कृषि विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन
तालुका कृषि अधिकारी राहाता यांच्या वतीने मौजे एकरूखे व रांजणगाव खुर्द येथे विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी प्रवीण गोसावी व तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे उपस्थित होते.
कृषि विभाग मार्फत खरीप हंगामामध्ये विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. प्रगतिशील शेतकरी गौरव गाढवे यांच्या शेतावर सीआरए पद्धतीने आंबा फळबाग लागवड करण्यात आली. तसेच एकात्मिक पद्धतीने हुमणी किड नियंत्रण , सोयाबीन बीजप्रक्रियेची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्रवीण गोसावी यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या मोहिमांविषयी माहिती देऊन मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
आबासाहेब भोरे यांनी हवामान अनुकूल शेती (सीआरए) पद्धतीने आंबा फळबाग लागवड, हुमणी एकात्मिक कीड नियंत्रण विषयी प्रात्यक्षिकद्वारे माहिती दिली. सहाय्यक कृषि अधिकारी राजेश पऱ्हे यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले व प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ गाढवे, गौरव गाढवे, शिवाजी भवर, बजरंग गाढवे,विलास गाढवे, बाळासाहेब गाढवे, विठ्ठल ढमढेरे, नवनाथ कार्ले, विश्वास गाढवे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा