संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
मंगळवार, २२ जुलै, २०२५
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. डॉ. संदीप आहेर
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. डॉ. संदीप आहेर
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेने दिनांक 22 जुलै मंगळवार रोजी गुरुकुल अंतर्गत क्षेत्रभेट आयोजित केली होती सदर क्षेत्रभेट वाकडी शिवारातील गौरी गौतम पोल्ट्री फार्म या घोगळ परिवाराच्या पोल्ट्री फार्मवर कुक्कुटपालन व्यवसाय पाहण्यासाठी व मुलांना शालेय वयातच व्यवसायाचे धडे मिळावे व्यवसायाचे महत्त्व समजावं यासाठी आयोजित केली होती. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी पक्षांचे आरोग्य व काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले जर कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि जिद्दीने केला तर शेतीपूरक व्यवसायाला या व्यवसायाची जोड मिळू शकते शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतो म्हणून भारतातील नागरिकांनी अंडी सेवन करायला पाहिजे म्हणून संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असे आव्हान विद्यार्थी व पालकांना केले यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आर्थिक नियोजन ,श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजून उद्योजक बनण्याचे स्वप्न पहावे खऱ्या अर्थाने आज आपल्या रांजणगाव मध्ये घोगळ परिवाराने कुक्कुटपालन व्यवसाय मधून एक वेगळा उद्योजकतेचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो असे सांगितले विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात कुक्कुटपालन व्यवसाय कसा केला जातो त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते कावेरी क्रॉस या जातीच्या कोंबड्यांची काळजी कशी घेतात खाद्य कोणते लागते त्यांची स्वच्छता कशी ठेवतात हे प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने पाहिले विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून एक नव्या व्यावसायिकतेचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी डॉक्टर संदीप आहेर आणि डॉक्टर संतोष वाघे यांना आपल्या मनातील विविध शंका विचारून या व्यवसायाचे महत्त्व समजावून घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा