गुरुवार, ३१ जुलै, २०२५

अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथ सागर भरले याचा आनंद मंत्री विखे पाटील यांनी जलपूजन करून व्यक्त केला

लोणी 

नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या  निर्मीतीची वाटचाल.. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार... या धरणाच्या निर्मितीत  बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्याच्या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण त्यांनी अनुभवला!

अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले..याचा आनंद मंत्री विखे पाटील यांनी जलपूजन करून व्यक्त केला..धरणावर येवूनच त्यांनी नाथसागराची खणा नारळान ओटी भरून गोदामातेची आरती केली. सायरन वाजवून पाणी सोडण्याची औपचारिक प्रक्रीया पूर्ण केली.अनेक वर्षानंतर जुलै महीन्यातच नाथ भरण्याचा क्षण लाभक्षेत्राली यंदा अनुभवता आला आहे.

मराठावाड्याला जेवढा झाला तेवढाच तो अहील्यानगरला सुध्दा आहे असे  सांगून कधी काळी या धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उतर असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.देशाचे पंतप्रधान लाला बहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमीपूजन झाल्याच्या ऐतिहसिक आठवणी मनामध्ये घर करून असल्याचे त्यांनी सांगितले.

या धरणामध्ये माझ्या बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्यानंतर  खिर्डी गावाला भेट देण्याच्या प्रसंगाचे वर्णन सांगून ,धुळे येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो तेव्हा  सायकलवर नाथसागर पाहायला कसे आलो आणि जाताना बसवर सायकली टाकून कशा नेल्या हे सांगायला सुध्दा ते भाषणाच्या ओघात विसरले नाहीत.

पंतप्रधान इंदिरा गांधी याठिकाणी आल्या तेव्हा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार झाला.मुख्यमंत्री असलेले स्व.शंकरराव चव्हाण आणि तेव्हाचे पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ यांच्यासह अनेकांच्या असलेल्या उपस्थीतीलाही त्यांनी उजाळा दिला.

भविष्यात पाण्याचे संघर्ष आपल्याला संपवायाचे आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारने केला आहे.आता उल्हास खोर्यातील पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने आरखडा तयार केला असून त्यावर काम सुरू झाले.केवळ सर्व्हेक्षणासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या  निधीची तरदूत केली असून नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय नासिक येथे सुरू होत असल्याची माहीती त्यांनी दिली.


पद्मभुषण डाॅ बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी नदीजोड प्रकल्पाच्या मांडलेल्या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळेच या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात आहे.डाॅ बाळासाहेब विखे पाटील आणि डॉ गणपतराव देशमुख या दोघांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आपल्यावर सोपविले असल्याने ते पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून घेतली असल्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.

या परीसारातील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यामातून करण्यात येणार असून अन्य काही प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करणार आहे.

राज्यातील धरणातून गाळ काढण्यासाठी स्वतंत्र धोरण घेण्यात येणार असून यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास तसेच बॅकवाॅरचा फायदा अहील्यानगरच्या तालुक्यांना होईल. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा प्राधान्यक्रम कायम ठेवून यंदाच्या वर्षी आवर्तनाचे नियोजन झाले.उन्हाळ्यातही याचा  फायदा झाल्याकडे  मंत्री विखे पाटील यांनी सर्वाचै लक्ष वेधले.

आ.विलास बापू भुमरे यांनी नाथसागराचे जलपूजन करणारे पहीले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ठरले आहेत.या भागातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला ३०२ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

याप्रसंगी आ.हिकमत उढाण आ.विजयसिंह पंडीत आ.रमेश बोरनारे आ.विठ्ठलराव लंघे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मुख्य अभियंता अरूण नाईक सुनंदा जगताप मुख्य अभियंता राजीव मुंदडा सभापती राजू भुमरे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादापाटील बार्हे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.


कोट 
कार्यक्रम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या घोषणाबाजीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधींनीना बोलावून घेत सभेच्या ठिकाणीच प्रश्नाबबात चर्चा केली आणि जिल्हाधिकरी स्वामी यांना सूचना दिल्या.

सौ. प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

सौ. प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

 राहाता 
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या यशस्वी नियुक्तीच्या निमित्ताने त्यांचा भव्य सत्कार आज संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मा. महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी सौ. प्रभावती घोगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले, “मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली महिला कार्यकर्ती आहे. ही निवड ही माझ्या वैयक्तिक कामाची नव्हे, तर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्ठावान सेवाभावाची पावती आहे. हा मान मिळण्यात थोरात साहेबांचे मार्गदर्शन, पक्षाचे नेतृत्व आणि जनतेचा विश्वास यांचे मोलाचे योगदान आहे.”

विधान परिषदेचे आमदार मा. सुधीर तांबे साहेब यांनीही सौ. घोगरे यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे, काँग्रेस नेते अमोल घोगरे, सचिन (मुन्ना) आहेर, दीपक विखे पाटील, शामराव घोगरे, सुहास आहेर, रणजीत घोगरे, सौ. शितल उगलमोगले, जया गाडे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी सौ. प्रभावती घोगरे पुढे म्हणाल्या, “या महत्त्वाच्या टप्प्यावर मला खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व पक्ष पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. थोरात साहेबांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच अनेक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी मिळत आहे.”

कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण उत्साही, प्रेरणादायी आणि पक्ष निष्ठा जागवणारे होते.
“आपल्या प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांमुळेच हा गौरवाचा क्षण अनुभवता आला. हा स्नेह असाच अखंड राहो,” अशा भावना शेवटी व्यक्त करत सौ. घोगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तसेच विविध पक्षांचे नेते, काँग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकारी आणि स्नेहीमंडळींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

“हे पद मी केवळ प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर शेतकरी, कामगार, गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी पूर्णत: समर्पित राहून पार पाडणार आहे,” अशी ठाम भूमिका सौ. प्रभावती घोगरे यांनी यावेळी मांडली.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

प्रामाणिक पणामुळे उषा जगताप यांची चौतीस वर्षे एकाच शाळेत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. अनुराधा ताई आदिक.


लोहगाव


श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षिका उषा मच्छिंद्र जगताप यांचा चौतीस वर्षे सेवेतून सेवा मुक्त झाल्यामुळे त्यांचा  श्रीरामपूर बेलापूर येथे साई सुधा काळे रसवंती येथे प्रमुख मान्यवर व पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हंसराज आदिक बापूसाहेब पटारे .ढोकणे साहेब. सुनिता भाऊ थोरात
आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुराधा ताई आदिक म्हणाले की ज्या शाळेत जॉयनिंग त्याच शाळेत रिटायडमेंट होणे म्हणजे उषाताई जगताप यांच्या प्रामाणिक कामाची पावती होय. यावेळी अशोक करडक. किशोर बकाल. यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद थोरात व उपस्थितांचे आभार मच्छिंद्र जगताप यांनी मानले.

साई पारायण सेवा आणि श्रद्धेचा संगम: डॉ. सुजय विखे पाटील

साई पारायण सेवा आणि श्रद्धेचा संगम: डॉ. सुजय विखे पाटील


शिर्डी 
शिर्डी येथे सुरू असलेल्या साई सच्चरित पारायण सोहळ्याला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. १००० रूमजवळ भक्तिमय वातावरणात पारायणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यात त्यांनी साई महाराजांचे प्रवचन करणाऱ्या पूज्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.

या पारायण सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून, "ही सामूहिक सेवा आणि श्रद्धेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे," असे मत डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त.

डॉ. विखे पाटील यांनी भाविक भक्तांसमवेत भारतीय बैठक लावून प्रसाद ग्रहण करताना, या क्षणाला सेवा आणि श्रद्धेचा संगम असे सांगितले. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने पारायण सोहळ्यासाठी एक लाख रुपयांची देणगी आयोजक समितीकडे सुपूर्त करण्यात आली.

यावेळी डॉ. विखे पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यात  शिर्डीत होणाऱ्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगामी कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर होईल, अशी माहिती देखील दिली. तसेच त्यांनी  आग्रहाने आवाहन केले की, या पावन कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या  स्वयंसेवकांनी आमच्याशी संपर्क साधावा.

या पवित्र पारायण सोहळ्यात हजारो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविल्याने परिसर अतिशय भक्तिमय, ऊर्जा आणि एकात्मतेने भारलेला दिसत होता. श्री साई बाबांच्या चरणी मन मोकळं करणाऱ्या या सोहळ्याने प्रत्येकाच्या हृदयात अनमोल स्मृती आणि नवचैतन्य पसरवले. यावेळी अभय शेळके पाटील, भाजपा अध्यक्ष रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते तसेच शिर्डी ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे शासनाचे धोरण - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सहकाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे शासनाचे धोरण - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

*स्वाभिमानी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिव संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन*

शिर्डी, दि. २६  – २०४७ पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये सहकार चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे. सेवा सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीस बळकटी देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणे व सहकारातून रोजगारनिर्मिती करणे हे केंद्र शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

अकोले येथे स्वाभिमानी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिव संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व राज्यभरातून आलेले सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, सेवा सहकारी संस्थांच्या समस्या यापूर्वी गांभीर्याने घेतल्या गेल्या नव्हत्या. मात्र स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून सहकार चळवळीला भक्कम पाठबळ मिळाले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्यासाठी सहकार चळवळ बळकट करावी. राज्य शासन सचिवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी पाठबळ देईल. सेवा सहकारी संस्थांचा इतिहास गौरवशाली असून ज्या उद्दिष्टांनी या संस्था सुरू झाल्या, ती पूर्णत्वास जाऊ शकलेली नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीत संस्थांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थांना उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध करून देण्याची दिशा केंद्र सरकारने घेतली आहे. मार्गदर्शक सूचनांच्या आधारे संस्था आपला व्यवसाय सुरू करू शकतात.‌  

सोसायट्यांचे मानांकन करून त्यांच्यासाठी दर्जानुसार बँकिंग प्रणालीशी जोडणी करण्यात आली तर संस्थांना व्यवसायाची साखळी निर्माण होईल. सहकार चळवळीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही सुरुवात असून सहकार बळकट करण्यासाठी शासन आपले पाठबळ देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्यमंत्री श्री.भोयर म्हणाले, सहकार मंत्रालयाने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे सहकार चळवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही भागांमध्ये सहकार क्षेत्रात चांगले कार्य झाले असले तरी विदर्भात मात्र सहकाराची स्थिती नाजूक आहे. सचिव आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची जबाबदारी शासन घेणार असून लवकरच मंत्रालयात यासंदर्भात विशेष बैठक घेण्यात येईल. त्रिस्तरीय सहकारी रचनेमध्ये सोसायट्यांना नव्या सहकार धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर व अकोले तालुक्यांतील सहकार चळवळीचा आढावा घेत सचिवांच्या मागण्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राज्य शासन सचिवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून समस्या निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला. सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी अधिवेशनाच्या प्रारंभी सचिवांच्या विविध मागण्यांचे प्रास्ताविकात सविस्तर विवेचन केले.
,

शनिवार, २६ जुलै, २०२५

ज्या कामाला लोक अशक्य म्हणत होते, ते काम आपण पूर्ण केलं :डॉ. सुजय विखे पाटील , मोरवाडी व गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली लोकार्पण सोहळा संपन्न

 ज्या कामाला लोक अशक्य म्हणत होते, ते काम आपण पूर्ण केलं :डॉ. सुजय विखे पाटील,
मोरवाडी व गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली लोकार्पण सोहळा संपन्न 




राहाता -
डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र सखोल अभ्यास करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करता आले.
आपले विरोधक, विपरीत विचार करणारे आणि काही हितचिंतक देखील म्हणत होते की या गावांना पाणी मिळणार नाही. मात्र, हे कार्यकर्त्यांच्या आशावादाचा आणि संघर्षाचा विजय आहे. विरोधकांच्या सातत्यपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर हे यश म्हणजे आपला खरा विजय आहे. अशक्य वाटणारे काम आपण शक्य करून दाखवले,असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी नमूद केले.
राहाता तालुक्यातील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे लोकार्पण पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास कैलास नाना तांबे पाटील, मारुती पाटील, डॉ. सोमनाथ गोरे, शेटे साहेब, प्रकाश गोरे, संतोष गोरडे, मच्छू पाटील  निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले निळवंडे लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आम्ही केवळ एका वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेले आहे. पाण्याचा शब्द दिला होता, त्यातील ८०% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार
एक विशेष अनुभव सांगून  डॉ. विखे म्हणाले डोराळे गावातील जलपूजनाच्या कार्यक्रमात दोन ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखता का?’ मी नाही म्हणालो. त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या १८ वर्षांपासून आम्ही नेहमी तुमच्या विरोधात मतदान करत होतो. पण आमच्या गावात पाणी येईल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. आता मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू  अस यावेळी त्यांनी सांगितलं आपल्या कामातून मतपरिवर्तन घडताना पाहिलं आहे. ४० वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय आहे, आणि आजचा दिवस त्यांना समर्पित आहे.
गणेश कारखान्याच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काही लोकांना वाटलं की आता आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्यातून पटलातून बाजूला करता येईल. तशी रणनीती आखली गेली, पण इथल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा ७० हजार मतांनी विधानसभेला निवडून आलो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावूनही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उभे राहिलो आणि विजय मिळवला. आज मी विरोधकांना सांगू इच्छितो विकासाच्या बाजूने रहा आणि तुम्हीही विकासाच्या सोबत या.”
डॉ. विखे पुढे म्हणाले, "काही लोकांनी केवळ बोगद्यात फोटो काढले, हेल्मेट घालून पाण्याखाली हात वर करून केवळ नाटक केलं. मात्र शेवटी खऱ्या अर्थाने पाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मिळालं असल्याचे त्यांनी सांगितले.




शुक्रवार, २५ जुलै, २०२५

प्रहारचे राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी

प्रहारचे  राहुरीत चक्काजाम आंदोलन यशस्वी



 राहुरी 

 राहुरीत प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने शेतकऱ्याचे कैवारी  बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकऱ्याच्या कर्जमाफी सह इतर मागण्यासाठी महाराष्ट्रासह राहुरीत ही चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यातआले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे., सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव तुपे  राष्ट्रीय समाज पक्षाचे नानासाहेब  जुंधारे, चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले यावेळी प्रहार जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब धूस यांनी भाषणात बच्चुभाऊ कडू गेली सहा महिन्यापासून  वेगवेगळे आंदोलन करत आहेत यात सात दिवसाच्या उपोषण केला आहे 140 किलोमीटर उतारा कोरा पायी आंदोलन केला आहे.सरकारने आश्वासन देऊनहीशेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा कोरा उतारा झाला पाहिजे.पेरणी ते कापणी खर्च एम आर इ जी एस अंतर्गत करण्यात यावा.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे.तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाले पाहिजे. दिव्यांगाला घरकुलचा लाभ मिळाला 



पाहिजे.
 यासह इतरही मागण्या  लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांना देण्यात आले उपस्थितांचे आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे पाटील यांनी केले यावेळी जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे उपाध्यक्ष विजय म्हसे शहराध्यक्ष जुबेर मुसानी संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी तालुका सचिव दत्तात्रय  खेमनार सचिन साळवे वेणूनाथ आहेर  अनिल पेरणे काशिनाथ दौंड रायभान धसाळ पत्रकार शिवाजी झावरे केशव जाधव शोभा कडू सोनाली खडके पाराजी भोसले नानासाहेब खपके  भारत आढाव यासीन भाई  देशमुख फिरोज पिंजारी बाळासाहेब गांडळ  राजेंद्र घनवट, रवींद्र तनपुरे,शिवाजी जाधव जालिंदर हिवाळे चंद्रकांत रेबडे कमलेश परदेशी आदी उपस्थित होते

गुरुवार, २४ जुलै, २०२५

सातबारा कोरा केव्हा होणार?’ – सौ. प्रभावती घोगरे यांचा सरकारला थेट सवाल

‘सातबारा कोरा केव्हा होणार?’ – सौ. प्रभावती घोगरे यांचा सरकारला थेट सवाल

राहाता तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार – शेतकरी मोर्चातून शासनाविरोधात तीव्र घोषणा

राहाता (प्रतिनिधी) –
“सातबारा कोरा केव्हा होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
२४ जुलै २०२५ रोजी राहाता येथे आयोजित शेतकरी मोर्चादरम्यान त्यांनी सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या धोरणांवर जोरदार टीका केली.

वीरभद्र मंदिर ते तहसील कार्यालय, राहाता असा भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

मोर्चात विशेष लक्ष वेधून घेतले शेतकरी व्यथा मांडणाऱ्या बैलगाडीने आणि आसूड मारणाऱ्या पोतराजाने. त्यातून शासनाच्या संवेदनशून्य धोरणांचा निषेध करण्यात आला. नगर-मनमाड रस्त्यावर पत्यांची उधळण करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला.

तहसील कार्यालयावर निवेदन सादर करताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या:

> “शासनाने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करणार, कर्जमाफी देणार, हमीभाव देणार, दुधाला दर देणार अशी आश्वासने दिली. पण आज शेतकरीच शेतात मेलाय आणि सरकार गप्प बसलेय. हे फक्त बोलण्याचं सरकार आहे... कामाचं नाही! सातबारा अजूनही तसाच आहे. मग सरकार काय झोपलंय का?”

मोर्चामधून मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
* सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी
* सातबारा कोरा तातडीने करावा
* पीकविमा खात्यावर जमा करावा
* वीजबिल माफ करावे
*  शेतमालाला हमीभाव मिळावा
* दुधाला किमान ₹५० प्रति लिटर दर मिळावा.

मोर्चात सौ. प्रभावती घोगरे, डॉ.एकनाथ गोंदकर, ॲड.पंकज लोंढे, सुहासराव वहाडणे, सचिन कोते, सचिन चौगुले, भगवानराव टिळेकर, धनंजय गाडेकर, अनिल बोठे, विक्रांत दंडवते, अनिल गाढवे, नानासाहेब नळे, ज्ञानेश्वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, उत्तमराव मते, विजय मोगले, विठ्ठलराव शेळके, गणेश सोमवंशी, शशिकांत लोळगे, रणजीत बोठे, सोमनाथ गोरे, बाळासाहेब आहेर, चंद्रभान धनवटे, बाळासाहेब गिधाड, भानुदास कातोरे, गंगाधर बेंद्रे, सचिन गाडेकर, अमृत गायके, संजय डांगे, सौरभ शेळके,मुन्ना फिटर, राजेंद्र निर्मळ, अक्षय गोर्डे, दिनेश शेळके, वसंतराव काळे, कानिफनाथ तांबे, योगेश सातपुते, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, श्याम घोगरे, निलेश शेळके, अमोल बनसोडे, पुंडलिक बावके, अजय साळुंखे,बबन डांगे ,बाबासाहेब डांगे, सुरेश गुगळे, संदीप शिरसागर, जगन सरोदे,गणेश सोनवणे,किशोर त्रिभुवन, सतीश रोहम,विशाल वाघमारे, दीपक सोळंकी, अभिजीत बोठे, सोमनाथ जेजुरकर तसेच महिला सुजाता घोगरे, वर्षाताई घोगरे, लोणी खु.ग्रामपंचायत सदस्य आशा आहेर, सुनिता कोरडे तसेच अनेक महिला आदींसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी “सातबारा कोरा करा!”, “शेतकरी जगला पाहिजे!” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केला .

बुधवार, २३ जुलै, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या कडून अनोखा उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या कडून अनोखा उपक्रम

शिर्डी 

भाजपा शिर्डी शहराचे मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे  निमित्त शिर्डी शहर नियमित स्वछ राहील यासाठी अहोरात्र काम करणार्‍या सफाई कर्मचारी महिलांना पैठणी व पुरूषांना ड्रेस आणि मिठाईचे वाटप करून सन्मान करण्यात आला व लाडक्या बहिणींनी केक कापुन घोषणा देत वाढदिवस साजरा केला. 
त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलीपराव, सुनील, गणेश, दिगंबर या गोंदकर परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सर्व कार्यकर्ते व सफाई कर्मचाऱ्यांनी देवाभाऊ यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रत्येकाने श्री साईबाबांचे चरणी द्वारकामाई मध्ये नारळ अर्पण केले. त्यांच्या हातून महाराष्ट्राचा अधिकाधिक विकास व्हावा अशी प्रार्थना करून बाबांचे महासमाधीवर वस्त्र अर्पण करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपा मा.शहराध्यक्ष सचिन शिंदे,  मा. नगरसेवक गजानन शेर्वेकर, गणेश कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, शिर्डी नप चे मा. गटनेते अशोक गोंदकर, मा.नगराध्यक्षा अलकाताई शेजवळ, देवराम भाऊ सजन, भाजपा युवा मोर्चाचे मा.अध्यक्ष सचिन तांबे, जनेश्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत कोते, भाजपा युवा मोर्चाचे मा.शहराध्यक्ष चेतन कोते, गणेश जाधव, मा.नगरसेवक किरण बर्डे, अड.विक्रांत वाकचौरे, जयंतीभाई पटेल, किरण बोरुडे, वसंत गोंदकर, सोमराज कावळे, पंडित गुडे, शाम गायके, आकाश त्रिपाठी, प्रतीक शेळके, प्रकाश गोंदकर, गणेश सुपेकर, सुभाष यादगुडे, धनसिंग पाटील, तान्हाजी गोंदकर, रमेश शेळके, शब्बीर भाई सय्यद, सुधीर शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवार, २२ जुलै, २०२५

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. डॉ. संदीप आहेर

 संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.  डॉ. संदीप आहेर








रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेने दिनांक 22 जुलै मंगळवार रोजी गुरुकुल अंतर्गत क्षेत्रभेट आयोजित केली होती सदर क्षेत्रभेट वाकडी शिवारातील गौरी गौतम पोल्ट्री फार्म या घोगळ परिवाराच्या पोल्ट्री फार्मवर कुक्कुटपालन व्यवसाय पाहण्यासाठी व मुलांना शालेय वयातच व्यवसायाचे धडे मिळावे व्यवसायाचे महत्त्व समजावं यासाठी आयोजित केली होती. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी पक्षांचे आरोग्य व काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले जर कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि जिद्दीने केला तर शेतीपूरक व्यवसायाला या व्यवसायाची जोड मिळू शकते शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतो म्हणून भारतातील नागरिकांनी अंडी सेवन करायला पाहिजे म्हणून संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असे आव्हान विद्यार्थी व पालकांना केले यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आर्थिक नियोजन ,श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजून उद्योजक बनण्याचे स्वप्न पहावे खऱ्या अर्थाने आज आपल्या रांजणगाव मध्ये घोगळ परिवाराने कुक्कुटपालन व्यवसाय मधून एक वेगळा उद्योजकतेचा ठसा उमटवलेला  आपल्याला दिसून येतो असे सांगितले विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात कुक्कुटपालन व्यवसाय कसा केला जातो त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते कावेरी क्रॉस या जातीच्या कोंबड्यांची काळजी कशी घेतात खाद्य कोणते लागते त्यांची स्वच्छता कशी ठेवतात हे प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने पाहिले विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून एक नव्या व्यावसायिकतेचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी डॉक्टर संदीप आहेर आणि डॉक्टर संतोष वाघे यांना आपल्या मनातील विविध शंका विचारून या व्यवसायाचे महत्त्व समजावून घेतले.
 यावेळी पोल्ट्री फार्मचे प्रमुख कारभारी घोगळ पाटील , रवींद्र कारभारी घोगळ, किरण कारभारी घोगळ यांनी विद्यालयातील सर्व सेवकांचा यथोचित सन्मान करून स्वादिष्ट असे चहा नाश्त्याची व्यवस्था केली . विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी घोगळ परिवाराने क्षेत्रभेटीला येण्यासाठी आपल्याला परवानगी दिली आणि विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन दिले याबद्दल घोगळ परिवाराला धन्यवाद देऊन आभार मानले. दुपारच्या सत्रात वनभोजन झाल्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख भांगरे मॅडम यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असे दिसून आले
या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, रांजणगावच्या प्रथम नागरिक  सरपंच सुनीताताई कासार, श्री सोपानकाका कासार, श्री वसावे के के सर, भाऊसाहेब घोगळ, दत्तात्रय भालेराव उपस्थित होते . श्री किशोरकुमार चव्हाण सर व दीपक लोंढे मामा यांनी साऊंड सिस्टिमची व्यवस्था करुन दिली.
यावेळी गुरुकुल विभाग प्रमुख श्री कैलास भोये सर व श्री विश्वेश्वर लाव्हारकर सर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

राहाता तालुक्यातील शेतकरी एकवटणार – सौ.प्रभावती घोगरे

 राहाता तालुक्यातील शेतकरी एकवटणार – सौ.प्रभावती घोगरे


२४ जुलैला राहाता येथे शेतकरी मोर्चा – शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन


राहाता (प्रतिनिधी) –
राज्यातील शेतकरी वर्ग सध्या कर्जमाफी, सातबारा कोरा, पीकविमा, वीजबिल माफी अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त झाला आहे. शासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, याविरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने, गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होतील आणि शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार आवाज उठवण्यात येईल.
या मोर्चाचे नेतृत्व सौ. प्रभावती घोगरे करणार असून, त्यांनी शेतकरी, महिला, दिव्यांग, तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गानेच पार पडणार असल्याचे सौ. घोगरे यांनी स्पष्ट केले.

सोमवार, २१ जुलै, २०२५

भारतीय जनता पार्टी - जेष्ठ कार्यकर्ता सेल, शिर्डी शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर

भारतीय जनता पार्टी - जेष्ठ कार्यकर्ता सेल, शिर्डी शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर





शिर्डी 

भारतीय जनता पार्टी -जेष्ठ कार्यकर्ता सेल शिर्डी शहर मंडल कार्यकारणी आज  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.मा.श्री.राधाकृष्णजी विखे पा.साहेब  यांच्या सुचनेनुसार जाहिर करण्यात आली.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना.मा.श्री.राधाकृष्णजी विखे पा. साहेब, मा.खा.श्री.सुजयदादा विखे पा, भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री.नितिनजी दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी गोंदकर,जेष्ठ नेते मा.श्री ज्ञानेश्वर (आबा) गोंदकर,प्रथम नगराध्यक्ष मा.श्री.कैलास (बापु)कोते,माजी उपनराध्यक्ष मा.श्री.अभय (भैय्या) शेळके व भाजपा शहरअध्यक्ष मा.श्री.रविंद्र (तात्या) गोंदकर यांनी शुभेच्छा दिल्या. 

तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

यावेळी सह संयोजक पदी रामनाथ हरिभाऊ वर्षे व भाऊसाहेब रामजी राहिज यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य पदी संजय विठ्ठल महाजन, नंदकिशोर विजय राजगिरे, प्रभाकर जाधव, राधाकिसन फकीरा शेटे, कचरूनाना सोन्याबापू वारुळे, धनसिंग देवसिंग पाटील, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, सुभाष सिद्धप्पा याद्‌गुडे, तान्हाजी लक्ष्मण औचर, मुनेश सवाराम राठोड, ज्ञानेश्वर सदाशिव वाकचौरे, प्रविण (बंडू) अंबादास गोरक्ष, सुधीर नंदकिशोर चौधरी, दशरथ सखाराम बंदरकर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

शनिवार, १९ जुलै, २०२५

सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले

वैजापूर



सद्गुरू  गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या  अधिष्ठानामागे समाजाने उभ्या  केलेल्या  शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.



गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे.सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.संदिपान भुमरे,आ.रमेश बोरनारे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरीजी महाराज माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर भानूदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर प्रभाकर शिंदे दिपक पठारे अविनाश गलांडे यांच्यासह नासिक अहील्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,या सप्ताहाच्या परंपरेची वाटचाल द्विशताब्दीकडे सुरू आहे.जगाच्या पाठीवर अध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम केले.केवळ ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत भक्ती रसामध्ये एकरुप होणारी समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाकआहे. सप्ताहाची परंपरा ही सनातन हिंदु धर्म संस्कृती आणि परंपराना पाठबळ देते.महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या विरोधात ठाम भूमिका घेवून जेव्हा बोलतात तेव्हा समाजाने सुध्दा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहीजे.

आज हिंदू धर्माला जाणीवपुर्वक बदनाम करण्याचे काम होत आहे.आशा परीस्थितीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारे सप्ताहाचे सोहळे हिंदू धर्माच्या संघटित करणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



यंदाचा सप्ताह ऐतिहासिक होण्याकरीता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे.परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकाने एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणार्या सर्व रस्त्यांचै काम सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून,शनिदेवगाव उच्च पातळी बंधार्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधार्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जातानाच मंत्री विखे पाटील पुलाच्या कामाची पाहाणी करून कठड्याचे काम पूर्ण आदेश दिले. 

याप्रसंगी आ.रमेश बोरनारे यांनी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले असून मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने पुलावरील रस्ता आणि संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले.या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोट
महंत रामगिरीजी महाराज यांनी गंगागिरीजी महाराजांनी शनिदेवगाव येथे सप्ताह घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यावर्षी पूर्ण होत असल्याचे सांगून सप्ताहाला सहकार्य करणार्या देणगीदारांची नाव जाहीर केली.

शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव!डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव!
डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट



शिर्डी | 


शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य दिव्य आशा अध्यात्मिक कार्यक्रमात  मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करण्यार असल्याचे डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

  डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे होणार आहे.

 शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून,या कार्यक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की, शिवकथे सारखा अध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा. या भक्ती भावाला प्रतिसाद देत डॉ सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला ५ लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत.


शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही, तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

लायन्स क्लब राहता इन्स्टॉलेशन व इंडक्शन सेरेमनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

लायन्स क्लब राहता इन्स्टॉलेशन व इंडक्शन सेरेमनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमासाठी ६D पीएमजीएफ लायन गिरीशजी मालपाणी मल्टीप्ल काउन्सल चेअरमन व मालपाणी उद्योग समुहाचे अध्यक्ष, पीएमजेएफ लायन रविंद्र जी गोलार डिस्ट्रिक्ट एलसीआयएफ कोऑर्डिनेटर, एमजीएफ डॉ.संजय उबाळे झोन चेअरमन, लायन धनंजय धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
लायन्स क्लब राहता गेल्या ७ वर्षापासून नेहमी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक शेत्रात कार्य करत आहे. माघील वर्षी इंजी. प्रकाश सदाफळ अध्यक्ष लायन्स क्लब राहता यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू विद्यार्थ्यांना शाळेय वस्तूंचे वाटप करण्यात आले, वृधाश्रम व अनाथ आश्रम मध्ये  मदत केली, मधुमेह व कॅन्सर या आजारावर क्लब ने काम केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरीशजी मालपाणी यांनी क्लबने केलेल्या कार्य बद्दल गौरवउदगार काढले. लायन्स क्लब राहता छोटासा क्लब होता आज तो इंटरनेशनल लायन्स क्लब च्या नॉर्म नुसार २० सभासद करून नव्याने ८ नवीन सभासद झाले आहेत. तसेच क्लब चे डॉ. संजय उबाळे यांनी आपल्या क्लब पुरतेच मर्यादित काम न करता संपूर्ण नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमधे जाऊन कॅन्सर बाबत कॅम्प घेतले व त्याचा फायदा गरजूंना झाला, ह्याच कामाची पावती म्हणून त्यांना झोन चेअरमन पद डिस्ट्रिक्ट मधल्या पदाधिकारी यांनी त्यांना हे पद देऊन मोठी जबाबदारी दिली आहे असे गिरीशजी मालपाणी म्हणाले व नवीन प्रेजिडेंट, सेक्रेटरी, ट्रेशरर व सर्व क्लब च्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
इंडक्शन ऑफिसर रवींद्रजी गोलार यांनी क्लब च्या ८ नवीन सभासदांना शपत देऊन त्यांना आपल्या कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव करून दिली. तसेच क्लब मधे कसे काम करायचे याचे मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष संतोष घोडके यांना एमजीएफ करण्यासाठी प्रवृत केले व नूतन अध्यक्ष यांची कार्यक्रमध्येच इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बांगर यांनी लायन्स क्लब राहाता यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली व ह्यापुढे देखील आम्ही सर्व मिळून क्लब ला एका उंची वर नेऊ अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे कन्व्हेनर डॉ. संजय गायकवाड यांनी प्रस्ताविक केले व आलेल्या प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून क्लब च्या पूर्वेतीहास बाबत माहिती दिली. 
झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांनी आपल्या होम क्लब व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष संतोष घोडके यांनी क्लब ची पर्मानेंट एक्टिविटी म्हणून एक गरजू मुलीची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी लायन्स क्लब नी घेतली आहे असे म्हणाले.
लायन्स क्लब राहाता च्या नूतन अध्यक्ष संतोष घोडके, सेक्रेटरी रतनजी चौधरी, ट्रेशरर दिनेश कारले, उपाध्यक्ष डॉ. संजय गायकवाड, मुन्नाभाई शाहा, राजेंद्र बांगर, पीआरओ गोरखभाऊ दंडवते, व्यक्तेश अहिरे, डॉ शर्वरी कुलकर्णी, अंजली उबाळे, सरला तायडे, सिमरन घोडके, स्मिता मुरादे, सोहन उबाळे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. 
या कार्यक्रमाला लायन्स क्लब कोपरगाव येथील तुलसीदासजी खूबानी, एमजीएफ सुधीर डागा, सत्यन मुंदडा, अक्षय गिरमे, संदीप राशींनकर, शिर्डी क्लब चे डॉ. एकनाथजी गोंधकर, महेश वैद्य, लिओ दर्शन वैद्य व इतर लिओ क्लब मेंबर्स, संगमनेर क्लब चे डॉ. राजन ठाकूर, डॉ. अभय चोरडिया, संजय आसावा, अमोल खताटे, केदारनाथ रेड्डी, राहाता येथील , रविंद्र जोशी, भानुदास गाडेकर, डॉ. भारत सुंडाळे, डॉ. शुभांगी घोगरे, संजय वाघमारे, अनिल सातव, सीताराम बावके पाटील, नौशाद पठाण, लता जाधव, प्रसन्नराणी तालुरी, सुनील हासे, उमेश शेटे, संध्याताई कार्ले, श्वेता कार्ले, अजय तिडके खिजर शाह उपस्थित होते
आभार दिपक दंडवते यांनी मानले.

गुरुवार, १७ जुलै, २०२५

साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप



रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर  शाळेत दिनांक 17 जुलै गुरुवार रोजी अन्नदान श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे साईमहिमा ट्रस्ट शिर्डी व गुरुपुरम टीव्ही भक्ती महिमा चेन्नई यांचे सर्वेसर्वा  प्रसादगणेश चेन्नईकर व धनशेखरणसाई यांच्यावतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ,वह्या ,कंपास पेटी, पेन यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुंदर असे स्वादिष्ट मिष्टान्न भोजन देण्यात आले . शालेय शैक्षणिक साहित्य व मिष्टान्न भोजन मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. प्रथमता विद्यालयाच्या वतीने या उपक्रमातील प्रमुख सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाचे अनिलकाका गाढवे यांनी विशेष कौतुक करून प्रसादगणेश व धनशेखरणसाई यांचे विशेष आभार मानून समाजामध्ये पैसा भरपूर आहे परंतु दानशूरवृत्ती नाही ही खरी दानशूरवृत्ती आज या महान व्यक्तींकडे असल्याचे पाहायला मिळाले आहे असे गौरव उदगार काढले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी हा उपक्रम सलग दुसऱ्याही वर्षी विद्यालयांमध्ये राबवल्याबद्दल प्रसादगणेश व धनशेखरणसाई यांचे अभिनंदन करून आभार मानले.कार्यक्रमासाठी विद्यालयातील पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकाका गाढवे, रांजणगावचे सरपंच सुनीताताई कासार, श्री सोपानकाका कासार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील ,जयाभाऊ कालेशेठ, वाल्मीकभाऊ गाढवे, योगेश माघाडे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

बुधवार, १६ जुलै, २०२५

मतदार याद्यांतील गोंधळामुळे बोगस मतदानाला खतपाणी? – काँग्रेसचे सचिन उर्फ मुन्ना आहेर यांचे प्रशासनाकडे निवेदन

*मतदार याद्यांतील गोंधळामुळे बोगस मतदानाला खतपाणी? – काँग्रेसचे सचिन उर्फ मुन्ना आहेर यांचे प्रशासनाकडे निवेदन

 राहाता 
–शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुहेरी नोंदी, तसेच  गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन उर्फ मुन्ना राजेंद्र आहेर यांनी तहसीलदार राहाता यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असून, जिल्हाधिकारी यांना पोस्टाद्वारे अधिकृत तक्रार पाठवली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मागील निवडणुकांपासून अनेक मतदारांची नावे दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागांतील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये याचा गैरफायदा घेत बोगस मतदान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. याशिवाय,   हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

सचिन आहेर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित BLO आणि ERO अधिकाऱ्यांकडून तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. यासोबतच काही दुहेरी नोंदींच्या छायाप्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.

सचिन उर्फ मुन्ना आहेर हे लोणी खुर्द येथील सक्रिय सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असून, कै.राजेंद्र माधवराव आहेर पाटील यांचे सुपुत्र आहेत. स्व. आहेर पाटील हे विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच लोणी खुर्द येथील कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राहिले आहेत.

मतदार यादी पारदर्शक, अचूक आणि बोगस नोंदींपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी ठाम मागणी आहेर यांनी या निवेदनातून केली आहे.

राहता येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा तसेच भव्य कीर्तन महोत्सव


राहता येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव वर्ष 31 वे गुरुवार दिनांक 17 सात 2025 रोजी ते गुरुवार दिनांक 24 7 2025 रोजी पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या अधिपत्याखाली किर्तन सोहळा आयोजित केला आहे दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन रात्री  हरीकीर्तनानंतर दररोज महाप्रसाद दिला जाईल गुरुवार दिनांक 17 सात 20 25 ह भ प छगन महाराज खडके प्रति इंदुरीकर कळस शुक्रवार दिनांक 18 7 2025 ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ बेलापूर शनिवार दिनांक 19 सात 2025 ह भ प पुंडलिक महाराज सोनवणे धामोरी रविवार दिनांक वीस सात २०२५ ह भ प विवेक महाराज सोनवणे कोळपेवाडी सोमवार दिनांक 21 7 2025 ह भ प सचिन महाराज पुंड शिंगवे तुकाई मंगळवार दिनांक 22 सात २०२५ ह भ प विश्वास महाराज ढमाले दुशिंग वाडी बुधवार दिनांक 23 सात २०२५ ह भ प काशिगानंद गिरीजी महाराज शिर्डी या सर्व कीर्तनकार महाराज यांचे कीर्तन  होणार आहे भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक 23 सात 2025 रोजी दुपारी तीन  वाजता श्री क्षेत्र अरण येथून आणलेल्या पायी ज्योतचे स्वागत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची व ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक होईल गुरुवार दिनांक 24  ,7 2025 रोजी परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता काल्याचे किर्तन होईल कीर्तनानंतर महाप्रसादाने सांगता होईल 



तसेच ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह भ प पंढरीनाथ महाराज लुटे राहता गायनाचार्य ह भ प रामकृष्ण महाराज चौधरी शिंगवेकर ह भ प संदीप महाराज बागुल साकोरीकर मृदंगाचार्य हभप संतोष महाराज दीक्षित हरिपाठ नेतृत्व ह भ प संतोष म दीक्षित संस्थापक नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था पिंपळस राहता यांचे विद्यार्थी वृंद काकडा भजन भजन व किर्तन 7 विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बन गणेश भजनी मंडळ राहता मारुती बाबा भजनी मंडळ पैजणबाबा भजनी मंडळ संत सेना भजनी मंडळ राहता 




व राहता परिसरातील सर्व गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी व समस्त भजनी मंडळ तसेच जाहिरात सौजन्य सावता मेडिकल राहता गिरीश गाडेकर वेदांत मेडिकल राहता चेतन गाडेकर अल्टिमेट कॉम्प्युटर्स राहता अमोल टिळेकर साई दिगंबरा मोटर्स अस्तगाव शुभम टिळेकर या सोहळ्याच्या सप्ता काळातील अन्नदात्यांनी अन्नदान दिले आहे या कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत सावता महाराज मंदिर राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर तसेच राहता पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे समस्त माळी  पंच मंडळी राहता यांनी म्हटले आहे

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहे


राहाता 
  जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या माध्यमातून विविध योजना या अस्थिव्यंग व्यक्तीसाठी सुरू आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे या योजनेचा लाभ  घ्यावा असे आवाहन राहात्याचे  तहसीलदार अमोल मोरे यांनी केले.

     केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम  कानपूर , एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप  योजनांतर्गत  आयोजित राहाता येथे आयोजित शिबीरात मोरे बोलत होते. यावेळी
गटविकास अधिकारी विवेक गुंड , तालुका आरोग्य विभाग  डाॅ.संजय घोलप, अॅड.रघुनाथ बोठे, माजी  नगराध्यक्ष सोपान  सदाफळ कैलास सदाफळ,श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयांचे बाळासाहेब कासार, डाॅ.यशस चुंबळे,संजय सदाफळ,भाऊसाहेब जेजुरकर, साहेबराव निथाने, जबाजी मेचे, विजय सदाफळ, सागर सदाफळ, विजय शिंदे, अंबादास गाडेकर, चंद्रभान मेहत्रे, उत्तमराव डांगे, राजेंद्र वाबळे आदीसह लाभर्थी उपस्थित होते.


यावेळी बोलतांना मोरे म्हणाले की मंत्री विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांना नोंदणी तपासणी आणि लगेचच साहित्य मिळत असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आता दूर होत आहे या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
 
 अॅड. रघुनाथ बोठे म्हणाले  शिर्डी मतदार संघात आणि जिल्ह्यांमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हे लोकाभिमुख ठरत आहेत. विविध   योजनेचा प्रचार प्रसार करत असतानाच योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल आणि या योजनेतून त्या लाभार्थ्याला दिलासा कसा मिळेल यासाठी मंत्री विखे पाटील हे कायमच प्रयत्नशील राहिले आहेत.  आज जिरायत भागामध्ये पाणी पोहोचले आहेत निळवंडे गोदावरी कालव्यांचा प्रश्न ही आता मार्गी लागला आहे.  

 प्रारंभी कासार यांनी  योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी राहाता तालुक्यातील विविध गावातील  लाभार्थी उपस्थित होते

  जनसेवा फाउंडेशन सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मंत्र विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग संचलित
 मंगळवार दि.१५ जुलै रोजी साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड, राहाता येथे तर सोमवार दि.२१ जुलै  रोजी  श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, विमानतळ रोड, श्री कृष्ण नगर शिर्डी येथे करण्यात आल्याची माहीती डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली.
 कोट...
 अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरातून कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप झाल्याने या शिबिरामुळे  दिव्यांग व्यक्तींच्या चेह-यावर नवचैतन्य  आले.

रविवार, १३ जुलै, २०२५

श्री साईसच्चरित पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायनाची समाप्ती


उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के) यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, ११ जुलै, २०२५

झाडांचा ९ वा वाढदिवस उत्साहात साजरा.,

झाडांचा ९ वा वाढदिवस उत्साहात साजरा.,


साईयोग फाऊंडेशनची पर्यावरण प्रती अनोखी बांधिलकी...
सालाबादप्रमाणे राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे १ जुलै ते ७ जुलै वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.राहाता,एकरुखे,दहेगाव,खडकेवाके,शिर्डी व पिंपळस येथे वृक्षारोपण करण्यात आले.शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात राहाता बस स्थानकासमोरील वृक्षांचा ९ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.वृक्षांसमोर काढलेली रांगोळी,तसेच फुग्यांची सजावट व वाढदिवसाचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.महिला सदस्यांनी झाडांचे पूजन करून औक्षण केले.झाडाच्या आकाराचा केक कापून सर्वांनी एकसाथ शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नरेश राऊत फाऊंडेशचे सचिव लक्ष्मण गोर्डे,राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे,नायब तहसीलदार हेमंत पाटील,वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक डॉ पांडुरंग गुंजाळ,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे,साईश्रद्धा फाऊंडेशन शिर्डीचे सचिन घोडेकर,समाजप्रबोधकार भाऊ थोरात,खडकेवाके चे सरपंच सचिन मुरादे,दहेगावच्या सरपंच पूनम डांगे,ॲड रघुनाथ बोठे व बसस्थानक व्यवस्थापक किरण राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्वांचा फेटा बांधून साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच लक्ष्मण गोर्डे,बाळासाहेब सोनवणे,सचिन घोडेकर,भाऊ थोरात यांना वृक्षारोपण व संवर्धन कार्यास अनमोल सहकार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देण्यात आले.


