लोणी येथे "मोदक देतो, मी लाडू देतो" या नव्या गणेशगीताचे पोस्टर लोकार्पण
लोणी :
गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले की भक्तांच्या मनात आनंदाची लहर संचारते. अशा उत्साहाच्या पार्श्वभूमीवर "मोदक देतो, मी लाडू देतो’ या नव्या गणेश गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, या गाण्याच्या पोस्टरचे भव्य लोकार्पण गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले. हे पोस्टर लोकार्पण सादत मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी कलाकार व निर्मिती संघाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत नव्या गाण्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी हसतमुखाने पोस्टरचे अनावरण करत सर्व टीमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या गाण्याचे सॉंग डायरेक्टर प्रमोद पंडित असून निर्मितीची धुरा आबा निर्मळ, उमेश पन्हाळे व नरसिम्हा सिंग प्रमोद पंडित ,ज्ञानदेव शिंदे, सतीश कदम प्राजक्ता घोलप पूजा जोशी जया कोरे यांनी सांभाळली आहे. गाण्याच्या चित्रीकरणात कलाकार आबा निर्मळ सौ वनिता निर्मळ यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
चित्रीकरणासाठी लोणी-निर्मळ पिंपरी रोडवरील सुप्रसिद्ध हॉटेल K.B. रेस्टॉरंट परिसराची निवड करण्यात आली होती. या चित्रीकरणाला हॉटेलचे मालक सचिन दादा आहेर पाटील यांचे तसेच ज्ञानेश्वर साबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. गणेश भक्तांसाठी खास सादर होत असलेले हे नवे गाणे गणेशोत्सवाच्या वातावरणाला अधिक रंगतदार बनवणार असून, स्थानिक कलावंतांना मिळालेली ही संधी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. पोस्टर लोकार्पण कार्यक्रमामुळे लोणी परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिकच वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा