बुधवार, १६ जुलै, २०२५

मतदार याद्यांतील गोंधळामुळे बोगस मतदानाला खतपाणी? – काँग्रेसचे सचिन उर्फ मुन्ना आहेर यांचे प्रशासनाकडे निवेदन

*मतदार याद्यांतील गोंधळामुळे बोगस मतदानाला खतपाणी? – काँग्रेसचे सचिन उर्फ मुन्ना आहेर यांचे प्रशासनाकडे निवेदन

 राहाता 
–शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुहेरी नोंदी, तसेच  गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन उर्फ मुन्ना राजेंद्र आहेर यांनी तहसीलदार राहाता यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असून, जिल्हाधिकारी यांना पोस्टाद्वारे अधिकृत तक्रार पाठवली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मागील निवडणुकांपासून अनेक मतदारांची नावे दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागांतील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये याचा गैरफायदा घेत बोगस मतदान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. याशिवाय,   हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

सचिन आहेर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित BLO आणि ERO अधिकाऱ्यांकडून तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. यासोबतच काही दुहेरी नोंदींच्या छायाप्रतीही निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.

सचिन उर्फ मुन्ना आहेर हे लोणी खुर्द येथील सक्रिय सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असून, कै.राजेंद्र माधवराव आहेर पाटील यांचे सुपुत्र आहेत. स्व. आहेर पाटील हे विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच लोणी खुर्द येथील कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राहिले आहेत.

मतदार यादी पारदर्शक, अचूक आणि बोगस नोंदींपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी ठाम मागणी आहेर यांनी या निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...