साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पुन्हा गुणवंत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायकल वितरण.
श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने शिर्डी शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या गुणवंत गरजू विद्यार्थी/ विद्यार्थिनींना आज दि. २९ जून २०२५ रोजी सायकल वाटप करण्यात आले. ट्रस्ट चे अध्यक्ष अरुणराव शिंदे- गायकवाड पा.यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सौ. संगीता गायकवाड पा. श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा. व सहपरिवार तसेच रमेश गोंदकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष- अहिल्यानगर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,संग्राम कोते पाटील ,प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दीपक गोंदकर पाटील
युवक अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सचिन सोपान गोंदकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
शंतनू सुगवेकर माजी क्रिकेटपटू
अनिल वाल्हेकर माजी क्रिकेटपटू,खंडोबा मंदिर चे अध्यक्ष संदीप नागरे, शिव छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक भाऊसाहेब गायके पा.
शिवा गोंदकर पाटील- उद्योजक
अभिजीत गोंदकर ,पाटील-उद्योजक अजित जगताप पा.,राहुल फुंडे ,संकेत बोराडे ,अमोल सुपेकर ,
गंगाधर वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी ट्रस्ट च्या कार्याचे भरभरून कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षणसाठी होणारी गैरसोय दूर केल्याने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिचं आमच्या कामाची पोहच पावती आहे. शैक्षणिक कामासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्या ट्रस्ट चे नेहमीच सहकार्य राहील असे ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे-गायकवाड पा. यांनी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा