भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
"शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही" - काँग्रेस नेत्या सौ.प्रभावती घोगरे यांचा इशारा
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी अलीकडेच शेतकऱ्यांविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात आणि शेतकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सत्तेची गुर्मी दाखवत शेतकऱ्यांचा अवमान करणे, हे अत्यंत निंदनीय आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्या, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी कन्या सौ. प्रभावती घोगरे यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या घामाच्या किमतीवर सत्तेत पोहोचलेल्यांनी त्याचा अवमान करणं, हे आम्हाला कदापी मान्य नाही. आम्ही शांत बसणार नाही.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता आम्ही संघर्ष करत राहू. शेतकरीविरोधी प्रवृत्तींचा आम्ही पर्दाफाश करू असे मत प्रभावतीताई घोगरे व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा