राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी – प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेचा पाठिंबा डॉ संजय उबाळे अध्यक्ष
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी गेल्या २ दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी संपावर आहेत.
दिनांक 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार सेवेत समायोजन होणे अपेक्षित असताना, आतापर्यंत एकूण ६९ संवर्गांपैकी फक्त दोन पदांना सामवून घेण्यात आले आहे. उर्वरित सर्व पदांनाही विनाविलंब सेवेत घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या :
सर्व तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे.
१५ ते २० वर्षे तुटपुंज्या पगारावर सेवा देत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
10 वर्ष झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे समायोजन गरजेचे आहे
आरोग्य विभागात सध्या १०,००० हून अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत असून, वय वाढल्यामुळे अनेक कर्मचारी कार्यक्षमतेतून वंचित होत आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण, विवाह, आरोग्य उपचार आदी समस्या गंभीर होत चालल्या आहेत.
2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी.
या मागण्यांना प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर करताना संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. संजय उबाळे म्हणाले की,
"कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, शासनाने याबाबत ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा