साई भक्तांकडून सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
.
ठाणे येथील साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते, त्यावेळी त्यांनी सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेत भेट दिली. शाळेतील परिसर, विद्यार्थी, शैक्षणिक वातावरण त्यांना अतिशय भावले. त्यामुळे त्यांनी शाळेतील मुलांना रंगपेटी, नॅपकिन, चॉकलेट, चित्रकला वही ,पट्टी, पेन्सिल ,खोड रबर, शार्पनर ,पेन, पेन पाऊच आणि बिस्किट पूडे मुलांना वाटले .शाळेतील मुलांशी खूप छान प्रकारे हितगुज करून मुलांना योगाचे महत्व, चांगल्या सवयी, चांगला अभ्यास ,या विषयावर मार्गदर्शनही केले .त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी शाळेविषयी व गावाविषयी गौरवोदगार काढले. आरोग्यधन योगाभ्यास या नावाने ते चर्चासत्र आयोजित करून पालकांना ,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विविध प्रकारचे सेमिनार आयोजित करत असतात. सप्टेंबर महिन्यात देखील सावळविहीर बुद्रुक गावातील पालकांना एकत्र करून पालकत्व याविषयी सखोल असे मार्गदर्शन करून योगाचे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र गांधालीकर ,विनोद पितळे, राजेश वैद्य ,निलेश वाजे ,अवंती परब ,मीना वैद्य ,रोहिणी पितळे, ,नंदिनी वाजे या साई भक्तांचा समावेश होता.
शाळेत आल्याबरोबर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी साई भक्तांचे छान प्रकारे स्वागत केले. सर्वांचे सत्कार केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार रूपाली मंद्रे यांनी मानले .प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सिताराम गुरसळ ,विद्या गोर्डे , सुचित्रा चवाळे ,संगीता याईस ,सविता बर्डे,प्रियंका जाधव यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा