रविवार, २२ जून, २०२५

AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न


AI तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष कार्यशाळा संपन्न


श्रीरामपूर, 



शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत नवे तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, या उद्देशाने रयत शिक्षण संकुल, श्रीरामपूर येथे साई सोशल फाउंडेशन आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने "AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान" या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. प्रतापराव पवार (अध्यक्ष, सकाळ पेपर्स प्रा. लि. व विश्वस्त, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती) हे होते.
कार्यक्रमास श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.हेमंत ओगले,पंचायत समितीच्या सभापती सौ.वंदनाताई मुरकुटे, तसेच कृषीभूषण सौ.प्रभावतीताई घोगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



या कार्यशाळेत शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादनात कसा प्रभावी वापर करता येतो, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याशिवाय सेंद्रिय शेती, आधुनिक सिंचन पद्धती, माती परीक्षण, पीक आराखडा तयार करणे अशा विविध बाबींवर सखोल माहिती देण्यात आली.

शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात असे उपक्रम अधिकाधिक व्हावेत, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...