साईयोग फाउंडेशन च्या वृक्षारोपण सप्ताहाची उत्साहात सुरुवात..
वृक्षारोपण करून केला डॉक्टर डे साजरा.
साईयोग फाउंडेशन राहाता द्वारे सालाबादप्रमाणे १ जुलै रोजी वृक्षारोपण सप्ताहाची पहिल्या दिवशी कातनाला,बनकर वस्ती रोड परिसरात बालकुवा जातीच्या बांबू रोपांचे रोपण करून उत्साहात सुरुवात करण्यात आली.तसेच पुढे सहाही दिवस राहाता व परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.फाउंडेशन द्वारे वर्षभर या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे.शेवटच्या दिवशी दि ७ जुलैला झाडांचा १० वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.याप्रसंगी साईयोग फाउंडेशनचे सदस्य व राहाता नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
डॉक्टर डे निमित्त राहाता परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ व सेवाभावी कार्य केलेले डॉ पांडुरंग गुंजाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच त्यांचा फेटा बांधून श्रीसाई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.दहेगाव ग्रामस्थांच्या वतीने साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांचाही सत्कार करण्यात आला.फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य विलास वाळेकर यांचा वाढदिवसानिमित सन्मान करण्यात आला.
साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.डॉ पांडुरंग गुंजाळ यांनी डॉक्टर डे साजरा करण्यामागील कारण मीमांसा विषद करत निसर्ग संवर्धनात फाउंडेशनचे चालू असलेले कार्याची प्रशंसा केली तसेच यापुढेही हे कार्य अधिक जोमात चालू रहावे ही अपेक्षा व्यक्त केली.सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी डॉ.पी.जी.गुंजाळ,राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ,डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,राहाता नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक राहुल खलिपे,राजेंद्र बांगर,प्रकाश पुंड,अरुण मोकळ,बाळासाहेब गाडेकर,दशरथ तुपे,ॲड गोरखनाथ दंडवते,संजय बाबर,भाऊसाहेब बनकर,राजू वायकर ,मोहन तांबे,विष्णू गाडेकर,उज्वला गाडेकर,माधुरी माळवे,साईशा चव्हाण,संदीप डांगे,अनिल सातव,सिताराम बावके,ज्ञानेश्वर आरणे,मिलिंद बनकर,बबलू फटांगरे,रवींद्र धस, व्यंकटेश अहिरे,नारायण गाडेकर,रंगनाथ सदाफळ,शिवाजी पोटे,सुभाष दंडवते,परमेश चव्हाण,अर्जुन चव्हाण,बाळासाहेब तारगे,भागवत वाघमारे,अंकुश गांधी,प्रशांत माळवे,प्रभाकर नावकर,संजय गोयर,रवी निकाळे,सोन्या लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा