झाडांचा ९ वा वाढदिवस उत्साहात साजरा.,
साईयोग फाऊंडेशनची पर्यावरण प्रती अनोखी बांधिलकी...
सालाबादप्रमाणे राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे १ जुलै ते ७ जुलै वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.राहाता,एकरुखे,दहेगाव,खडकेवाके,शिर्डी व पिंपळस येथे वृक्षारोपण करण्यात आले.शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात राहाता बस स्थानकासमोरील वृक्षांचा ९ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.वृक्षांसमोर काढलेली रांगोळी,तसेच फुग्यांची सजावट व वाढदिवसाचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.महिला सदस्यांनी झाडांचे पूजन करून औक्षण केले.झाडाच्या आकाराचा केक कापून सर्वांनी एकसाथ शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नरेश राऊत फाऊंडेशचे सचिव लक्ष्मण गोर्डे,राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे,नायब तहसीलदार हेमंत पाटील,वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक डॉ पांडुरंग गुंजाळ,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे,साईश्रद्धा फाऊंडेशन शिर्डीचे सचिन घोडेकर,समाजप्रबोधकार भाऊ थोरात,खडकेवाके चे सरपंच सचिन मुरादे,दहेगावच्या सरपंच पूनम डांगे,ॲड रघुनाथ बोठे व बसस्थानक व्यवस्थापक किरण राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्वांचा फेटा बांधून साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच लक्ष्मण गोर्डे,बाळासाहेब सोनवणे,सचिन घोडेकर,भाऊ थोरात यांना वृक्षारोपण व संवर्धन कार्यास अनमोल सहकार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देण्यात आले.
सुरुवातीला साईयोग फाउंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.रवींद्र धस यांनी प्रस्तावना करत फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.प्रमुख अतिथी लक्ष्मण गोर्डे यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली.नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी राहाता शहरातील हिरवळ ही साईयोग फाउंडेशन द्वारे समर्पित भावनेने केलेल्या सेवेचे प्रतीक असल्याचे नमूद केले.मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी साईयोग फाउंडेशन पर्यावरण संरक्षणार्थ करत असलेल्या कार्याचा गौरव करत प्रशासकीय पातळीवर शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.सचिन घोडेकर,अरुण मोकळ,प्रविण खंडीझोड,ॲड रघुनाथ बोठे,पुनम डांगे,दशरथ तुपे यांनीही मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.गेली ९ वर्षे वृक्षसंवर्धन कार्यात निस्वार्धपणे महत्त्वाची भूमिका बजावणारे राहाता नगरपालिकेचे ड्रायवर प्रभाकर नावकर व KW 11चॅनेल चे संस्थापक किरण वाबळे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी राहाता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ,माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ.अंजली पानगव्हाणे,सुष्मिता चव्हाण,कृषी अधिकारी निर्मला पोटे,उज्वला गाडेकर,निलम चेनुके,दिव्या बाबर,लता सदाफळ,माधुरी माळवे,प्रकाश पुंड,ॲड दिगंबर धनवटे,ॲड गोरख दंडवते,संदीप डांगे,संजय बाबर,मोहन तांबे,दीपक गाडेकर,राजेंद्र बांगर,राजु वायकर,अनिल सातव,बबलू फटांगरे,रवींद्र धस,दिपक दंडवते,जितेंद्र अहिरे,अरविंद बावके,विष्णू गाडेकर,उमेश लुटे,संजय वाघमारे,प्रकाश बेंद्रे,शिवाजी पोटे,रंगनाथ सदाफळ,सुभाष दंडवते,नारायण गाडेकर,परमेश चव्हाण,मिलिंद बनकर,दिपक गायकवाड,नरेंद्र मुरादे,अर्जुन चव्हाण,नामदेव गवते,ज्ञानेश्वर आरणे,प्रभाकर डांगे,सुभाष डांगे,सदाशिव डांगे,ऋषी आहेर,रविंद्र बोठे,सलमान शेख,भागवत वाघमारे,अंबर पोटे,डॉ अजिंक्य पानगव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.अल्पोहारा नंतर समारोप करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा