रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी कोते पाटील बांधवांची उपस्थिती

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी कोते पाटील बांधवांची उपस्थिती


शिर्डी 

साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीतील जेष्ठ नेते बाबासाहेब कोते,गंगाभाऊ कोते,उत्तम भैय्या कोते,मधुकर कोते,निलेश दादा कोते,ताराचंद कोते,छोटे बापू उर्फ दत्ता कोते,रवींद्र कोते,सुनील कोते,किरण कोते,नितीन कोते,गणेश कोते ,सोमराज कावळे यांसह कोते पाटील परिवारातील सदस्यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली 

संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला 
यावेळी शिर्डीतील कोते पाटील परिवारातील सदस्यांची तसेच साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते,सचिव  विलास वाणी यांसह संचालक मंडळाची उपस्थिती होती 

 माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाच्या सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराचे विशेष कौतुक करत येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच अधिवेशन वेळी साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याबाबत तसेच राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्ववान चेअरमन म्हणून बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून  चेअरमन विठ्ठल पवार यांची निवड अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करत अतिशय संघर्षातून विठ्ठल पवार नावाचे नेतृत्व संस्थेच्या सभासदांना लाभल्याचे निलेश कोते तसेच छोटे बापू उर्फ दत्ता कोते संचालक राम गागरे सचिव विलासराव वाणी विजय शिंदे नवनाथ थोरे रमेश वाघे सुनील चिकणे राजेंद्र खर्डे मंगेश कुलकर्णी व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहता येथे त्रिशूल मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त मोफत रोग निदान शिबिर संपन्न


, रहाता 

, राहता येथे त्रिशूल मित्र मंडळाच्या वतीने श्री   गणेशोत्सव निमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले असून यामध्ये दीडशे ते दोनशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यापूर्वी सुद्धा त्रिशूल मित्र मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये विविध शाळांना प्रथमोपचार किट देण्यात आली असे अनेक उपक्रम राबविण्यात आले 

यावेळी
 ज्ञानेश्वर सदाफळ ,उदय बोठे,
 प्रसाद सदाफळ, सचिन अग्रवाल, संतोष सोनवणे, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, नितीन सदाफळ, नितीन भडांगे, दीपक बोबडे, राहुल जाधव, सोनू साखरे, विकास चव्हाण, बद्रीनाथ सदाफळ, डॉक्टर सुनील ताजने, राहुल सांड ,वैभव सदाफळ


 ,अभिनव नारळे, अक्षय खांडरे, सचिन जाधव, राजेंद्र सोनुळे ,राहुल घोरपडे, अँड समीर  करमासे, योगेश डांगे ,प्रितेश सदाफळ, अँड प्रताप डांगे, गुलाब दंडवते, अमोल देवकर, केदार जोशी ,अभय रोहम, कैलास उदमले, प्रा रविंद्र गायकवाड, मुन्ना सदाफळ ,राहुल काळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

साई संस्थान सोसायटीच्या गणरायाची आरती महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पोनि. रणजित गलांडे, संस्थान सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, वाहतूक शाखेचे महेश येसेकर यांच्या हस्ते संपन्न

साई संस्थान सोसायटीच्या गणरायाची आरती महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पोनि. रणजित गलांडे, संस्थान सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, वाहतूक शाखेचे महेश येसेकर यांच्या हस्ते संपन्न


शिर्डी 

साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख रोहिदास माळी,शिर्डी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक महेश येसेकर यांसह पोलिस बांधवांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली 
यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला 

यावेळी काका कोयटे यांनी जवळपास तासभर थांबून साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते,सचिव  विलास वाणी आणि संचालक मंडळाकडून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व संस्थेचा चालू वर्षी असलेला नफा तसेच सभासदांसाठी संस्थेच्या वतीने राबविले जात असलेले उपक्रम ऐकून चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत या संस्थेचे सभासद भाग्यवान असल्याचे म्हटले व येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच अधिवेशन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित केले असून साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी काका कोयटे यांनी केली तर राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्ववान चेअरमन ची निवड आम्ही करणार असून बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पहिली निवड ही चेअरमन विठ्ठल पवार यांची करत असल्याचे काका कोयटे यांनी जाहीर केले व सहकार क्षेत्रातील दिग्गज अभ्यासु ओळखले जाणारे काका कोयटे हे अतिशय रास्त दरात उच्च प्रतीची सोसायटीच्या पाण्याची बाटली,पिशवी तसेच पेढ्यांचा बॉक्स आवर्जून आपल्या सोबत घेऊन जाण्यास  विसरले नाहीत.



यावेळी संचालक मिलिंद दुनबळे रवींद्र गायकवाड रामा गागरे तुळशीराम पवार व सचिव विलासराव वाणी, सहसचिव संभाजी कोते, विजय शिंदे नवनाथ थोरे देविदास आसने रमेश वाघे सुनील चिकने राजेंद्र खर्डे मंगेश कुलकर्णी व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी शेळके पाटील बांधवांची उपस्थिती

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी शेळके पाटील बांधवांची उपस्थिती

शिर्डी 

शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी शेळके बांधवांची उपस्थिती यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभय राजे शेळके धनंजय तात्या शेळके माजी विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी महेंद्र दादा शेळके अमित दादा शेळके प्रतीक दादा शेळके यांचा सत्कार चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला संचालक रवींद्र गायकवाड मिलिंद दुनबळे रामा गागरे देविदास जगताप सचिव विलासराव वाणी सहसचिव संभाजी कोते विजय शिंदे नवनाथ थोरे रमेश वाघे सुनील चिकने राजेंद्र खर्डे अजित जगताप बाळासाहेब काटकर सुदाम झिंजुर्डे राहुल डांगे मंगेश कुलकर्णी, पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साई संस्थान एम्प्लॉईज कर्मचारी श्री गणेशाची आरती व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व माजी संचालक अशोकराव कोते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

साई संस्थान एम्प्लॉईज कर्मचारी श्री गणेशाची आरती व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व माजी संचालक अशोकराव कोते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न



शिर्डी 

शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज कर्मचारी सोसायटीची श्री गणेशाची आरती व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व माजी संचालक अशोकराव कोते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विजय शिंदे नवनाथ थोरे निखिल चौधरी जनार्दन वाकचौरे भगवानराव थोरात मच्छिंद्र शिंदे ठकाजी काटकर दिलीप शेठ पगारे रमेश वाघे नरेंद्र निकम राहुल डांगे अजित जगताप दीपक गायकवाड भाऊसाहेब गोंडे व पत्रकार संजय महाजन इतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

राहाता येथे पीस पोस्टर स्पर्धा संपन्न

राहाता येथे पीस पोस्टर स्पर्धा संपन्न


राहाता 
 लायन्स क्लब ऑफ राहाता व जिल्हा परिषद शाळा तसेच उर्दु शाळा राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने पीस पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेचे २५ व उर्दु शाळेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. चंद्रभान त्रिभुवन यांनी केले. झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी स्पर्धेचे नियम व आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष लायन प्रकाश सदाफळ, उपाध्यक्ष लायन मुन्नाभाई शहा, सेक्रेटरी लायन रतन चौधरी व पीआरओ लायन गोरखभाऊ दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेतर्फे करण्यात आले होते. दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D2 यांच्या वतीने सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लायन पत्रकार राजुभाई पठाण, लायन सरला तायडे (सहसचिव) व लायन लता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.


उर्दु शाळेतील योगदान:
मुख्याध्यापक शहा जाकीर हुसैन रसूल, पदवीधर शिक्षिका शेख महेरुन्निसा अब्दुल्ला, पदवीधर शिक्षक शेख फैरोज कासम, मोहम्मद तबरेज अब्दुल अजीज, उपाध्यापक खान कय्युम पीर खान, उपाध्यापिका शेख बेबी सलमा जाकीर, शेख यास्मिन महेबुब व शेख नाझिया सालार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

जिल्हा परिषद शाळेतील योगदान:
मुख्याध्यापिका सौ. कानवडे कुसुम सखाराम, श्री. त्रिभुवन चंद्रकांत, श्री. दर्शने पंकज चंद्रकांत, श्री. पुरी राहुल सुरेश, सौ. मुत्रक स्वाती अशोक व सौ. ठुबे माधुरी बाबासाहेब यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
आभार मुख्याध्यापक शाह जाकीर हुसेन यांनी मानले

लोणी येथे "मोदक देतो, मी लाडू देतो" या नव्या गणेशगीताचे पोस्टर लोकार्पण

लोणी येथे "मोदक देतो, मी लाडू देतो" या नव्या गणेशगीताचे पोस्टर लोकार्पण



लोणी  :
 गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले की भक्तांच्या मनात आनंदाची लहर संचारते. अशा उत्साहाच्या पार्श्वभूमीवर "मोदक देतो, मी लाडू देतो’ या नव्या गणेश गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, या गाण्याच्या पोस्टरचे भव्य लोकार्पण गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले. हे पोस्टर लोकार्पण सादत  मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी कलाकार व निर्मिती संघाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत नव्या गाण्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी हसतमुखाने पोस्टरचे अनावरण करत सर्व टीमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या गाण्याचे सॉंग डायरेक्टर प्रमोद पंडित असून निर्मितीची धुरा आबा निर्मळ, उमेश पन्हाळे व  नरसिम्हा सिंग  प्रमोद पंडित ,ज्ञानदेव शिंदे, सतीश कदम प्राजक्ता घोलप पूजा जोशी जया कोरे यांनी सांभाळली आहे. गाण्याच्या चित्रीकरणात कलाकार आबा निर्मळ सौ वनिता निर्मळ यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


चित्रीकरणासाठी लोणी-निर्मळ पिंपरी रोडवरील सुप्रसिद्ध हॉटेल K.B. रेस्टॉरंट परिसराची निवड करण्यात आली होती. या चित्रीकरणाला हॉटेलचे मालक सचिन दादा आहेर पाटील यांचे तसेच ज्ञानेश्वर साबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. गणेश भक्तांसाठी खास सादर होत असलेले हे नवे गाणे गणेशोत्सवाच्या वातावरणाला अधिक रंगतदार बनवणार असून, स्थानिक कलावंतांना मिळालेली ही संधी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. पोस्टर लोकार्पण कार्यक्रमामुळे लोणी परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिकच वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

डॉ सुजय विखे पा यांच्या हस्ते साई संस्थान सोसायटीच्या श्री गणेशाची प्रथमदिनीच महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न

डॉ सुजय विखे पा यांच्या हस्ते साई संस्थान सोसायटीच्या श्री गणेशाची प्रथमदिनीच महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न


शिर्डी 

शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापणे ला युवा नेते डॉ सुजय विखे पाटलांनी आवर्जून हजेरी लावली यावेळी साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना व सोसायटीचा एका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक अपघाती विम्याचे 10 लाखाच्या रकमेची चेक सुजय दादाच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले यावेळी सुजय दादा म्हणाले की मी लोणी पासून निघालो गेल्या 50 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये गणेशोत्सा चा उत्साह बघितला याचे कारण सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध झाले त्यांनी चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन संचालक व सचिव यांनी मला गणेशाची आरती करता बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे यावेळी डॉक्टर सुजय विखेंचा सत्कार चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू  कोते माजी उपनगराध्यक्ष अभय राजे शेळके भावी नगराध्यक्ष छोटे बापू कोते भाजपाचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर नितीन कोते गणेश कोते व संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीने श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती

माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीने श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती


श्रीरामपूर 

श्रीरामपूर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील ७२२ गाळे धारकांना ७५% भाडे वाढ करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हा पासून गाळे धारकांमध्ये प्रचंड रोष होता. मध्यंतरी कोरोनाच्या साथीनंतर श्रीरामपूर शहरातील गाळे धारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी झाली. त्यानंतर आता व्यावसायिक हळू हळू आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात हि भाडे वाढ अन्याय कारक आहे म्हणून गाळे धारकांमध्ये अस्वस्थता होती. 

सदर गाळे धारकांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांना भेटून भाडे वाढ करू नये म्हणून विनंती केली होती. म्हणून संजय फंड यांनी काही गाळाधारक यांचे शिष्ट मंडल घेऊन मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांची भेट घेतली व आपली व्यथा मांडली.

मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी गाळे धारकांची व्यथा ऐकून घेत राज्याचे जलसंपदा, कृष्णा व गोदावरी खोरे मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्फत श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना सध्या भाडेवाढ करू नये अशा सूचना दिल्या. 

तसेच सदर भाडेवाढ स्थगिती बाबत शासन स्थरावर प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून शासनाचे आदेश होई पर्यंत कुठलेही भाडेवाढ करू नये अशा सूचना देण्यात आल्या. या कामी माजी नगराध्यक्ष संजय फंड, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, सोमनाथ गांगड, संजय गांगड, सागर भागवत, अमोल शेटे व सर्व गाळे धारक उपस्थित होते.

साई संस्थान सोसायटीची गणरायाची आजची आरती संचालक भाऊसाहेब कोकाटे व संचालक महादू कांदळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

साई संस्थान सोसायटीची गणरायाची आजची आरती संचालक भाऊसाहेब कोकाटे व संचालक महादू कांदळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न


शिर्डी 

शिर्डी साई संस्थान सोसायटी कर्मचारी गणेश उत्सव आजची आरती संचालक भाऊसाहेब कोकाटे व संचालक महादू कांदळकर यांच्या हस्ते आजची गणरायाची आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी विजय शिंदे नवनाथ थोरे भगवानराव थोरात जनार्धन वाकचौरे बाबासाहेब शेजवळ दिलीप शेठ पगारे रमेश वाघे रामनाथ भांबरे शरद राऊत राहुल डांगे नरेंद्र निकम साईबाज शेख दिलीप पेखळे भाऊसाहेब गोंडे, संतोष डांगे, पत्रकार संजय महाजन व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

शिर्डीत नगर-मनमाड महामार्गाचे काम निकृष्ट शिर्डी शहर राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

शिर्डीत नगर-मनमाड महामार्गाचे काम निकृष्ट शिर्डी शहर राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा


शिर्डी 

देशातील नंबर दोनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्य नगर मनमाड महामार्गावर मागील वर्षी निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून शिर्डी शहरात  निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे एकाच वर्षात वर्षात खड्डे पडल्याने दुचाकी वाहनधारक तसेच पायी पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तांना शिर्डी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वाटचाल कारवाई लागत तसेच शिर्डी बायपास जड वाहतूक उडवलेली असताना  सदर रस्त्यावर कमी वर्दळ असताना देखील रस्ता एकाच वर्षात कसा खराब झाला हा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी ठेकेदारांकडून तातडीने नव्याने डांबरीकरण करून तयार करून घेण्यात यावा अन्यथा शिर्डी शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल असा इशारा शिर्डी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष श्री गोंदकर यांनी म्हटले आहे कि, साईबाबांच्या शिर्डी शहरात वर्षाकाठी देश विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात.शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्यावर मागील वर्षी ठेकेदारांकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.एक वर्षाच्या आतच या रस्त्यावर खडी उदगळून पडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच पद यात्रींना आपला जीव मुठीत धरून वाटचाल करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम सबंधित ठेकेदारांकडून नव्याने तातडीने पूर्ण करून घ्यावे आणि साई भक्तांच्या प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अहिल्यांयानगर यांच्याकडे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे.
याप्रसंगी बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर निलेश कोते, अमित शेळके, युवक अध्यक्ष निलेश शिंदे, साई कोतकर, सचिन गोंदकर, योगेश गायके, अनिल कोते, सुशांत अवताडे, अमोल सुपेकर, अजित जगताप, शंकर त्रिभुवन, गणेश कानडे, गंगाधर वाघ, राहुल फुंदे, चंद्रभान बनकर, फिरोज पठाण, राजेश कांबळे, विशाल नागरगोजे, युनूस सय्यद, सादिक शेख, लक्ष्मण झाडे आदी उपस्थित होते

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न..

राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न..


शिर्डी 
शिडी अहिल्यानगर येथे 22 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  देशभरातून जवळपास 14 राज्यातून साडेसहाशे खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत  बक्षीस वितरण
समारंभ दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला  टग ऑफ वॉर फेडरेशन
ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिल्लीचे माजी आमदार हरिशंकर गुप्ता , महासचिव मदन  मोहन , महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशनचे अध्यक्षा श्रीमती माधवी पाटील, सचिव जे ई गुपिले, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व या राष्ट्रीय स्पर्धेचे संयोजक ॲड.सुहास आहेर, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या स्पर्धेचे आयोजन पार पडले 


तसेच सर्वसाधारण स्पर्धेचे विजेतेपद केरळ,उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली,या संघांनी पटकावले या स्पर्धेत पंच म्हणून सीनियर रेफ्री अर्जुन सिंग डॉ. राहुल वाघमारे ,सतीश खराटमल पियुष भोकरे शुभम भोकरे प्रथमेश फरतडे रोहित यश शिंदे यांनी काम पाहिले.स्पर्धा  यशस्वीतेसाठी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष तथा जिल्हा संघटनेचे सचिव प्रा .बाबा गायकवाड , राष्ट्रीय पंच सुनील मंडलिक प्रदीप थोरात श्री गणेश खैरे ओ बी सी मोर्चा.श्री प्रदीप वैद्य सामाजिक कार्यकर्ते व साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विकास शिवगजे सर तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री राजेंद्र कोहकडे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम व मेहनत घेतली.

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

Problem with Teenager: Dr. Pankaj Yelam's "Roots of Wings" Addresses Modern Adolescent Challenges

Problem with Teenager: Dr. Pankaj Yelam's "Roots of Wings" Addresses Modern Adolescent Challenges


Rahata
 Teenagers today navigate a complex landscape of pressures, often leading to significant challenges in their development and well-being. Dr. Pankaj Yelam's new initiative, "Roots of Wings," aims to provide crucial support and guidance for adolescents grappling with the myriad issues defining their formative years.
"Roots of Wings," a program focusing on mental and emotional health, delves into the core "problems with teenagers," as highlighted by Dr. Yelam. The initiative identifies several critical areas impacting young individuals, starting with parent-child relation conflicts. Often stemming from communication gaps and evolving expectations, these conflicts can generate significant stress within families.
Beyond the home, academic life presents another formidable challenge. Academic pressure from schools, parents, and peers can lead to anxiety, stress, and burnout among students striving to meet high expectations. This pressure is further compounded by the pervasive influence of technology.
The digital age, while offering connectivity, also introduces new dangers. Cyberbullying has become a widespread concern, with its insidious nature often escaping immediate parental detection and taking a severe toll on a teenager's self-esteem and mental health. Coupled with this is technology addiction, where excessive screen time and reliance on digital devices can disrupt sleep patterns, social interactions, and academic performance, isolating young individuals despite being constantly connected.
As teenagers approach the cusp of independence, they also face numerous adulthood problems. The anxieties of career choices, higher education, identity formation, and navigating complex social dynamics can be overwhelming for those transitioning into maturity.
Through "Roots of Wings," Dr. Yelam emphasizes a holistic approach to address these interconnected issues. The program focuses on fostering open dialogue between parents and children, equipping students with coping mechanisms for academic stress, promoting responsible use of technology, and building resilience against cyber threats. Its core philosophy is to provide a strong "roots" – a stable foundation of emotional intelligence and support – while nurturing the "wings" necessary for teenagers to confidently and healthily take flight into adulthood.
The initiative serves as a vital resource, offering expert analysis and practical strategies to help students navigate their present challenges and prepare for a resilient future.

किशोरवयीन मुलांशी संबंधित समस्या: डॉ. पंकज येलम यांचे "रूट्स ऑफ विंग्स" आधुनिक किशोरवयीन आव्हानांना संबोधित करतो

किशोरवयीन मुलांशी संबंधित समस्या: डॉ. पंकज येलम यांचे "रूट्स ऑफ विंग्स" आधुनिक किशोरवयीन आव्हानांना संबोधित करतो



राहता 
 आज किशोरवयीन मुले दबावांच्या जटिल परिदृश्यातून मार्ग काढतात, ज्यामुळे त्यांच्या विकास आणि कल्याणात अनेकदा महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण होतात. डॉ. पंकज येलम यांचा नवीन उपक्रम, "रूट्स ऑफ विंग्स", त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांना परिभाषित करणाऱ्या असंख्य समस्यांशी झुंजणाऱ्या किशोरांना महत्त्वपूर्ण आधार आणि मार्गदर्शन प्रदान करण्याचा उद्देश आहे.
"रूट्स ऑफ विंग्स", मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा कार्यक्रम, डॉ. येलम यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, "किशोरवयीन मुलांशी संबंधित समस्या" या मुख्य गोष्टींचा शोध घेतो. हा उपक्रम तरुण व्यक्तींवर परिणाम करणाऱ्या अनेक गंभीर क्षेत्रांची ओळख पटवतो, ज्याची सुरुवात पालक-मुलांच्या संबंधातील संघर्षांपासून होते. बहुतेकदा संवादातील अंतर आणि विकसित होणाऱ्या अपेक्षांमुळे, हे संघर्ष कुटुंबांमध्ये लक्षणीय ताण निर्माण करू शकतात.
घराबाहेर, शैक्षणिक जीवन आणखी एक भयानक आव्हान सादर करते. शाळा, पालक आणि समवयस्कांकडून शैक्षणिक दबाव उच्च अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता, ताण आणि बर्नआउट होऊ शकतो.  तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रभावामुळे हा दबाव आणखी वाढतो.
डिजिटल युग कनेक्टिव्हिटी प्रदान करत असताना, नवीन धोके देखील आणते. सायबरबुलिंग ही एक व्यापक चिंता बनली आहे, त्याच्या कपटी स्वभावामुळे अनेकदा पालकांच्या तात्काळ ओळखीतून सुटका होते आणि किशोरवयीन मुलांच्या आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यासोबतच तंत्रज्ञानाचे व्यसन देखील जोडले गेले आहे, जिथे जास्त स्क्रीन वेळ आणि डिजिटल उपकरणांवर अवलंबून राहणे झोपेच्या पद्धती, सामाजिक संवाद आणि शैक्षणिक कामगिरीमध्ये व्यत्यय आणू शकते, सतत कनेक्टेड असूनही तरुणांना वेगळे करते.
किशोरवयीन मुले स्वातंत्र्याच्या शिखरावर पोहोचत असताना, त्यांना प्रौढत्वाच्या अनेक समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. परिपक्वतेकडे जाणाऱ्यांसाठी करिअर निवडी, उच्च शिक्षण, ओळख निर्माण करणे आणि जटिल सामाजिक गतिशीलतेमध्ये नेव्हिगेट करण्याच्या चिंता जबरदस्त असू शकतात.
"रूट्स ऑफ विंग्ज" द्वारे, डॉ. येलम या परस्परसंबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी समग्र दृष्टिकोनावर भर देतात. हा कार्यक्रम पालक आणि मुलांमध्ये मुक्त संवाद वाढवण्यावर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणावासाठी सामोरे जाण्याच्या यंत्रणेसह सुसज्ज करण्यावर, तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराला प्रोत्साहन देण्यावर आणि सायबर धोक्यांविरुद्ध लवचिकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो.  किशोरवयीन मुलांना आत्मविश्वासाने आणि निरोगीपणे प्रौढत्वात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या "पंखांना" जोपासताना, एक मजबूत "मुळे" - भावनिक बुद्धिमत्ता आणि आधाराचा एक स्थिर पाया - प्रदान करणे हे त्याचे मुख्य तत्वज्ञान आहे.
हा उपक्रम एक महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करतो, जो विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यास आणि लवचिक भविष्यासाठी तयार होण्यास मदत करण्यासाठी तज्ञ विश्लेषण आणि व्यावहारिक धोरणे प्रदान करतो.

संस्थान कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदींनुसार १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या योजनेचा लाभ द्यावा... संस्थान सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार यांची डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे मागणी


संस्थान कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदींनुसार १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या योजनेचा 
लाभ द्यावा...
 संस्थान सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार यांची डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे मागणी 



शिर्डी प्रतिनिधी 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अस्थापनेवर काम करत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसाद १०,२० व ३० वर्षाची सेवा हि सात ते आठ वर्षापुर्वीच पुर्ण झालेली असुनहि कर्मचाऱ्यांना अद्याप आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापुर्वी संस्थान कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगात समाविष्ठ असलेली १२, २४ व ३६ वर्षाची सेवा पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हि योजना लागु करुन सुधारीत वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आलेला होता. त्याच धर्तीवर दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासुन पुर्वलक्षी प्रभावाने ७ वेतन लागु करण्यात आलेला असुन ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षाची सेवा पुर्ण केलेल्या संस्थान कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेनुसार सुधारीत वेतन श्रेणी लागु व्हावी. शासन दरबारी आपण व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच सन २००६ मध्ये १०५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावुन घेण्याचा ऐतेहासिक निर्णय झालेला आहे.


 तसेच ५९८ कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हि आपल्यामुळेच मार्गी लागत आहे. आपण संस्थान कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहात व संस्थान कर्मचाऱ्यांचे बाबतीत आपला नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन राहिलेला आहे व यापुढे हि राहिल यात शंका नाही. तरी आपण या प्रकरणात वैयक्तीक लक्ष घालुन आपल्या स्तरावरुन संस्थान तदर्थ समिती तसेच शासन दरबारी पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षाची सेवा पुर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या आश्वाशित योजनेचा लाभ तसेच कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाव्दारे चेअरमन विठ्ठल पवार यांनी केली आहे.

शारदा शैक्षणिक संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -


शारदा शैक्षणिक संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -


राहाता 
 रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ. पी.जी. गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये का.ल. शिंदे पाटलांमुळे मला या शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भाऊ विषयी आमच्या सर्वांच्या मनात आपुलकी प्रेम जिव्हाळा होता .त्यांचे काम मोठे होते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. यश अपयश याकडे लक्ष देऊ नये .यश आले तर हुरळून जाऊ नका. अपयशाने नाराज होऊ नका असा संदेश आपल्या मनोगतातून  विद्यार्थ्यांना दिला .
     


  या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले . थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील यांच्या कार्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी माजी प्राचार्य नानासाहेब मते जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपल्या मनोगतातून  कै.का.ल शिंदे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटलांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आम्ही समजतो .त्यांनी शाळा सुरू करून जणू राहाता परिसराला एक शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध करून दिली असे सांगितले .
       जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतातून  भाऊं बरोबरच्या आठवणी सांगताना भाऊंचा स्वभाव ,त्यांच्याबरोबर आलेले अनुभव त्यांनी व्यक्त केले . आपल्या मनोगतामध्ये  कृत्रिम बुद्धिमत्ते विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .अशा स्पर्धेतूनच उत्तम वक्ता निर्माण होतो असे सांगितले .
          शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश  शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगत असताना अनेक कार्यकर्त्यांनी का.ल. शिंदे पाटलांना मदत केल्यामुळे इतके मोठे काम पाटील करू शकले असे सांगितले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे स्किल दाखवावे. यश अपयशाला महत्त्व देऊ नये. यातूनच आपले आयुष्य घडते. चांगले शिक्षण ,चांगले ध्येय ,चांगले विचार ठेवले पाहिजे. यश निश्चित आपणाला मिळते असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या स्पर्धेमध्ये विविध शाखेतून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी परीक्षा म्हणून श्री शेजुळ, प्रा.शशिकांत बनकर, ज्ञानदेव गमे ,श्री उकिरडे यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य सर्जेराव मते कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुंजाळ ,उप प्राचार्य अशोक बोरसे ,प्राचार्य निशा चंगोट , दिलीप खरात,संदीप वाव्हळ,सचिन बनसोडे, अजय जाधव, राजू  पठाण, ज्ञानेश्वर जोरे, रामनाथ सदाफळ, प्रा.शरद गमे प्रा.रमेश आहेर,प्रा. आसिर पठाण,प्रा पंकज दिघे, प्रा. बाळासाहेब दिघे, राजकुमार साळवे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनाली थोरात यांनी केले

गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याची शूटिंग लोणी येथे वरद विनायक मंदिर परिसरात शूटिंग चे उद्घाटन हभप महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

लोणी
 गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद्धवजी महाराज मंडलिक , कचरू नाना निर्मळ,  यांच्या हस्ते क्लापबोर्ड धरून शुभारंभ करण्यात आला यावेळी ह भ प महंत उद्धवजी महाराजांनी  गाण्यांमध्ये काम करणारे कलाकार टीमचे अभिनंदन केले गणपती बाप्पा चे गाणे लोकांपर्यंत श्रद्धेच्या भावनेने  पोहोचेल व  लोकांच्या पसंतीस उतरेल व  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


  निर्माता आबा निर्मळ, प्रमोद पंडित दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी वरद विनायक मंदिर ट्रस्टचे चांगले सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले आणि मातीचा राजा या गाण्याला भरगोस यश मिळाल्यानंतर दुसरे गाणे येत आहे  व नवीन जोषाने बाप्पाच्या गाण्यात काम केल्यामुळे सर्व कलाकार टीमचे ही आभार मानले


 कलाकार , प्राजक्ता घोलप .सौ पूजा जोशी, जया कोरे, वैष्णवी आहेर,सौ. वनिता निर्मळ, सौ. सविता साबळे , प्रमोद पंडित, ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब कोळसे ,निर्मळ आबा, नरसिम्हा सिंग ,लक्ष्मण ढोबळे अमोल टाक ,ज्ञानेश्वर साबळे, अनिरुद्ध नवघन, स्वराज साबळे ,सतीश कदम ,राजाराम आहेर महाराज, वरद निर्मळ ,तसेच विशेष सहकार्य ,कचरू नाना निर्मळ महाराज वरद विनायक ट्रस्ट ,सचिन दादा आहेर पा, पन्हाळे(अनुपम सेल्स कर्पोरेशन) निलेश गायकवाड ,नानासाहेब ढवळे ( पत्रकार शंकर सोनवणे,मधु ओझा कॅमेरामन आदीचे सहकार्य लाभले

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावर

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावर




शिर्डी 
साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी शिर्डी ही संस्था चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहे आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.
कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.
फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.
सभासद व भक्तांच्या सेवेसाठी पारदर्शक व हितकारक काम करत असल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे. सभासद, साईभक्त, लोकप्रतिनिधी व संस्थान अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले आहेत, असे प्रतिपादन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केले.

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावरशिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन ) सामाजिक बातमीसाई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी शिर्डी ही संस्था चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहे आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.सभासद व भक्तांच्या सेवेसाठी पारदर्शक व हितकारक काम करत असल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे. सभासद, साईभक्त, लोकप्रतिनिधी व संस्थान अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले आहेत, असे प्रतिपादन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केले.

विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली एम्प्लॉईज सोसायटी प्रगतीपथावर


शिर्डी 



साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी शिर्डी ही संस्था चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहे आणि विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.

फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.

सभासद व भक्तांच्या सेवेसाठी पारदर्शक व हितकारक काम करत असल्यामुळे सोसायटी प्रगतीपथावर आहे. सभासद, साईभक्त, लोकप्रतिनिधी व संस्थान अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याने विरोधकांचे सर्व डावपेच फोल ठरले आहेत, असे प्रतिपादन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केले.

लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई- डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे

लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल  चालकांवर कायदेशीर कारवाई- 
  डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे


शिर्डी 
 

           बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो. 
    परंतु याच कायद्यातील  काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ  अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक,कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची  शिक्षा असते.
     या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दोन्हीही लॉज /हॉटेल चालक  यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे. 
     श्रीरामपूर विभागात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या अंतर्गत एकूण 17 पोलीस स्टेशन येतात. या सतरा पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराखालील दाखल व तपासावर असणाऱ्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जर कोणी हॉटेल/ लॉज चालक, मालक याने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आपले हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिला असेल तर त्यांना देखील गुन्ह्यांमध्ये सह आरोपी करण्यात येणार आहे. 
    तसेच यापुढे अशा स्वरूपाच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जर हॉटेल किंवा लॉजचा,कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित हॉटेल चालक-मालक, कॅफे चालक -मालक, लॉज  चालक-मालक यांना देखील सह आरोपी करण्यात येईल.
     त्यामुळे सर्वच हॉटेल लॉज चालकांना सूचित करण्यात येते की आपल्या हॉटेलमध्ये, लॉज मध्ये येणाऱ्या व्यक्तींची विहित नमुन्यातील रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी.त्यांच्या वयाची पडताळणी करावी व यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा. किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल...
  
    श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर,लोणी, कोपरगाव,सोनई त्याचप्रमाणे अन्य शहरांमध्ये मोठी शैक्षणिक संकुले आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून मुले मुली शिक्षणासाठी येत असतात.  त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील प्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आपले लॉज,हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर,मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे...

शिर्डी येथे रस्सीखेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे भव्य उद्घाटन संपन्न..

शिर्डी येथे रस्सीखेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे भव्य उद्घाटन संपन्न..

शिर्डी 
 

शिर्डी – संत साईबाबांच्या पावन भूमीत आज शनिवारी दुपारी ४:०० वाजता राष्ट्रीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धांचे भव्य उद्घाटन दिमाखात पार पडले. भारतीय रस्सीखेच संघटना, महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशन, अहिल्यानगर जिल्हा रस्सीखेच असोसिएशन व साईबाबा महाविद्यालय, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्षनाथ गाडीलकर (भा.प्र.से.), भारतीय रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष मा. हरिशंकर गुप्ता, महासचिव मा. मदन मोहन साहेब, महाराष्ट्र रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्षा मा. श्रीमती माधवी पाटील व महासचिव मा. जनार्दन गुपीले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
देशभरातून तब्बल १५ राज्यांतील ६५ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून १३, १५, १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांबरोबरच १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील सामने रंगणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धांमधून भारतीय संघाची निवड होणार असल्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आहे.


या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुहास आहेर, सचिव प्रा. बाबा गायकवाड, श्री. सुनील मंडलिक, श्री. राजेंद्र थोरात, श्री. नंदलाल काळण, श्री. भागवत उगले, श्री. निवृत्ती घुले श्री . गणेश खैरे उपाध्यक्ष ओ बी सी मोर्चा श्री.प्रदीप जी वैद्य सामाजिक कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धांमुळे रस्सीखेच क्रीडेबरोबरच शिर्डीची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यांना क्रीडाप्रेमींनी मोठी दाद दिली असून, पुढील तीन दिवस शिर्डीमध्ये रस्सीखेच सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा संदीप सोनवणे

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा  संदीप  सोनवणे 

शिर्डी प्रतिनिधी 
  साईसंगम सेवाभावी संस्था शिर्डी  व आर झुंनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले 
 प्रसंगी  .संदिप   सोनवणे प्रदीप  बनसोडे, फकिरा लोढा, सुनील सोनवणे, सचिन तुरकणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अध्यक्ष  संदीप सोनवणे म्हणाले की मोफत वैद्यकीय नेत्र शिबिर जनहितासाठी असुन त्याचा लाभ गोरगरीब लोकांना झाला पाहिजे या हेतूने हा उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवला जात असल्याचे सांगितले या शिबिरास शिर्डीसह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घेतला या प्रसंगी   राहुल खरात सुनील राखपसारे आदिनाथ वाघ लक्ष्मण झाडे सुनील तुपे मुर्गे ब्रदर शुभम मुर्तडक सुनील गुरख गणपत भागवत रवींद्र तुरकने जालिंदर तुरकणे  किशोर दंडवते विलास गायकवाड चंद्रकांत देवकर जालिंदर शिंदे प्रदीप पठारे प्रमोद गाढवे म्यानसिंग सतीश  राहुल  फुदे   अमोल कमोटकर लक्ष्मण झाडे प्रवीण सरोदे आणि साईसंगम संस्थेचे पदाधिकारी उपस्तिथ होते

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

*पोळा सणाच्या निमित्ताने कर्नाटक येथील साई भक्ताकडून साईबाबांना सोन्याचे कडे दान..!*


श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी देत असतात. कर्नाटक येथील रहिवाशी साईभक्त व्‍यंकप्‍पा गणपती घोडके यांनी ०४ लाख ७६ हजार ३६४ रूपये किमतीचे ५६.७१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे श्री साईचरणी अर्पण करून संस्‍थानच्‍या मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे यांच्‍याकडे सुपुर्द केले. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार 

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

उक्कडगाव येथील श्री .रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे दस्ताच्या बनावटीकरण व सोन्या चांदीच्या वस्तू व पैश्यांच्या अपहार करणाऱ्या आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

उक्कडगाव येथील श्री .रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे दस्ताच्या बनावटीकरण व सोन्या चांदीच्या वस्तू व पैश्यांच्या अपहार करणाऱ्या आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला


 तक्रारदार वैभव शिंदे यांचे वतीने शिर्डी येथील ॲड. अमोल अजय पवार यांनी* उच्च* *न्यायालयात बाजू मांडली


शिर्डी 
 

उक्कडगाव येथील श्री .रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे अपहार व धर्मादाय उप – आयुक्त कार्यालयाच्या दस्ताच्या बनावटीकरण करणाऱ्या आरोपींचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या ट्रस्टच्या पैश्यांचा ,सोन्या-चांदीच्या वस्तू व इतर मालमत्तेचा अपहार करून धर्मादाय उप आयुक्त कार्यालयातील परिशिष्ट 1 चे बनावटीकरण दस्तऐवज केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ०२४१/२०२४ हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी १) निवृत्ती रंगनाथ शिंदे, २) अशोक गंगाराम शिंदे, ३) लुखाजी सावळेराम शिंदे, ४) सोपान कारभारी शिंदे, ५) बाळासाहेब शंकर शिंदे, ६) नंदू अशोक शिंदे, ७) देविदास लुखाजी शिंदे, ८) बाळासाहेब कारभारी शिंदे, ९) प्रकाश लक्ष्मण शिंदे, १०) विजय बबन शिंदे, ११) शिवाजी आण्णासाहेब लावरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता.

सदरचा जामीन अर्ज मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याची गंभीरता बघता गुन्ह्याचा कसून आणि योग्य तपास होणे गरजेचे असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
तक्रारदार वैभव शिंदे यांचे वतीने शिर्डी येथील ॲड. अमोल अजय पवार यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली

राज्य सरकारने मंत्रिमंडळ उप समितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड


शिर्डी, 

मराठा समाजाच्या सामाजिक शेक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्यसरकारने मंत्रीमंडळाची उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजपर्यंत यशस्वीपणे केलेल्या कार्यवाहीला पुढे घेवून जाण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

बारा सदस्यांच्या या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रिडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय व वैधानिक कामकाजाचा संबंध ठेवणे, या संदर्भातील न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समूपदेशींशी समन्वय ठेवणे, न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबतची कार्यपद्धती ठरविणे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीशी समन्वय ठेवून त्यांच्या कामकाजातील अडचणींचे निवारण करणे, मराठा आंदोलक व त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करणे, जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेवून प्रक्रीया सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करणे, मराठा समाजासाठी घोषीत केलेल्या योजना तसेच सारथी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबणीचा आढावा घेण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा

ज्ञानेश्वर साबळे, (लोणी )

पोळा हा  बैलांप्रती ,असलेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असून हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेष त विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकरी आपल्या बैलांना सजविण्यासाठी विशेष तयारी करतात छान पैठणी विविध रंगाची कपडे आणि शिंगांना साळून रंग लावून आकर्षक बनवितात या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखविला जातो पुरणपोळी कडी भजी असे पारंपारिक व बाजरी  ज्वारी गहू हे आपले शेतातील कडधान्य पीक सुपामध्ये घेऊन बैलांना ओवाळून त्यांची पूजा करून त्यांना ते चारतात व पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा त्यांना भरविला जातो प्रत्येक गावा गावी आपोआपल्या कुलदैवतांच्या व गावामध्ये असलेले प्रत्येक देवाच्या मंदिरात बैल जोडी ना नेऊन नारळ फोडून शेतकरी देवाकडे एकच मागणे मागतो इडा पिडा जाऊदे बळीच राज्य येऊ दे असं तो देवाकडे शेतकऱ्याच्या पिकाला सांगली सोन्याचे भाव येऊ दे हेच शेतकऱ्याचे देवाकडे कळकळीने मोठ्या आशेच्या भावना असतात मंदिरात बैल घेऊन बैलांची आरती पूजा केली जाते व गावाच्या वेशीतून सर्व गावातील बैल जोड्या एक लाईनीत ढोल ताशांच्या गजरात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जातात ज्यांच्याकडे बैल नाही ते विशेषतः शहरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातात पोळा हा सण केवळ बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा नसून ग्रामीण भागातील जीवनशैलीतील परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविले चा सण आहे

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेचा पाठिंबाडॉक्टर संजय उबाळे अध्यक्ष








राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी – प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेचा पाठिंबा डॉ संजय उबाळे अध्यक्ष 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी गेल्या २ दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी संपावर आहेत.

दिनांक 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार सेवेत समायोजन होणे अपेक्षित असताना, आतापर्यंत एकूण ६९ संवर्गांपैकी फक्त दोन पदांना सामवून घेण्यात आले आहे. उर्वरित सर्व पदांनाही विनाविलंब सेवेत घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
 प्रमुख मागण्या :
सर्व तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे.
१५ ते २० वर्षे तुटपुंज्या पगारावर सेवा देत आहेत  कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
10 वर्ष झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे समायोजन गरजेचे आहे 
आरोग्य विभागात सध्या १०,००० हून अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत असून, वय वाढल्यामुळे अनेक कर्मचारी कार्यक्षमतेतून वंचित होत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण, विवाह, आरोग्य उपचार आदी समस्या गंभीर होत चालल्या आहेत.
2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी.
या मागण्यांना प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करताना संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. संजय उबाळे म्हणाले की,
"कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, शासनाने याबाबत ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे."

चैतन्य कोतेची जिद्द रंगली; शिर्डीकरांनी केला नेव्ही ऑफिसरचे जल्लोषात स्वागत

चैतन्य कोतेची जिद्द रंगली; शिर्डीकरांनी केला नेव्ही ऑफिसरचे जल्लोषात स्वागत



शिर्डी प्रतिनिधी 

शिर्डीचा भूमिपुत्र चैतन्य संजय कोते बनला नेव्ही ऑफिसर शिर्डी करांनी केले जल्लोषात स्वागत दहा पावलं चालत येऊन आईला ग्रँड सॅल्यूट केला व आईच्या डोक्यावर नेव्ही ऑफिसर ची टोपी घालताच सर्वांनाच अनावर झाले आनंदाआश्रू पहिल्या पगारात आईची गहाण ठेवलेले दागिने सोडविणार व आईच्या संघर्षाला पूर्णविराम देणार असल्याचे नेव्ही ऑफिसर चैतन्य कोते यांनी सांगितले
        नेव्ही ऑफिसर ची पोस्ट घेतल्यानंतर प्रथमच शिर्डीत आलेल्या चैतन्य कोते या नेव्ही अधिकाऱ्यावर फुलाचा वर्षाव करत जोरदार स्वागत केले स्वागतासाठी आई चुलती नातेवाईक यांच्यासह शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर शिर्डी विविध सेवा सहकारी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कोते यांच्यासह अन्य मान्यवर व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलाने सॅल्यूट केल्यानंतर चैतन्याच्या आईला अश्रू व भावना अनावर झाल्या मुलाने माझ्या बरोबरच त्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण केले वडिलांना दिलेला शब्द खरा करून स्वतःला सिद्ध केले असल्याची भावना यावेळी चैतन्य कोते यांची आई जयश्री ताई कोते यांनी व्यक्त केली याप्रसंगी बोलताना शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते म्हणाले की चैतन्य याने आपल्या आईला चार पावले चालत येऊन सॅल्यूट केला व देशाचा अभिमान असलेली नेव्ही ऑफिसरची टोपी आईच्या डोक्यात घातली हा त्या भगिनीच्या दृष्टीने खरोखर खूप भाग्याचा व आनंदी क्षण आहे तर आमच्या सर्वांसाठी गहिवरणारा व डोळ्यात आनंदाअश्रु आणणारा आहे नेव्ही मध्ये अधिक वरच्या पदावर जा मात्र आईचा संघर्ष केव्हाही विसरू नका असा भावनिक सल्ला देत चैतन्यला भावी वाटचालीसाठी कैलास बापू कोते यांनी शुभेच्छा दिल्या तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशभाऊ गोंदकर म्हणाले की पतीच्या निधनानंतर जयश्रीताई कोते यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट करून मुलाला नेव्ही ऑफिसर बनवले आहे चैतन्य याने आईचा संघर्ष व कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले चैतन्य याची आई व चुलती यांचा संघर्ष चैतन्यला अधिकारी बनवून गेला
चैतन्य याच्या जिद्दीला चिकाटीला व मेहनतीला सलामच आहे त्याने शिर्डी करांचा नावलौकिक नेव्ही मध्ये सुद्धा वाढवला आहे भारतीय जनता पार्टीचे शिर्डी मंडलाध्यक्ष रवींद्र तात्या गोंदकर म्हणाले की



पतीच्या निधनानंतर अगदी खडतर व संघर्षमय प्रवास करून पतीचे व मुलाचे स्वप्न साकारणाऱ्या जयश्री ताईंना मानाचा मुजरा व सॅल्यूट आहे चैतन्य याने नेव्ही ऑफिसर बनून शिर्डीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून आलेले नेव्ही ऑफिसर चैतन्य कोते सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मला प्रवेश घेतेवेळी आर्थिक अडचण आली त्यावेळी आईने कानातील सोन्याचे दागिने गहाण टाकले माझ्या पहिल्या पगारातून ते दागिने सोडवल्यानंतर मला खरे समाधान लाभेल आईच्या व नातेवाईकांच्या कष्टाला मी कधीही विसरणार नाही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले

सुगंधाबाई साळवे यांचे निधन

सुगंधाबाई साळवे यांचे निधन


शिर्डी 

शिर्डी प्रसाद नगर येथील सुगंधाबाई बापूराव साळवे यांचे 17/8/2025 रोजी दुःखद निधन झाले त्यांचा जलविधी रविवार दिनांक 24/8/2025 रोजी सकाळी दहा वाजता एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण मंदिर नांदुरकी शिर्डी यांच्या पश्चात मुलगा आयु सुरेश साळवे आयु मधुकर साळवे आयु सुधाकर साळवे आयु दिनकर साळवे सौ सिंधुताई मोरे नातू पंतू व साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे कर्मचारी दिनकर साळवे यांचे मातोश्री होत शोकाकुल समस्त साळवे परिवार शिर्डी

शिर्डीतील लाईट व सबस्टेशनच्या तांत्रिक अडचणी दूर करू - केंद्रीय ऊर्जामंत्री नाईक

शिर्डीतील लाईट व सबस्टेशनच्या तांत्रिक अडचणी दूर करू -   केंद्रीय ऊर्जामंत्री नाईक

शिर्डी 

केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी शिर्डीला भेट दिली असता साई दर्शनानंतर जैन काच मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी येथील जैन समाजाचे अध्यक्ष सतीश गंगवाल, उद्योजक दीपक निकम, प्रतीक गंगवाल, नीरज महाजन, विकी भोसले यांच्या हस्ते त्यांचा साई प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सतीश गंगवाल यांनी सांगितले की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असून येथे नेहमीच साईभक्तांची गर्दी असते. मोठ्या प्रमाणावर हॉटेल इंडस्ट्री असल्याने वारंवार होणाऱ्या लाईट येजा-जाण्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर साईभक्तांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीला प्रतिसाद देताना केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या कामाबाबत येणारा खर्च व निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या. "हा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.


शिर्डीत सबस्टेशन उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असूनही आर्थिक निधी व तांत्रिक अडचणींमुळे शहरातील व्यावसायिक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. "हा महत्त्वाचा प्रश्न असून साईबाबांच्या भूमीतील ही समस्या प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून या तांत्रिक अडचणी दूर करू," असे श्रीपाद नाईक म्हणाले.
"माझी साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी माझा अपघात झाला होता. त्या अपघातातून आम्ही साईबाबांच्या आशीर्वादामुळेच सहीसलामत बाहेर पडलो. त्यामुळे शिर्डीकरांची अडचण तातडीने सोडवली जाईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले आहे," असेही ते म्हणाले.
शिर्डी येथील काच मंदिरात केंद्रीय ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांचा सन्मान करताना मान्यवर उपस्थित होते.

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

येवले आखाडा सोसायटी चे चेअरमन पदी किशोर जाधव व व्हा.चेअरमन पदी बाबासाहेब येवले यांची निवड बिन विरोध निवड


येवले आखाडा सोसायटी चे चेअरमन पदी किशोर जाधव व व्हा.चेअरमन पदी बाबासाहेब येवले यांची निवड बिन विरोध निवड

राहूरी

येवले आखाडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, मर्या येवले आखाडा या संस्थेची चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीकरिता श्रीमती एस.डी.माने मँडम अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली दिनांक १८-८-२०२५ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन अरण्यात आले होते. चेअरमन पदासाठी श्री.किशोर सखाराम जाधव यांचा एकमेव अर्ज आलयाने त्यांच्या उमेदवारीची सुचना श्री.अरुण बाबुराव तनपुरे यांनी मांडली त्यास विजय परसराम जाधव यांनी अनुमोदन दिले त्याच प्रमाणे व्हा.चेअरमन पदासाठी श्री.बाबासाहेब गंगाधर येवले यांचा एकमेव अर्ज आलयाने त्यांच्या नावाची सुचना श्री.बाळासाहेब पांडुरंग जाधव यांनी मांडली त्यास श्री.रेवन्नाथ लहानू गाढे यांनी अनुमोदन दिले. कृषीउत्तपन्न बाजार समिती सभापती व डॉ.बाबुराव तनपुरे कारखान्याचे चेअरमन श्री अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड करण्यात आली, त्या प्रसंगी संस्थेचे संचालक अरुण बाबुराव तनपुरे, रेवन्नाथ लहानू गाढे, हर्ष अरुण तनपुरे,विठ्ठल भाऊराव शेटे, विश्वनाथ भागवत शेट, बाळासाहेब पांडुरंग जाधव, छोटू हुसेन लहारे, कौशल्याबाई बाळकृष्ण जाधव, लताबाई रखमाजी वरघुडे,अनिता दशरथ पोपळघट संस्थेचे सचिव श्री.मल्हारी घुगरकरव योगेश लबडे उपस्थित होते.


जोगेश्वरी सोसायटीचे संचालक प्रकाश भूजाडी,एम.पी सोसायटीचे संचालक विलास तनंपुरे,फ्रुट ग्रोअर्स सोसायटी चे व्हा.चेअरमन दत्तात्रय येवले, विजय डौले,मारुती हारदे,ज्ञानदेव हारदे,ताराचंद तनपुरे, दत्तात्रय पानसंबळ, सुभाष गुलदगड, बाळासाहेब जाधव, महेश बनकर, गणेश ढेरे,अजित येवले,महेश येवले आदि मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या व आभार माजी नगरसेवक श्री.शहाजी जाधव यांनी मानले.

क्रांती युवक मंडळ व सन्मित्र युवक मंडळाचा शिस्तबद्ध व आदर्श सार्वजनिक दहीहंडी उत्सव…..

क्रांती युवक मंडळ व सन्मित्र युवक मंडळाचा शिस्तबद्ध व आदर्श
 सार्वजनिक दहीहंडी उत्सव…..



शिर्डी 

शिर्डी शहरात गेल्या ४० वर्षापासून दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक संस्कार जोपासण्याचे कार्य करत आहे. 
शिर्डी शहरात सर्वात शिस्तबद्ध व उंच दहीहंडी फोडण्याची मंडळाची परंपरा आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी दक्षिणमुखी मारुती मंदिरातून शिर्डी तील सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ कोते ( छोटे बापू), मा. मा. नगरसेवक गजानन शेर्वेकर, साई संस्थानचे मा. विश्वस्त सचिन तांबे, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, जगन्नाथ गोंदकर, बाळासाहेब थोरात, या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. 
पालखी मार्गवर उंच दहीहंड्या नियोजन व शिस्तबद्ध फोडण्यात आल्याने शिर्डी शहरात क्रांती युवक मंडळाचे कौतुक होत आहे. 
तसेच दहीहंडी उत्सव मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात स्थानिक महिला, व ग्रामस्थांची भर पावसात उपस्थिती लक्षणीय होती. 
तसेच बाल वेशातील नटून थटून आलेले श्रीकृष्ण व राधा सर्वांचे आकर्षण केंद्र बनले. 
सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी धार्मिक गाण्यावर बैंडच्या तालावर भर पावसात ठेका धरत आनंद लुटला. 
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते बबलू वर्पे , आकाश वाडेकर, ललित शेळके, प्रसाद जाधव, अतिक पठाण, सचिन हरळे, रितेश भालेराव, 
आदित्य वारूळे, संदेश रत्नपारखी, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 


रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

नेवासा फाट्यावरील फर्निचरच्या दुकानाला आग पाच जणांचा होरपळून मृत्यू

नेवासा फाट्यावरील फर्निचरच्या दुकानाला आग  पाच जणांचा होरपळून मृत्यू 


नेवासा 
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. कालीका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा धुराने गुदमरून, होरपळून करुण अंत झाला. या घटनेने संपूर्ण नेवासा परिसर शोकसागरात बुडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये –मयूर अरुण रासने (वय ४५) पायल मयूर रासने (वय ३८) अंश मयूर रासने (वय १०) चैतन्य मयूर रासने (वय ७) तसेच एकावृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते. मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर घरभर पसरला आणि गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्धी येण्यापूर्वीच मृत्यूने कवेत घेतले. आई-वडील, दोन चिमुरडी मुले आणि वृद्ध आई अशा पाच जीवांचा एकाच वेळी घेतलेला बळी पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर यश किरण रासने वय २५ याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई दोघे नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले असल्याने ते बचावले आहे.
शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र आग लागल्याचे कारण तपासातून निष्पन्न होईल. लाकडी वस्तू आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे बोलले जात आहे.आगीत संपूर्ण फर्निचरचे दुकान भस्मसात झाले असून एकावर अद्याप उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.दरम्यान, निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू, मायबापांची आक्रांत आणि वृद्ध आजीचा करुण अंत… या हृदयद्रावक घटनेने नेवासा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,नेवासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि महेश पाटील, स.पो.नि. अमोल पवार, उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस कर्मचारी पुढील माहिती घेत आहे

EVM मतमोजणीतून सत्याचा विजय – शिर्डी मतदारसंघातील पारदर्शकतेसाठी संघर्ष अखंड सुरूच : सौ. प्रभावती घोगरे

EVM मतमोजणीतून सत्याचा विजय – शिर्डी मतदारसंघातील पारदर्शकतेसाठी संघर्ष अखंड सुरूच : सौ. प्रभावती घोगरे

शिर्डी, 
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुप्रीम कोर्टाने दिलेला अलीकडील आदेश हा पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठा टप्पा मानला जात आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी न्यायालयाने EVM मधील मतांची प्रत्यक्ष मोजणी करण्याचा आदेश दिला आणि त्यानुसार झालेल्या मतमोजणीत खरा निकाल देशासमोर आला.
“हा फक्त एका उमेदवाराचा विजय नाही, तर संपूर्ण लोकशाहीचा आणि मतदारांच्या हक्कांचा विजय आहे,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी ठामपणे सांगितले.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून सौ. घोगरे मैदानात उतरल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिला सक्षमीकरण, स्थानिक पायाभूत सुविधा आणि शिर्डी मतदारसंघातील भीतीचे वातावरण या गंभीर मुद्द्यांवर भर दिला.
मतदानानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र अनेक मतदारांनी बोगस मतदान, EVM मध्ये फेरफार आणि निकाल प्रक्रियेतील अपारदर्शकता याबाबत तक्रारी केल्या.

“लोकशाहीत प्रत्येक मत हे पवित्र असते. जनतेचा विश्वास हा निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. जर मतदारांना निकालाबाबत शंका वाटू लागली, तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच EVM मधील मतांची प्रत्यक्ष मोजणी होणे ही काळाची गरज आहे,” असे सौ. घोगरे म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालेल्या EVM मतमोजणीतून निकालांमध्ये झालेले बदल हे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी नोंद ठरल्याचे सौ. घोगरे यांनी नमूद केले.
“हा निकाल हे सिद्ध करतो की, संघर्ष केला तर सत्याचा विजय होतोच. न्यायालयीन लढ्याद्वारेही लोकशाही वाचवता येते,” असे त्यांनी सांगितले.

“हा निर्णय संपूर्ण देशासाठी संदेश आहे  कोणतीही सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीचा आवाज दाबता येत नाही. मी शिर्डी मतदारसंघातील जनतेला विश्वास देते की, पारदर्शक आणि स्वच्छ निवडणूक प्रणालीसाठी माझा संघर्ष अखंड सुरू राहील. मतदारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विश्वासासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन,” असे सौ. प्रभावती घोगरे यांनी ठामपणे सांगितले.

या निर्णयामुळे शिर्डी मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंद व समाधानाची भावना निर्माण झाली आहे. “आमचे मत योग्य प्रकारे मोजले जावे, हीच आमची अपेक्षा आहे.”असे अनेक मतदारांनी सांगितले.

लोकशाहीच्या या विजयामुळे केवळ शिर्डीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील आणि देशातील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या संघर्षाने एक संदेश दिला आहे“लोकशाही वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेच पाहिजे, कारण लोकशाही म्हणजेच जनता आणि जनता म्हणजेच लोकशाही.”असे सौ.घोगरे यांनी मत व्यक्त केले.

पर्यावरण पूरक गणपती बाप्पा माझा मातीचा

पर्यावरण पूरक गणपती  बाप्पा माझा  मातीचा

औरंगाबाद 

महिला मंडळ औरंगाबाद संचालित 
शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा ,छत्रपती संभाजी नगर येथे स्काऊट गाईड हरित सेने अंतर्गत गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न


दीपशिखा फाउंडेशनच्या मनीषा चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेत बागेतील माती पासून विद्यार्थ्यांना गणपती बनवणे शिकविण्यात आले.


या कार्यशाळेत 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
हरितसेना प्रमुख मनीषा (आदमने)राहिंज मॅडम व स्काऊटर सुरेखा जोनवाल मॅडम यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. गाईडर सीमा वैजापूरकर मॅडम व गाईडर श्रीमती योगिता थोरात मॅडम या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. 


शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हमदापूरकर मॅडम व पर्यवेक्षिका सौ.जंगले मॅडम यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा उत्तम रीतीने पार पडली.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...