सुरुवातीला साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.रवींद्र धस यांनी प्रस्तावना करत फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.प्रमुख अतिथी लक्ष्मण गोर्डे यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली.नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी राहाता शहरातील हिरवळ ही साईयोग फाउंडेशन द्वारे समर्पित भावनेने केलेल्या सेवेचे प्रतीक असल्याचे नमूद केले.मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी साईयोग फाउंडेशन पर्यावरण संरक्षणार्थ करत असलेल्या कार्याचा गौरव करत प्रशासकीय पातळीवर शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.सचिन घोडेकर,अरुण मोकळ,प्रविण खंडीझोड,ॲड रघुनाथ बोठे,पुनम डांगे,दशरथ तुपे यांनीही मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.गेली ९ वर्षे वृक्षसंवर्धन कार्यात निस्वार्धपणे महत्त्वाची भूमिका बजावणारे राहाता नगरपालिकेचे ड्रायवर प्रभाकर नावकर व KW 11चॅनेल चे संस्थापक किरण वाबळे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ.अंजली पानगव्हाणे,सुष्मिता चव्हाण,कृषी अधिकारी निर्मला पोटे,उज्वला गाडेकर,निलम चेनुके,दिव्या बाबर,लता सदाफळ,माधुरी माळवे,प्रकाश पुंड,ॲड दिगंबर धनवटे,ॲड गोरख दंडवते,संदीप डांगे,संजय बाबर,मोहन तांबे,दीपक गाडेकर,राजेंद्र बांगर,राजु वायकर,अनिल सातव,बबलू फटांगरे,रवींद्र धस,दिपक दंडवते,जितेंद्र अहिरे,अरविंद बावके,विष्णू गाडेकर,उमेश लुटे,संजय वाघमारे,प्रकाश बेंद्रे,शिवाजी पोटे,रंगनाथ सदाफळ,सुभाष दंडवते,नारायण गाडेकर,परमेश चव्हाण,मिलिंद बनकर,दिपक गायकवाड,नरेंद्र मुरादे,अर्जुन चव्हाण,नामदेव गवते,ज्ञानेश्वर आरणे,प्रभाकर डांगे,सुभाष डांगे,सदाशिव डांगे,ऋषी आहेर,रविंद्र बोठे,सलमान शेख,भागवत वाघमारे,अंबर पोटे,डॉ अजिंक्य पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.अल्पोहारा नंतर समारोप करण्यात आला.

जेव्हा अतिवाहक (एस्केपचे) काम पूर्ण होईल, त्यावेळी आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही: डॉ सुजय विखे



राहाता 

जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण  तेव्हापासून पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असा आम्ही शब्द नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

एकरुखे तालुका राहाता येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक १, नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यामधून एकरूखे गावासाठी नवीन अतिवाहक एस्केपच्या कामाचे भूमिपूजन युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ते उपस्थित ग्रामस्थांशी बोलत होते.

जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण होईल, तेव्हा गणेश परिसरामध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. तसेच उजव्या कालव्याच्या उपचाऱ्यांसाठी ३०२ कोटी रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काही दिवसात ते देखील काम पूर्ण होईल. चारी नंबर १ व चारी नंबर २० पर्यंतच्या उपचाऱ्यांचे काम देखील पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल असा मी यावेळी शब्द देतो. तसेच उजव्या कालव्याचे आवर्तन संपूर्ण झाल्यानंतर कुणीही शेतकरी यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही, हा शब्द मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देतो. 


या विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी सर्व प्रयत्न केले. त्यामध्ये गणेशचे संचालक असतील, नेते असतील यांच्यासह आमचा पराभव करण्यासाठी देशातील नेते आले. तरी देखील आपण सत्तर हजार मताधिक्य घेऊन विजयी झालो. असे देखील डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या विश्वासास आपण पात्र ठरू असेच काम आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे गोदावरी उजव्या कालव्याच्या ऑफिसला १० रुपये मंजूर होऊन पुढील सहा महिन्यात उद्घाटन होईल. तसेच राहाता नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच अंदाजे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ते देखील काम पूर्ण होईल. जेणेकरून प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी गेले पाहिजे. तसेच वीरभद्र रंगनाथ बाजारतळाचे खोदकाम करून काँक्रीटीकरण करून लोकांना बाजारासाठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल. चार वर्ष अशी विकास कामं करायची की शेवटच्या एका वर्षांमध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कशाशीच गरज नाही. ८० टक्के मतदान पडल्याशिवाय गावात घ्यायचे नाही ही भूमिका जनसामान्य माणसांनी मांडली पाहिजे, कारण की कामाच्या माध्यमातून मतांमध्ये रूपांतर होत असतं. असे देखील यावेळी सुजय विखेंनी स्पष्ट केले. 

निळवंडेचे पाणी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतं, हे आपण करून दाखवलं. कुणी स्वप्नात देखील विचार करू शकले नव्हते की हे पाणी आपल्याला मिळेल. परंतु, आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो आणि विखे पाटील परिवाराची ख्याती आहे.

गुरुवार, १० जुलै, २०२५

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकरूखे शाळेचे सुयश

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकरूखे शाळेचे सुयश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरूखे येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील एकूण 13 विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सन 2025 मध्ये पात्र ठरले असून त्यापैकी श्रेयस राहुल नालकर व ओम प्रमोद राहींज , श्रेया राहुल निर्मळ, काव्या अंकुश आग्रे ह्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या सुयशामुळे या चार विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 5000/- रुपये प्रमाणे एकूण 15000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री राधाकिसन दळवी सर , श्री जगन्नाथ डांगे सर, श्री सुधाकर अंत्रे, श्री मधुकर थोरात सर, श्री.सुनिल गायकवाड सर, श्रीमती संजीवनी गोर्डे, श्रीमती जानका गोर्डे,श्रीमती लीला चव्हाण, श्रीमती अलका गाडेकर, श्रीमती सुनंदा सातव, श्रीमती वैशाली गायकवाड ,सौ. पौर्णिमा यादव ,श्रीमती मयूरा कडू या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीतील उत्तुंग कामगिरीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदाचे मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री),मा.नामदार सौ. शालिनी ताई विखे पाटील मॅडम,मा.खासदार सुजय दादा विखे पाटील,राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय श्री विवेक गुंड साहेब, गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री राजेश पावसे साहेब, शिर्डी बीट शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री भाऊसाहेब घोरपडे साहेब, लोणी बीट शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री विष्णू कांबळे साहेब, केंद्रप्रमुख श्री सोमनाथ वैद्य साहेब,


 तसेच एकरूखे गावचे सरपंच श्री जितेंद्र गाढवे पा. उपसरपंच सौ. खुरसणे ताई,कॄषी उत्पन्न बाजार समिती राहाता विद्यमान संचालक श्री. जालिंदर गाढवे पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पगारे साहेब, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ एकरुखे यांनी हार्दिक अभिनंदन करून भविष्यातील उज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.

बुधवार, ९ जुलै, २०२५

डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदिच्छा भेट!

डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदिच्छा भेट!


मुंबई 

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांची आज मुंबई येथे खास सदिच्छा भेट डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली. पक्ष संघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करत, आगामी वाटचालीसाठी शुभेच्छांचा मनःपूर्वक निरोप त्यांनी दिला.

याचसोबत, डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (२०२५-२८) म्हणून निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या भेटीच्या निमित्ताने राज्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. पक्षाचे कार्य व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावी नेतृत्व पोहचवण्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा ठाम विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहचवताना संघटनेचा विस्तार आणि कार्यकर्त्यांची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी चव्हाण साहेब निश्चितच नवा अध्याय सुरू करतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या भेटीदरम्यान सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले आणि आगामी काळात परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

मंगळवार, ८ जुलै, २०२५

ह.भ.प. हर्षद महाराज भागवत लोणीकर यांचा गौरव - सरपंच जनार्दन घोगरे यांच्या हस्ते लोणी खुर्द ग्रामपंचायतीत सत्कार*

ह.भ.प. हर्षद महाराज भागवत लोणीकर यांचा गौरव - सरपंच जनार्दन घोगरे यांच्या हस्ते लोणी खुर्द ग्रामपंचायतीत सत्कार*


लोणी खुर्द 

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?” या सोनी मराठी वाहिनीवरील राज्यव्यापी कीर्तन स्पर्धेत ह.भ.प. हर्षद महाराज भागवत लोणीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून  उपविजेतेपद पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे.

या गौरवाच्या निमित्ताने लोणी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच मा.जनार्दन घोगरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन हर्षद महाराज यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.


सत्कारप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी अध्यक्ष, विविध मान्यवर, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
हर्षद महाराजांनी कीर्तन परंपरेचा सन्मान राखत आपल्या भक्तिमय सेवा कार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या यशामुळे गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या यशाबद्दल ह.भ.प. हर्षद महाराज यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कीर्तन सेवेच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राहता येथील दत्त व श्री साईबाबा मंदिर येथे गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम



राहता येथील श्री दत्तात्रय मंगल कार्यालय ट्रस्ट राहता येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक 10,  ७,२०२५, रोजी उत्सव आयोजित केला आहे तरी राहता पंचक्रोशीतील भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आयोजकांनी म्हटले आहे गुरुवार रोजी संध्याकाळी पाच ते सहा तीस वाजता साई खिचडी ग्रुपचा भजनाचा कार्यक्रम होईल संध्याकाळी सहा तीस वाजता साईबाबाच्या तैलचित्राचे अनावरण वेदशास्त्र संपन्न श्री आनंद शास्त्री लावर गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होईल संध्याकाळी सात वाजता साईबाबा ची आरती व प्रसादाचे वाटप होईल


ठिकाण श्री दत्त व श्री साईबाबा मंदिर जुनी गढी राहता

सोमवार, ७ जुलै, २०२५

राहता तालुका भाजप अनुसूचित जाती तालुकाध्यक्षपदी जॉन युवराज त्रिभुवन यांची निवड.

राहता तालुका भाजप अनुसूचित जाती तालुकाध्यक्षपदी जॉन युवराज त्रिभुवन यांची निवड.



भारतीय जनता पार्टी राहाता मंडल कार्यकारणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली व युवकांचे प्रेरणास्थान मा.श्री.डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली. 
 या कार्यकारणी वरून अस्तगांवकरावरील असलेले विखे पाटील परिवाराचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले...
यावेळी अस्तगावतील तब्बल ८ तरुणांना या कार्यकारणी मध्ये संधी देण्यात आली आहे.



त्रिभुवन जॉन युवराज- राहता तालुका अध्यक्ष अनु.जाती मोर्चा
२) किरण ज्ञानदेव चोळके- राहाता तालुका सरचिटणीस  अस्तगाव(चोळकेवाडी)
३) बाळासाहेब नारायण सापते-राहता तालुका चिटणीस(अस्तगाव)
४) पंकज शामराव गोर्डे- राहता तालुका चिटणीस(अस्तगाव)
५) आरिफ शफिक तांबोळी-अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा(अस्तगाव)
६) रंजय कुमार माधव सुलाखे- संयोजक माजी सैनिक सेल(अस्तगाव)
७) वाल्मीक नामदेव मोरे-कार्यकारणी सदस्य, अस्तगाव(मोरवाडी)
८) विलास सदाशिव गोल्हार- कार्यकारणी सदस्य अस्तगाव(तरकसवाडी)वरील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी जाहीर केल्या आहेत.



 वरील सर्व पदाधिकारी विखे पाटील परिवाराचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते अनेक वर्षापासून विखे पाटील परिवाराबरोबर सक्रिय राजकारणात सहभागी आहेत, सन्माननीय मा.श्री.डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी वरील सर्व युवकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना योग्य तो मानसन्मान दिला.
या निवडीने अस्तगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व या सर्व पदाधिकाऱ्यांचे अस्तगावकर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

राहता तालुक्यातील 15 चारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनी भक्तिमय वातावरणात बाल दिंडीचे आयोजन



राहाता येथील 15 चारी उपनगरातील वै.सजन यशवंत सदाफळ ,वै.भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ विठ्ठल रुक्मिणी ,संत तुकाराम महाराज मंदिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वडणे व व्यवस्थापन समितीचे वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बाल गोपाळ विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा परीधान करून हरीनामाचा गजर करत उपस्थित भाविक, परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधले. यावेळी विधितज्ञ रामनाथ सदाफळ ,कैलास सदाफळ यांचे कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी संस्कृती सदाफळ हिने आषाढी वारीचे महत्त्व उपस्थितांना समजावून प्रबोधन केले.



यावेळी बालगोपाळांसह शिक्षकांनी पावलीचा ठेका धरला.अतिशय भक्तिमय वातावरणात बाल दिंडीचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी विनोद तोरणे,अमोल तुप विहीरे,भालचंद्र तांदळे,नागरे मॅडम,भिंगार दिवे सर,गायकवाड सर,सचिन आरणे,विधितज्ञ जय चौधरी ,सिदधांंत मुजमुले,स्वामी सदाफळ, मनोज सदाफळ, उपस्थित  होते.

शनिवार, ५ जुलै, २०२५

श्री.ग.र.औताडे पा. विद्यालयात ग्रंथदिंडी , वृक्षदिंडी संपन्न

श्री.ग.र.औताडे पा. विद्यालयात ग्रंथदिंडी , वृक्षदिंडी संपन्न

पोहेगाव



- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे पा. विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी , वृक्षदिंडी तसेच वारकरी दिंडीचे आज शनिवार रोजी आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे एस.के. यांनी वारी हे सामाजिक समतेचे व एकतेचे प्रतिक असून वारी या सोहळ्यातून परमार्थ सोबतच अंतकरणशुद्धी होते असे प्रतिपादन केले व वारीचे अध्यात्मिक , सामाजिक , वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले.
दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी मृदुंग , पखवाज , टाळ वादन करून अभंग , भजन , गवळण यांचे गायन केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर दिंडीचे रिंगण संपन्न झाले. वृक्षारोपणचे, वाचनाचे  महत्त्व नागरिकांना समजावे या साठी उद्बोधक घोषवाक्ये , घोषणा देत संपूर्ण पोहेगाव परिसरात दिंडीने फेरी मारली. नागरिक , पालक , भक्तांनी ठीकठिकाणी दिंडीचे स्वागत केले.




कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय शिंदे, पर्यवेक्षक श्री. चांगदेव नेहे , श्री भोसले,  श्री. गोऱ्हे, श्री.पाटील ,श्री. राठोड, श्री. गांगुर्डे, श्री.दरेकर ,श्री. वाघमारे , श्री. भावसार, श्री सांगळे, श्री. भारमल, श्री. नाडेकर , श्री.महेंद्र काळंगे , श्री.वराडे, श्रीमती बागुल, श्रीमती वायाळ , श्रीमती बनसोडे, श्रीमती थोरात  इत्यादी सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...