःखद निधन झाले.
रहिमपूर येथील कै.भीमाजी बाबुराव शिंदे, मनोली येथील कै.अलका सोपान शिंदे, कोल्हेवाडी येथील कै. प्रयागाबाई देवराम दिघे आणि सोनगाव सात्रळ येथील कै.अमरीश किशोर भांड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कृषीभूषण सौ.प्रभावती जनार्दन घोगरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या दु:खद प्रसंगात आपण कुटुंबीयांसोबत आहोत, ही भावना सौ.घोगरे यांनी व्यक्त केली.
त्यांनी सर्व दिवंगत आत्म्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत ईश्वरचरणी प्रार्थना केली की, “या दु:खातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला लाभो.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...