साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने पंधरावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न*- नेत्रसेवा हीच साईसेवा
श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने दिनांक 29 जून 2025 रोजी पंधरावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री विश्वनाथ पाटील व साई दृष्टी ऑप्टिकल चे श्री साई सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
29 जून रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 1600 रुग्णांची मोफत तपासणी होऊन रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले व 48 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पनवेल येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच, ठाणे,कल्याण, मालेगाव, अहिल्यानगर ,येवला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी नाशिक,राहाता, कोपरगाव, धुळे आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 14650 पेक्षा जास्त गरजू व वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत 2050 पेशंट ची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारूपास आले असून ट्रस्ट च्या वतीने अशा प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील. पुढील २७ जुलै २०२५ रोजी होणार्या १६व्या मोफत शिबीराचा लाभ देशातील अनेक गरजूंनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील यांनी केले. ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
जिल्हा उपाध्यक्ष- अहिल्यानगर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,संग्राम कोते पाटील ,प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दीपक गोंदकर पाटील
शिर्डी शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,निलेश शिंदे पाटील
युवक अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सचिन सोपान गोंदकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
शंतनू सुगवेकर माजी क्रिकेटपटू
अनिल वाल्हेकर माजी क्रिकेटपटू,खंडोबा मंदिर चे अध्यक्ष संदीप नागरे, शिव छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक भाऊसाहेब गायके पा.
शिवा गोंदकर पाटील- उद्योजक
अभिजीत गोंदकर ,पाटील-उद्योजक अजित जगताप पा.,राहुल फुंडे ,संकेत बोराडे ,अमोल सुपेकर ,
गंगाधर वाघ,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील शिबिरासाठी नावनोंदणी करिता संपर्क:
मो. 8055855445 / 7030035445
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा