मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

यशवी दायमा सीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

यशवी दायमा सीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

राहाता 
येथील यशवी राजेंद्र दायमा या विद्यार्थिनीने सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दायमा यांची कन्या यशवी हिने नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन चमकदार कामगिरी केली. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट जॉन्स स्कूल, १२ वीचे शिक्षण संजीवनी जुनियर कॉलेज कोपरगाव, बीकॉमचे शिक्षण साई निर्माण कॉलेज शिर्डी येथे पूर्ण केले. सीएचे शिक्षण दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टअकाउंट भारत या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संपन्न केले आहे. यशवी दायमा हिला नाशिक येथील सीए अशोक बोरा यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल बोलताना यशवी म्हणाली जिद्द चिकाटी व मेहनत तसेच अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते. माझ्या यशामागे माझे आई-वडील व शिक्षकांचे मोठे योगदान आहे.

गणेशनगर शाळेतील युवा वैज्ञानिक सचिन वाघ यांना फेलोशीप

गणेशनगर शाळेतील युवा वैज्ञानिक सचिन वाघ यांना फेलोशीप


रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय, गणेशनगर शाळेतील सन 2004 साली एस एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सचिन वाघ यांना यंदा महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले संशोधनात मोलाची कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्रा सोबत नाते असलेल्या देश विदेशातील प्रतिभावान वैज्ञानिकांची या सन्मानासाठी निवड केली जाते. यामध्ये सचिन भाऊसाहेब वाघ यांचे 25 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. या कार्याचा गौरव म्हणून तज्ञांची समिती वैज्ञानिकांचे योगदान लक्षात घेता अमेरिकेमध्ये पुढील शिक्षणासाठी फेलोशिप देत असते यामध्ये युवा वैज्ञानिक सचिन  परिगाबाई भाऊसाहेब वाघ यांना अमेरिकेमध्ये कॅन्सरवरील औषधाचे संशोधन करण्यासाठी ही फिलोशीप देण्यात आली.सध्या ते अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील संशोधन केंद्रात रिसर्च म्हणून कार्यरत आहेत.
वैज्ञानिक सचिन वाघ यांनी अतिशय गरिबीतून आपले रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत मोलमजुरी करून जिद्दीने शिक्षण पूर्ण केले.ग्रामीण भागातील मुलेही प्रतिभासंपन्न असतात हे दाखवून दिले.आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचे या हेतूने आपले अभ्यासरूपी कष्ट चालू ठेवले आणि एवढ्या मोठ्या देशात अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेशनगर व एकरुखे या गावचे नाव उंचावले.सातासमुद्रा पलीकडे रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा उमटवला.या यशाच्या पाठीमागे वडील भाऊसाहेब वाघ व परीगाबाई वाघ  व भावांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन कामी आले.



या यशाबद्दल श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेतील स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य  रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील, अण्णासाहेब कोते पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील, मुख्याध्यापक श्री वसावे के के सर,  एकरुखे गावचे सरपंच जितेंद्र पाटील गाढवे, रांजणगावचे सरपंच सुनीताताई सोपानकाका कासार,  उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गाढवे,वाल्मीक गाढवे, जयाभाऊ कालेशेठ,विजयभाऊ सदाफळ, राजेंद्र जाधव, गणेश गाढवे, महेश आहेर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

दिव्यांगाच्या मदतीसाठी राहाता सह्याद्री क्लबचे मोठे योगदान

दिव्यांगाच्या मदतीसाठी राहाता सह्याद्री क्लबचे मोठे योगदान 
 
        

लायन्स क्लब ही समाजसेवा करणारी जागतिक पातळीवरील सामाजिक संस्था असून दररोज जगभर विविध ठिकाणी  सामाजिक उपक्रम चालू असतात. लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे या परिसरात सामाजिक योगदान खूप मोठे आहे आणि आम्ही याचे साक्षीदार आहोत.  आज या क्लबचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड व स्मार्ट कॉम्प्युटरचे  संचालक ला.  सत्यम सदाफळ यांचे वतीने  लायन्स क्लब राहाता सह्याद्रीने  " एकता " या  बौद्धिक अक्षम असलेल्या दिव्यांग शाळेसाठी  त्यांची गरज ओळखून कॉम्प्युटर संच भेट देवून  एक सत्कार्य केले आहे. कै. वसंतराव जाधव या निवृत्त शिक्षकाने  आपल्या सेवानिवृत्तीचा सर्व पैसा या शाळेसाठी लावला. व  बौद्धिक अक्षम मुलांसाठी या जाधव कुटुंबाने  एक शैक्षणिक मंदिर उभे केले व दिव्यांगांच्या पालकांना काही काळ सुखाचा श्वास  मोकळा करून दिला. असे उदगार  दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्री. दिलीप खरात यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. 
                        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ला. डॉ.  दत्ता कानडे व ला. डॉ. स्वाधीन गाडेकर हे या वेळी उपस्थित होते.  या सर्व मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केले. प्रास्ताविकात प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड म्हणाले की बौद्धिक अक्षम मुलांसाठी कै. वसंतराव जाधव, संचालक श्री. बाळासाहेब जाधव,   अमिता जाधव, व कामिनी जाधव  यांचे कार्य खरोखरच महान आहे. सौ. अमिता जाधव यांचा गेल्या 13 वर्षाचा दिव्यांग मुलांना शिकविण्याचा अनुभव  या बौद्धिक अक्षम मुलांसाठी खूप महत्वाचा आहे. या मुलांना शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना आर्थिक सक्षम बनविण्याचे महत्वाचे कार्य ही एकता  शाळा करते. 
             प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ ला.डॉ.  दत्ता कानडे म्हणाले की लायन्स क्लब राहाता सह्याद्री  नेहमी योग्य ठिकाणीच मदत करते. आज कॉम्प्युटर संच देवून दिव्यांगांना आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे दालन खुले करण्यात आले आहे. या संचामुळे या विद्यालयातील हे 25 बौद्धिक अक्षम मुले संगणकाचे ज्ञान मिळवू शकतील.  व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. ला. स्वाधीन गाडेकर म्हणाले की अल्पावधीतच  आमच्या लायन्स क्लब राहाताचे सेवाकार्य हे 3234 डी 2  या डिस्ट्रिक्टमध्ये  चांगला क्लब म्हणून  गणला जातो. हा क्लब नेहमी वर्षानुवर्षे चालत आलेले तेच तेच सेवाकार्याला फाटा देवून नवीन उपक्रम राबवितात. 
          क्लबचे संस्थापक ला. विनोद गाडेकर म्हणाले की आजच या दिव्यांग शाळेत कॉम्प्युटर संच देण्याबरोबरच  प्रवरा कम्यूनिटी रेडिओच्या माध्यमातून  क्लबच्या प्रसिध्दी प्रमुख तथा रेडिओच्या इन्चार्ज ला. गायत्री म्हस्के यांनी दिव्यांगासाठी एक तासाचा लाईव्ह शो करून दिव्यांगांच्या व्यथा व जनतेचे कसे सहकार्य हवे तसेच या एकता दिव्यांग शाळेची माहिती, लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे  कार्य याविषयी सर्वांना माहिती दिली. एकाच कार्यक्रमात दोन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम या क्लबने घडवून आणले. 
                ला. सत्यम सदाफळ म्हणाले की क्लबने मला ही सेवा करण्याची संधी देवून मला आणखी सेवाकार्य करण्याची उमेद  दिली. या विद्यालयाचे संचालक म्हणाले की माझा मुलगा दिव्यांग असल्याने मला यांच्या दुःखाची  कल्पना होती म्हणून  माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की माझ्या नातवाबरोबर इतर ही मुलांसाठी दिव्यांग शाळा काढू. म्हणून सेवानिवृत्तीनंतर आलेला सर्व पैसा या शाळेत घातला. लायन्स क्लब राहाता सह्याद्री यांनी दुसऱ्यांदा आम्हाला मदत देवून उपकृत केले. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.
                     व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सेक्रेटरी  ला. सागर रोकडे, ला. मिनिनाथ तेलोरे, ला. रावसाहेब  निकाळे, ला. बापूसाहेब गायकवाड, ला. सुनील काळोखे, शिवम सापिके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

स्वतंत्र सैनिकाच्या पत्नीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण....साईयोग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

स्वतंत्र सैनिकाच्या पत्नीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण....
साईयोग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम...


साईयोग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी कै.सत्यभामा यमाजी कदम यांच्या स्मरणार्थ दहेगाव पाटावर १० फुटी वट वृक्षांचे रोपण करण्यात आले.कै.सत्यभामा कदम ह्या गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेले देवळाली प्रवरा येथील स्वातंत्र्य सैनिक कै.यमाजी म्हसू कदम यांच्या पत्नी होत्या.त्या आपल्या माहेरी दहेगाव येथे स्थायिक होत्या.वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग संवर्धनार्थ वृक्षारोपण अभियान अंतर्गत साईयोग फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून मान्यवरांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करत आहे.




याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,संदिप डांगे,प्रभाकर दत्तात्रय डांगे,ॲड गोरख दंडवते,सदाशिव डांगे,ज्ञानदेव आरणे,भागवत विठोबा डांगे,संदीप वसंतराव डांगे,विजय भागवत डांगे,संजय भागवत डांगे,श्रीकांत आण्णासाहेब कदम,नानासाहेब बाबुराव कदम,सिद्धांत संदिप डांगे,कुमारी सिद्धी संदिप डांगे,विलास वाळेकर, बबलू फटांगरे,दिपक दंडवते,विठ्ठल निर्मळ,उमेश लुटे,प्रणव लावर,सौ.सिंधुताई भानुदास जायभाय,श्रीमती शोभा रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

Atrocity गुन्ह्यातील आरोपी यांचा जामीन मंजूर

Atrocity गुन्ह्यातील आरोपी यांचा जामीन मंजूर


राहाता-


     दिनांक २७/११/२०२४ पिडीतेने भारतीय न्याय सहिता कलम 64 (1) 3/5 ( जुना I p c 376, 34 ) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सन 2015 सुधारित कलम 3 (1) (w) (I) (II)  3(2) (v) प्रमाणे शिर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजी नं 646/2024  प्रमाणे गुन्ह्या रजिस्टर करण्यात आला होता . आरोपी २ व आरोपी क्र ३ यांचा वतीने राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये  अटक पूर्व जामीन दाखल करण्यात आला होता सदर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामी ॲड विलास जी आसने ,ॲड शरद पी तांबे , ॲड दीपाली पदोकर यांनी  कामकाज पाहिले आरोपी विरुद्ध गुन्हा हा खोटा असून पैशाचा वादावरून खोटा गुन्हा दाखल केला व प्रथमदर्षणी attrocity कायद्याचा तरतुदी प्रकरणास लागू होत नसल्याने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती ॲड विलास जी आसने ॲड शरद पी तांबे ॲड दीपाली पदोलकर यांनी माननीय न्यायालयास केली सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने  युक्तिवाद व  आरोपीच्या वतीने ॲड विलास जी आसने, ॲड शरद पी तांबे यांचा युक्तिवाद ऐकून ॲड विलास जी आसने ॲड शरद पी तांबे यांचा युक्तिवाद  ग्राह्य धरून माननीय  न्यायालयाने अटी शर्ती सह आरोपी क्र २ आरोपी क्र ३ यांचा अटकपूर्व जामीन मा राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब  यांनी दिनांक २१/१२ /२०२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर जामीन अर्जाकडे शिर्डी येथील सर्व ग्रामस्थांचे  व परिसरातील नागरिकांचे  लक्ष लागले होते

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत धनगरवाडी शाळेची चमकदार कामगिरी

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत धनगरवाडी शाळेची चमकदार कामगिरी



धनगरवाडी

 राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी शाळेने या वर्षीही राहाता तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
    शाळेतील साई संतोष जगताप या विद्यार्थ्याने हस्ताक्षर स्पर्धेत किशोर गटात प्रथम क्रमांक मिळविला.कु.सायली सुनिल आदमाने या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत किशोर गटात प्रथम क्रमांक मिळविला.या दोन्हीही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    तसेच कु.प्रियंका भाऊसाहेब रक्टे हिने वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत शाळेच्या मोठ्या गटाचा तालुक्यात तिसरा क्रमांक आला.केंद्रस्तरावर झालेल्या स्पर्धेत धनगरवाडी शाळेने सर्वाधिक क्रमांक मिळविले होते.
     


शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पालक,ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.सदर स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू कांबळे,केंद्रप्रमुख  कानिफनाथ कोळेकर, मुख्याध्यापक शरद होडगर यांचे मार्गदर्शन लाभले.
    शाळेतील शिक्षक विजय जगताप,किशोर जगताप,अनिल धिरडे,गीता गलांडे,विवेक मोरे,युवा प्रशिक्षणार्थी आकाश राशिनकर यांनी स्पर्धेची  तयारी करून घेतली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र भोंडे,उपाध्यक्ष गणेश राशिनकर व सर्व सदस्य, पालक ,ग्रामस्थ, सरपंच उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,धनगरवाडी, तंटामुक्ती समिती,धनगरवाडी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले,तसेच पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

राहाता शहरात डॉ डांगे दातांचा दवाखाना चे उद्घाटन संपन्न

राहाता शहरात डॉ डांगे दातांचा दवाखाना चे उद्घाटन संपन्न


राहता शहरात डॉक्टर डांगे दातांचा दवाखाना ( Dr.pratik's Advanced Dental Care ) चे 
   उद्घाटन  महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज ( संस्थापक श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था शिर्डी) यांच्या शुभ  हस्ते करण्यात आले . या दवाखान्यामध्ये दात काढणे, दातांना कॅप करणे, दातामध्ये चांदी सिमेंट भरणे अक्कल दाढीची शस्त्रक्रिया ,यंत्राद्वारे दात सफेद करणे,वेडेवाकडे दात सरळ करणे , डिजिटल एक्सरे,smile डिझाईन करणे , रूट कॅनाल करणे इत्यादी सुविधा उपलब्ध आहे हे सर्व उपचार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केले जाते  असे डॉक्टर प्रतीक मधुकर डांगे यांनी म्हंटले आहे यावेळी डॉ बापूसाहेब  पानगव्हाणे ,डॉ.संतोष मैड, डॉ.दत्ता कानडे,डॉ. वाणी, व डॉ. घोगरे ,संतोष अण्णा गोरडे, मोहनराव सदाफळ,बाबासाहेब डांगे,संदीप दंडवते,सतीश बावके, विकी दंडवते,डांगे परिवार व सर्व नातेवाईक ,राहाता साकुरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदरील दवाखान्याचे ठिकाण आनंद मेडिकलच्या वर चितळी रोड राहाता येथे आहे

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :-

राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :-
   
              
 यावर्षी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप व राहाता तालुका  परीट/धोबी समाजाच्या वतीने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रायगडावर जावून साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्रसंत  गाडगे महाराज यांना अभिप्रेत असणारी  स्वच्छता  मोहीम रायगड किल्ल्यावर जातांना पायऱ्यांच्या आसपासचा व  किल्ला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो  मशीनच्या साहाय्याने क्रश करण्यात आला. 
        गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले की स्वच्छता सेवा हीच परमेश्वराला  भावणारी सेवा आहे आणि हीच सेवा  गाडगेबाबा यांनी आयुष्यभर केली. प्रत्येक गावात कीर्तनाला जाण्याअगोदर ते संपूर्ण गावाची स्वच्छता करत व रात्री कीर्तन करत. कुठल्याही यात्रेत ते मंदिरात न जाता  तेथील नदी, घाट, मंदिर परिसर स्वच्छ करत.  आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांना जनतेनी दान दिलेली जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांना समाज कार्यासाठी देवू केली. पण डॉ. आंबेडकरांनी या जमिनीची गरज कर्मवीर भाऊराव पाटील यांना  रयत शिक्षण संस्थेसाठी गरजेची असल्याने त्यांना देण्याची कल्पना मांडली. व  गाडगे बाबा यांनी ती जमीन कर्मवीर अण्णा यांना दान केली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना  कीर्तन चालू असताना समजली. पण त्याहीपेक्षा  पण जास्त वाईट त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी समजल्यावर झाली. आणि त्यांनी अन्नत्याग सुरू केला. आणि त्यातच त्यांनी देह ठेवला. 
         ला. विनोद गाडेकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच खरे स्वच्छतेचे पुजारी होते. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या कार्याचा  खऱ्या अर्थाने गौरव केला.  या स्वच्छता अभियानात व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. ॲड. सुधीर बोठे,  ला. ज्ञानेश्वर नळे , ला. बापूसाहेब गायकवाड, ला. सुनील काळोखे, ला. नितीन दिवटे, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपचे श्री. रवी शिवरकर, श्री. विजय गाडेकर, श्री.  नवनाथ बनकर, श्री. विजय बनकर, श्री. धीरज जहांगीर, श्री. गणेश जगदाळे, श्री. दिनेश जगदाळे, श्री. विजय पठाडे, श्री. गोवर्धन गाडेकर, श्री. बबनराव आजबे, श्री. गंगाराम भुजबळ यांनी सहभाग घेतला. 
            

      ला. सागर रोकडे यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत व आभार मानले.

राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :- यावर्षी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप व राहाता तालुका परीट/धोबी समाजाच्या वतीने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रायगडावर जावून साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिप्रेत असणारी स्वच्छता मोहीम रायगड किल्ल्यावर जातांना पायऱ्यांच्या आसपासचा व किल्ला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो मशीनच्या साहाय्याने क्रश करण्यात आला. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले की स्वच्छता सेवा हीच परमेश्वराला भावणारी सेवा आहे आणि हीच सेवा गाडगेबाबा यांनी आयुष्यभर केली. प्रत्येक गावात कीर्तनाला जाण्याअगोदर ते संपूर्ण गावाची स्वच्छता करत व रात्री कीर्तन करत. कुठल्याही यात्रेत ते मंदिरात न जाता तेथील नदी, घाट, मंदिर परिसर स्वच्छ करत. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांना जनतेनी दान दिलेली जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज कार्यासाठी देवू केली. पण डॉ. आंबेडकरांनी या जमिनीची गरज कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेसाठी गरजेची असल्याने त्यांना देण्याची कल्पना मांडली. व गाडगे बाबा यांनी ती जमीन कर्मवीर अण्णा यांना दान केली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना कीर्तन चालू असताना समजली. पण त्याहीपेक्षा पण जास्त वाईट त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी समजल्यावर झाली. आणि त्यांनी अन्नत्याग सुरू केला. आणि त्यातच त्यांनी देह ठेवला. ला. विनोद गाडेकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच खरे स्वच्छतेचे पुजारी होते. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला. या स्वच्छता अभियानात व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. ॲड. सुधीर बोठे, ला. ज्ञानेश्वर नळे , ला. बापूसाहेब गायकवाड, ला. सुनील काळोखे, ला. नितीन दिवटे, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपचे श्री. रवी शिवरकर, श्री. विजय गाडेकर, श्री. नवनाथ बनकर, श्री. विजय बनकर, श्री. धीरज जहांगीर, श्री. गणेश जगदाळे, श्री. दिनेश जगदाळे, श्री. विजय पठाडे, श्री. गोवर्धन गाडेकर, श्री. बबनराव आजबे, श्री. गंगाराम भुजबळ यांनी सहभाग घेतला. ला. सागर रोकडे यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत व आभार मानले.

राहाता सह्याद्रीचे रायगडावर गाडगेबाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी :-
     
         
    यावर्षी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप व राहाता तालुका  परीट/धोबी समाजाच्या वतीने गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रायगडावर जावून साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्रसंत  गाडगे महाराज यांना अभिप्रेत असणारी  स्वच्छता  मोहीम रायगड किल्ल्यावर जातांना पायऱ्यांच्या आसपासचा व  किल्ला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो  मशीनच्या साहाय्याने क्रश करण्यात आला. 
        गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले की स्वच्छता सेवा हीच परमेश्वराला  भावणारी सेवा आहे आणि हीच सेवा  गाडगेबाबा यांनी आयुष्यभर केली. प्रत्येक गावात कीर्तनाला जाण्याअगोदर ते संपूर्ण गावाची स्वच्छता करत व रात्री कीर्तन करत. कुठल्याही यात्रेत ते मंदिरात न जाता  तेथील नदी, घाट, मंदिर परिसर स्वच्छ करत.  आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांना जनतेनी दान दिलेली जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांना समाज कार्यासाठी देवू केली. पण डॉ. आंबेडकरांनी या जमिनीची गरज कर्मवीर भाऊराव पाटील यांना  रयत शिक्षण संस्थेसाठी गरजेची असल्याने त्यांना देण्याची कल्पना मांडली. व  गाडगे बाबा यांनी ती जमीन कर्मवीर अण्णा यांना दान केली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना  कीर्तन चालू असताना समजली. पण त्याहीपेक्षा  पण जास्त वाईट त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी समजल्यावर झाली. आणि त्यांनी अन्नत्याग सुरू केला. आणि त्यातच त्यांनी देह ठेवला. 
     
    ला. विनोद गाडेकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच खरे स्वच्छतेचे पुजारी होते. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या कार्याचा  खऱ्या अर्थाने गौरव केला.  या स्वच्छता अभियानात व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. ॲड. सुधीर बोठे,  ला. ज्ञानेश्वर नळे , ला. बापूसाहेब गायकवाड, ला. सुनील काळोखे, ला. नितीन दिवटे, सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपचे श्री. रवी शिवरकर, श्री. विजय गाडेकर, श्री.  नवनाथ बनकर, श्री. विजय बनकर, श्री. धीरज जहांगीर, श्री. गणेश जगदाळे, श्री. दिनेश जगदाळे, श्री. विजय पठाडे, श्री. गोवर्धन गाडेकर, श्री. बबनराव आजबे, श्री. गंगाराम भुजबळ यांनी सहभाग घेतला. 
                  ला. सागर रोकडे यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत व आभार मानले.

चि. श्रेयश जॉन त्रिभुवन यांचा वाढदिवस

चि. श्रेयश जॉन त्रिभुवन यांचा वाढदिवस 


जि.प.प्रा.शाळा,अस्तगांव येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप करण्यात आले,त्याच बरोबर इयत्ता दुसरीच्या दोन वर्गासाठी चप्पल व शूज ठेवण्यासाठी चप्पल स्टॅन्ड बनवून देण्यात आले, तसेच यावेळी श्रेयस व त्यांच्या पालकाचा सत्कार करून व केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अस्तगावचे मुख्याध्यापक श्री. सहाने सर,1नंबर सोसायटी चेअरमन श्री.विजयराव गोर्डे पाटील,ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस श्री.नंदूभाऊ जेजुरकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव सापते,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष हेमंतराजे गोर्डे,जेष्ठ नेते बशीर भाई शेख,काँग्रेस नेते शरदराव चोळके, आरपीआय नेते अनिल त्रिभुवन,समद भाई शेख, आरपीआय शहराध्यक्ष महेश त्रिभुवन,भीमा त्रिभुवन,मिथुन संसारे,सौरभ त्रिभुवन,राकेश त्रिभुवन, अशोक गोडगे,कमलेश त्रिभुवन,राष्ट्रीय श्रीराम संघाचे उपाध्यक्ष महेश त्रिभुवन, वादे पाटील,श्री.कर्डिले सर,श्री.गमे सर,श्री.सगभोर सर,श्रीमती.कहाणे मॅडम,श्रीमती.गीते मॅडम,श्रीमती. जाधव मॅडम,श्रीमती.पंडित मॅडम,श्रीमती.भुतकर मॅडम,श्रीमती. दातीर मॅडम,श्रीमती.निळे मॅडम,मोरे मॅडम,श्री.जॉन त्रिभुवन सर आदीसह मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्रा.शाळेचे विद्यार्थी व मित्रपरिवार उपस्थित होते.
 यावेळी १नंबर सोसायटीचे चेअरमन श्री.विजयराव गोर्डे पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगावचे, मुख्याध्यापक श्री.सहाने सर,ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नंदूभाऊ जेजुरकर,भाजपा दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष हेमंतराजे गोर्डे,श्री कर्डिले सर आदींची भाषणे झाली, श्रेयशच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या उपक्रमाबद्दल   शाळेतील मुख्याध्यापक व श्रेयसचे व त्याच्या पालकांचे कौतुक करण्यात आले.
*श्री.गमे सर यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर श्री.जॉन त्रिभुवन सर यांनी सर्वांचे आभार मानले.*

स्वच्छता अभियान राबवून गाडगे महाराजांना अभिवादन....

स्वच्छता अभियान राबवून गाडगे महाराजांना अभिवादन....


साईयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे स्वच्छतेचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिप्रेत असलेले स्वच्छता अभियान राबवून राहाता नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी व राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसर स्वच्छ झाडून घेण्यात आला.
साई योग फाउंडेशन द्वारे महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी वृक्षारोपण अथवा स्वच्छ्ता अभियान राबवून साजऱ्या केल्या जातात.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करत सूत्रसंचालन केले.ॲड दत्तात्रय धनवटे म्हणाले गाडगे महाराजांनी ग्राम स्वच्छते बरोबरच मनातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य केले आहे.त्यांचेअनुकरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.रामभाऊ लोंढे यांनी मनोगत व्यक्त करतांना गाडगे महाराजांचे स्वच्छतेचे महान कार्य साईयोग फाउंडेशन पुढे नेत असल्याचे नमूद करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.प्राथमिक शिक्षक प्रविण खांडिझोड यांनी गाडगेमहाराजांचा जीवनपट व कार्य उलगडून सांगताना अक्षरशः शरीरावर रोमांच उठत होते.ते पुढे म्हणाले गाडगे महाराज अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किर्तनाद्वारे करत.डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या समवेत चे प्रसंग ऐकताना सर्वजण भारावून गेलेत.तसेच साईयोग फाउंडेशनने सुरू केलेले गाडगे महाराजांचे स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यापुढेही अधिक जोमाने चालू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेवटी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी भाऊसाहेब बनकर,विलास वाळेकर,दिपक दंडवते,मोहन तांबे,अनिल सातव,ॲड गोरखनाथ दंडवते,संजय बाबर,संजय वाघमारे,बबलू फटांगरे,रविंद्र धस,बाळासाहेब तारगे,व्यंकटेश अहिरे,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,सिताराम बावके,सुभाष दंडवते,शिवाजी पोटे,प्रभाकर नावकर,संजय गोयर,योगेश वैराळ,रवी निकाळे,सचिन अंबडकर,प्रसाद लांडगे,मंगल निकाळे,सुनीता निकाळे,ज्योती खंदारे,मीना माळी आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगे महाराजांच्या भजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

अहिल्यानगर -मनमाड या महामार्गावर कंटेनर व बसची धडक! कंटेनर भरधाव वेगाने रस्ता सोडून घुसला बंगल्यात! त्यामुळे झाडे पडली? ट्रॅक्टरचे नुकसान! सुदैवाने जीवित हानी नाही!अर्धवट रस्त्याच्या कामामुळे घडला अपघात! वाहनधारक व नागरिकांमधून संताप!!

     अहिल्यानगर -मनमाड या महामार्गावर कंटेनर व बसची धडक! कंटेनर भरधाव वेगाने रस्ता सोडून घुसला बंगल्यात! त्यामुळे झाडे पडली? ट्रॅक्टरचे नुकसान! सुदैवाने जीवित हानी नाही!अर्धवट रस्त्याच्या कामामुळे घडला अपघात! वाहनधारक व नागरिकांमधून संताप!!






लोहगाव (वार्ताहार )


     अहिल्यानगर मनमाड या महामार्गावर लोहगाव शिवारामध्ये हॉटेल अजित जवळ एका वस्तीवर थेट भरधाव वेगाने कंटेनर हा रस्ता सोडून नारळाचे झाडे तोडून, ट्रॅक्टर धडकून ,थेट भिंत पाडून घरात घुसला . मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र हा अपघात दिवसा झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा जबरी अपघात झाल्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. खराब रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

अहिल्यानगर ते कोपरगाव या रोडवरील अपघाताची मालिका थांबेना. या रोडवर आतापर्यंत बरेचसे अपघात झाली की, अनेकांचे पाय गेले, हात गेले कित्येक जायबंदी झाले तर काही मृत्यूमुखी पडले याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्या नगर कडून कडून शिर्डी कडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक MH18B.G9300 व मनमाड कडून अहिल्यानगर कडे जाणारा कंटेनर क्रमांक GJ06B.T8334

लोहगाव शिवारात हॉटेल अजित जवळ बबन हौशीराम चेचरे यांच्या बंगल्यात रात्री १.४० मिनिटे घुसला. लक्झरी बस व कंटेनर समोरासमोर धडक झाल्याने कंटेनरचा वेग इतका जोरात होता की त्यांने बंगल्या समोरील तारकंपाऊंड, नारळाचे एक झाड. मूळासकट उन-मळून पडले तर दुसरे झाड भुई सपाट झाले‌. घराशेजारी लावलेला ट्रॅक्टर देखील या कंटेनर ने दाबला. त्यामुळे ट्रॅक्टरची पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जर नारळाचे झाड तार कंपाऊंड मुळा सगट उपटून पडले असेल तर त्या गाडीचा वेग किती असू शकतो याचा अंदाज  सर्वसामान्य पडलेला आहे व समोर असणारा त्यांच्या ट्रॅक्टर दाबून कंटेनर डायरेक्ट भीतीला आदळला व  भिंत तुटून त्या खाली पडल्या .ज्या घरात विटा पडल्या होत्या त्या घरात चेचरे  कुटुंब काही सदस्य झोपलेले होते. एक इट त्यांच्या घरातील व्यक्तींना घासून गेल्यामुळे बोटाला मोठ्या प्रमाणात इजा झाली. व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या घरातील कोणालाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली नाही. हा अपघात जर पाठीमागे पाचशे फुटावर जर झाला असता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. प्रथम दर्शनी तिथे लोकांनी पाहिले असता लक्झरी बस वाल्याचीच या ठिकाणी चूक आढळून येते कारण की तो त्याची साईट सोडून रॉंग साईडने घुसल्यामुळे समोरून येणारा कंटेनर व त्यांच्यात अपघात होऊन कंटेनर डायरेक्ट चेचरे यांचे कंपाउंड तोडून घरात घुसला व त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडमोड झाली. स्लॅबला क्रॅक पडले आहे .मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यामुळे घरातील सदस्य उठले त्यांनी बघितले तर कंटेनर डायरेक्ट आपल्या घरात घुसला त्यांनी लगेचच परिसरातील नागरिकांना फोन करून या गोष्टीची कल्पना दिली व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील लोक जमा झाले तेवढ्या रात्रीस त्यांनी कंटेनरचा ड्रायव्हर आत गुंतलेला होता. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले हाच अपघात जर दिवसा झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. या अपघाताची खबर स्थानिक पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी रात्री सदर घटनेची पाहणी केली. हा अपघात झाल्यानंतर परिसरातील रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व नगर मनमाड रोड हा सातत्याने वाहत असल्यामुळे जाणाऱ्या प्रवाशी देखील थांबून हा अपघात


(अपघात राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात  नागरिकांची गर्दी जमा झाली होती)



 बघत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.अहिल्यानगर ते कोपरगाव रोडचे काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे .काही ठिकाणी एकतर्फी होणारे वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होती.

या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होईल. याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही‌. कारण की या ठिकाणी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले व अर्धवट काम सोडून निघून गेले त्यामुळे हा रस्ता भविष्यात लवकर पूर्ण होईल की नाही हे सांगणं आता कठीण झाले आहे.

मात्र या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक जण अपंग होत आहेत. अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा महामार्ग बनवण्यात यावा .अशी मागणी आता परत एकदा वाहनधारक, ग्रामस्थ यांच्याकडून जोर धरू लागली आहे. या अपघातात संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.






लोहगाव सोसायटीच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड.

लोहगाव सोसायटीच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड.
लोहगाव (वार्ताहर) 
राहाता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
कै. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिलेला बिनविरोध निवडीचा पायंडा आज तयाक चालू आहे. संस्थेची पाच वर्षासाठी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. व्हा चेअरमन पद हे आडीच वर्ष ठरल्याप्रमाणे 


     विजय हरिभाऊ चेचरे. राजीनामा दिल्यानंतर 
राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची निवड करण्याची ठरले होते. त्या पद्धतीने आज ही निवडणूक बिनविरोध होऊन राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र केरूनाथ चेचरे हे होते तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस कोठुळे व संस्थेचे सचिव आर .व्ही. चेचरे .यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे सदस्य गणेश भाऊसाहेब चेचरे .विजय हरिभाऊ चेचरे. किशोर हौशिराम दरंदले. बाबासाहेब हौशीराम चेचरे. किरण अण्णासाहेब चेचरे. कोंडीराम परसराम नेहे‌ .किरण रघुनाथ इनामके तज्ञ संचालक बाळासाहेब कारभारी चेचरे व लक्ष्मण नाना चेचरे‌. महिला सदस्य पुष्पलता बाबासाहेब चेचरे .अनिता किशोर तुरकणे. हे या निवडी प्रसंगी उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पाटील .माजी आमदार आण्णासाहेब म्हस्के पाटील‌. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील. मार्गदर्शक 
केरूनाथ चेचरे.ॲड बाबासाहेब चेचरे.माजी संचालक 
भाऊसाहेब चेचरे.लहानु चेचरे तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम चेचरे.उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे.सरपंच शशिकांत पठारे.उपसरपंच दौलत चेचरे.
माजी कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे.बबन चेचरे .भास्करराव चेचरे.धुळाजी चेचरे.ज्ञानदेव दरंदले.
 बाळासाहेब चेचरे.कृष्णा चेचरे.

रोहिदास चेचरे.वसंत नेहे.शरद चेचरे.विनायक दरंदले.बाळासाहेब दरंदले 
दत्तात्रेय चेचरे. सुरेश चेचरे.अनिल चेचरे.
  सागर चेचरे. गणपत चेचरे विजय दरंदले .किरण दरंदले .आशिष गिरमे. लक्ष्मण चेचरे .विजय चेचरे. अशोक चेचरे. दिलीप इनामके .किशोर तुरकणे. अनिल चेचरे.ह.भ.प.संदीप महाराज चेचरे.
 बळीराम चेचरे. बबन दरंदले .कृष्णा चेचरे .अक्षय चेचरे.अरूण चेचरे.चेतन वांगे.राहुल चेचरे

 बाळासाहेब चेचरे . अरुण चेचरे. संजय चेचरे. राहुल चेचरे .गोरक्ष गोपाळे .प्रभाकर चेचरे . अक्षय चेचरे . विजय चेचरे. भाऊसाहेब चेचरे .आण्णासाहेब चेचरे. धीरज चेचरे . बाळासाहेब वांगे .सोपान चेचरे. सोपान वांगे .नारायण चेचरे. अशोक चेचरे. विनायक दरंदले . शिवाजी दरंदले .ज्ञानदेव दंरंदले.  आण्णासाहेब   चेचरे. यशवंत चेचरे.पांडु चेचरे.
भाऊसाहेब वांगे.सतिश दरंदले.शरद दरंदले.पंकज भालेराव.गोकुळ ढवळे.जिवन गिरमे.संजय इनामके.
रंजित इनामके.रावसाहेब चेचरे.प्रभाकर चेचरे.संपत चेचरे.काळु महाराज चेचरे.
आदींनी त्यांचे अभिनंदन केली.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

गणेशनगर शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न*

गणेशनगर शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न*


रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर  शाखेत दिनांक 18  व 19डिसेंबर रोजी या दोन दिवसांमध्ये विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा घेऊन क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक वसावे के के सर यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले .यामध्ये पाचवी ते सातवी छोटा गट आठवी ते दहावी मोठा गट असे दोन गट करण्यात आले. दोन गटांमध्ये कबड्डी, खो-खो खेळ घेण्यात आले .तसेच  लहान गटासाठी स्लो सायकल, संगीत खुर्ची ,चमचा लिंबू या स्पर्धा घेण्यात आल्या .मुलांनी या खेळांमध्ये हिरीरीने भाग घेऊन आनंद उपभोगला .
कबड्डी स्पर्धेत लहान गटात इयत्ता सातवी ने प्रथम क्रमांक पटकावला ,मोठ्या गटामध्ये कबड्डी स्पर्धेत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला ,खो-खो स्पर्धेत मोठ्या गटांमध्ये नववीतील मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. स्लो सायकल स्पर्धेत  लहान गटात गौरव वायदंडे यांने प्रथम क्रमांक पटकावला मोठ्या गटात आदित्य जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला हंपायर म्हणून वसावे व्ही आर सर ,झडे ए एम सर यांनी काम पाहिले. स्कोरर म्हणून पिलगर मॅडम,श्रीमती गांगुर्डे मॅडम, उंडे मॅडम यांनी काम पाहिले.



या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक तनपुरे सर, कैलास भोये सर, लव्हारकर सर , कलगुंडे सर, रवी घोरपडे सर ,पिलगर मॅडम, वराडे मॅडम, गांगुर्डे मॅडम, कोळगे मॅडम, उंडे मॅडम ,शहारे मॅडम ग्रंथपाल चव्हाण सर यांनी परिश्रम घेतले
सर्व सहभागी विद्यार्थी व यशस्वी विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पाटील गाढवे, अण्णासाहेब कोते पाटील,दादासाहेब गाढवे ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे, गुरुकुल पालक संघाचे उपाध्यक्ष वाल्मीकभाऊ गाढवे, जयाभाऊ कालेशेठ, विजयभाऊ सदाफळ यांनी अभिनंदन केले.

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

दिपिकाबाई पिपाडा यांचे मरणोत्तर नेत्रदान साईयोग फाऊंडेशनची वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली......

दिपिकाबाई पिपाडा यांचे मरणोत्तर नेत्रदान 
साईयोग फाऊंडेशनची वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली......

राहाता येथील साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या मातोश्री दिपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचे शनिवारी सकाळी ११.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मरणोत्तर त्यांचे प्रवरा हॉस्पिटलच्या नेत्रपेठीला नेत्रदान करण्यात आले.तसेच अंत्यसंस्कार नंतर आज रविवारी सकाळी रक्षा नदीत विसर्जित न करता राहाता खटकळी परिसरात साईयोग फाउंडेशनद्वारे खड्यांमध्ये टाकून त्यात वृक्षारोपण केले.त्यांच्या स्मरणार्थ साईयोग फाउंडेशनने १० ते १२ फुटांचे वड,पिंपळ,रेनट्री इत्यादी दहा वृक्षांचे त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते रोपण करून एक अनोख्या पद्धतीने वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली अर्पण केली.साईयोग फाउंडेशन गेली पाच वर्षांपासून सदस्यांच्या नातेवाईकांचे पर्यावरण रक्षणार्थ अस्थी विसर्जन शक्य तेव्हा अश्या तऱ्हेने वृक्षारोपण करून करत आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य दशरथ तुपे यांनी मनोज पिपाडा यांच्या वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्याचा उहापोह करत साईयोग फाऊंडेशनला मोलाचे सहकार्य असल्याचे नमूद केले.राहाता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा यांनी उपक्रमाचे कौतुक केले.साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनीही वृक्षारोण करून कै.दिपिकाबाई यांच्या स्मृती जतन केल्याबद्दल पिपाडा कुटुंबीयांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.तसेच समाजाने यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.शेवटी मनोज पिपाडा यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी राहाता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा,जवाहरलाल पिपाडा,पंकज पिपाडा,मनोज पिपाडा,सुशील पिपाडा,दिलीप पिपाडा,गौरव पिपाडा,भूषण छाजेड,रवींद्र बोठे,गोरख दंडवते,भाऊसाहेब बनकर,मोहन तांबे,पांडुरंग गायकवाड,संदीप डांगे,ज्ञानेश्वर आरणे,उमेश लुटे,बबलू फटांगरे,रवींद्र धस,नारायण गाडेकर,संजय गोयर,योगेश वैराळ,प्रसाद लांडगे,प्रसाद बनकर,रवी निकाळे,प्रमोद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.





सिनेअभिनेत्री कतरीना कैफ ने घेतले साईचे दर्शन

सिनेअभिनेत्री कतरीना कैफ  ने घेतले साईचे दर्शन 

शिर्डी प्रतिनिधी 

   हिंदी चित्रपट सृष्टीतील  प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनी जगाला श्रध्दा आणी सबुरीचा संदेश देणा-या श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डी येथे येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी राष्ट्वादीचे कार्यकर्ते अमित शेळके उपस्थित होते 
अभिनेत्री कतरीना कैफ हिला साई भक्त भाविकांनी गर्दीत ओळखल्या नतर तिने देखील हात उंचावत अभिवादन केले . दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी  तीचा शाल श्रीफळ व मुर्ती देऊन सत्‍कार केला. यावेळी बोलताना कतरीना कैफ म्हणाली की साईच्या  दर्शनामुळे मनाला मोठी शांती मिळत असते असे सांगितले यावेळी मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

मराठी अभिनेते महेश कोठारे यांनी घेतले साई बाबांचे दर्शन

महेश कोठारे साईच्या दर्शनासाठी साईनगरीत आगमन
शिर्डी प्रतिनिधी 

     गेले अनेक वर्ष  मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या वेगवेगळ्या भुमिका मुळे कायम आठवणीत असलेले मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज शिर्डी येथे येऊन साईबाबा मंदिरात  माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे मनोभावे  दर्शन घेतले
 दर्शनानंतर बोलताना महेश कोठारे यांनी सांगितले की वेळ मिळेल तेव्हा दर्शनासाठी येत असतो  साईच्या दर्शना मश्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

पितृ कृतज्ञमातृता सोहळा करणारे एकमेव इंदुरीकर महाराज :- डॉ. विखे पाटील

 पितृ कृतज्ञमातृता सोहळा करणारे एकमेव इंदुरीकर महाराज :- डॉ. विखे पाटील 


शिर्डी 

आई वडिलांची सेवा करा असे कीर्तनातून फक्त प्रबोधन न करता मातृ पितृ कृतज्ञता  सोहळा आयोजित करणारे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार आहेत असे गौरवोदगार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
       इंदुरी येथे समाज प्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख व शालिनीताई देशमुख यांच्या वतीने आयोजित मातृ पितृ अखंड हरिनाम सप्ताह मध्ये डॉ विखे पाटील बोलत होते. यावेळी संगमनेर चे आमदार अमोल खताळ पाटील, पांडुरंग महाराज गिरी गगनगिरी प्रतिष्ठाण चे दिलीप शिंदे, विखे पाटील फाउंडेशन चे विकास वाकचौरे, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, निळवंडे च्या सरपंच सौ. शशिकला पवार, निलेश गायकर, नरेंद्र नवले, प्रकाश पाचपुते आदी उपस्थित होते.
     डॉ विखे पाटील म्हणाले की, वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून ती विखे पाटील परिवाराकडून जपली जाते, यासाठी इंदुरीकर महाराज यांचे मोठे योगदान आहे. कीर्तनातून दुसऱ्याला फक्त न शिकवता तसे वागण्याचे काम महाराज करित आहे. यातून प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
      आमदार अमोल खताळ यांनी धर्म रक्षणासाठी चे कार्य वारकरी संप्रदाय करित आहे पण मी धार्मिक व्यासपीठावर प्रथमच बोलत आहे. इंदुरीकर महाराज यांचे कार्य देशभर आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी कृष्णा महाराज देशमुख,  किरण महाराज शेटे, नारायण महाराज थोरात, ज्ञानेश्वरी देशमुख, माऊली आरोटे,  यांनी प्रयत्न केले.
     यावेळी डॉ सुजय दादा विखे पाटील यांचा वारकरी फेटा बांधून बुका राधे राधे ची शाल देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. विखे पाटील व आमदार खताळ यांनी इंदुरीकर महाराज व शालिनीताई देशमुख यांचा सपत्नीक हार व शाल घालून सन्मान केला.

क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन

क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन


रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेने गुरुकुल उपक्रमांतर्गत दरवर्षाप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन दिनांक 11 डिसेंबर बुधवार रोजी वाकडी देवस्थान वाकडी या ठिकाणी  केले होते.वाकडी येथील जगताप नर्सरीमध्ये गेल्यानंतर मुलांना नर्सरी चालक शेळके पाटील यांनी प्रसरीतील विविध रोपांची व कलम करण्याची पद्धत समजावून सांगितली नर्सरी मधील आयुर्वेदिक वनस्पती फळझाडे फुलझाडे यांची सविस्तर माहिती सांगितली पुढे मुले खंडोबा देवस्थान वाकडी या ठिकाणी पोचल्यानंतर प्रथमता खंडोबा महाराजांचे दर्शन करून सर्व मुलांनी व एनसीसी विभागाने विद्यालयाचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग या अंतर्गत चंपाषष्ठी यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरामध्ये झालेला सर्व कचरा झाडून स्वच्छ केला. नंतर मुलांनी गोल पतंग धरून आगळ्यावेगळ्या वनभोजनाचा आस्वाद घेतला. दुपार सत्रामध्ये मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले क्षेत्रभेटीच्या वेळी प्रवासादरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले यावेळी श्री गणेश विद्यालय गणेशनगर च्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अण्णासाहेब कोते यांनी व संजय दादा शेळके पाटील यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी व बिस्किटांचा अल्पोपहार देण्यात आला.या उपक्रमाचे गणेशनगर केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख श्री वैद्य साहेब व अण्णासाहेब कोते पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून कौतुक केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर  व पर्यवेक्षक तनपुरे सर  यांचे अण्णासाहेब कोते पाटील , निलेश लहारे व सोपानराव घोडके काका यांनी शाॅल श्रीफळ देऊन सत्कार केला.अण्णासाहेब कोते यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयांमध्ये चालत असलेल्या विद्यालयाचा सामाजिक उपक्रमात सहभाग या उपक्रमाचे कौतुक केले विद्यालयाला पुढील वर्षी निश्चितच याहीपेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही सर्व वाकडीचे ग्रामस्थ मदत करू असे आश्वासन दिले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुकुल विभाग प्रमुख कैलास भोये सर, पर्यवेक्षक तनपुरे सर ,कलगुंडे डी ए सर सर्व वर्गशिक्षक यांनी परिश्रम घेतले नंतर आनंदामध्ये सर्व विद्यार्थी चार वाजता शाळेत पोहोचले या उपक्रमाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक वसावे के के सर ,स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गाढवे पाटील, अण्णासाहेब कोते पाटील ,दादासाहेब गाढवे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे , रांजणगाव खु चे सरपंच सुनीताताई सोपानराव कासार, उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ गाढवे, वाल्मीक भाऊ गाढवे, चंद्रकांत घोगळ, जयाभाऊ काले,विजय सदाफळ आणि वाकडीच्या ग्रामस्थांनी कौतुक केले . शेवटी मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

शिवप्रताप दिनानिमीत्त शिर्डीत रक्तदान शिबीर

शिवप्रताप दिनानिमीत्त शिर्डीत रक्तदान शिबीर

शिर्डी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारत भरती, शिर्डी, जनकल्याण रक्तपेढी व साईबाबा संस्थान रक्तपेढीच्यावतीने छत्रपती शिवप्रताप दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तब्बल १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सोमवार ९ डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गजानन शेर्वेकर, भारत भरतीचे शहराध्यक्ष नरेश पारख, रेखा वैद्य- रणमाळे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला. 
यावेळी दिपेश वैद्य, विनायक रत्नपारखी, सुनील सोनवणे, विशाल कोळपकर, सुभाष यादगुडे, महेश कवडे आदींची उपस्थिती होती. सायंकाळपर्यंत या शिबिरात एकशे आठ तरुणांनी रक्तदान केले.

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार -एडवोकेट पंकज लोंढे

 

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार   -एडवोकेट पंकज लोंढे

 

राहाता (वार्ताहर) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त कॉंग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच नाही तर राज्यातील मतदार, जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदम उलट निकाल कसे लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे,असे प्रतिपादन राहता  तालुका काँग्रेस अध्यक्ष एड. पंकज लोंढे यांनी केले
पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर (मतदान पत्रिकेवर) घेण्यात याव्या यासाठी तालुका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी कृषिभूषण सौ. प्रभावती घोगरे, राहता काँग्रेस शहराध्यक्ष नितीन सदाफळ, संजय जेजुरकर, उत्तमराव मते, सदाशिव गाडेकर, गणेश सोमवंशी,भगवान टिळेकर, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, बाबासाहेब डांगे, संपत हिंगे अमोल आरणे, सिमोन जगताप, संजय पगारे, संजय डांगे, रमेश गागरे, राजेंद्र आग्रे, संदीप कोकाटे,राजेंद्र निर्मळ,अमोल घोगरे, जाकीर शेख, मुन्ना फिटर, प्रशांत घोगरे,अनिस शेख, समद शेख, प्रफुल्ल धिवर, उत्तमराव अरंगळे, भाऊसाहेब नळे, विजय जगताप, विष्णू डांगे,भानुदास कातोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी एड. पंकज लोंढे  म्हणाले , या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतांच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले. त्याच रात्री ११.३० वा ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५% झाल्याचे सांगितले यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची हि वाढ असून मतांचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ईव्हिएम मतदान प्रक्रिये संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका  बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.

चौकट
सर्वसामान्य मतदार, जनता, राजकीय पक्ष, नेते, राजकीय विश्लेषक यांचा ईव्हिएम वर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे येथून पुढे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात असा समाजातून आवाज उठत आहे. सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास टिकून राहावा यासाठी येथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 
  एडवोकेट पंकज लोंढे (तालुकाध्यक्ष, राहाता तालुका कॉंग्रेस)

श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ - डॉ.राजेंद्र पिपाडा

श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ -डॉ.राजेंद्र पिपाडा 

  


श्री.साईबाबा संस्थानचे रुग्णालय खेळतय रुग्णांच्या जिवाशी खेळ...संस्थानच्या रुग्णालयात प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची होणारी हेळसांड थांबवुन रुग्णांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा तसेच रुग्णांना दर्जेदार व वेळवर उपचार मिळावेत तसेच तेथील वेगवेगळ्या विभागातील अडचणी दूर व्हाव्यात या आशयांचे निवेदन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. यावेळी आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे,ट्विंकल पिपाडा व इतर उपस्थित होते. 
        यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत. साई संस्थानचे रूग्णालय हे नगर जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातील रूग्णाला वरदान ठरले आहे. मात्र तेथील अनागोंदी कारभारामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रूग्णांच्या जिवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार उदभवत आहे.याबाबत आम्ही स्वत अनुभव घेतला असुन राहाता येथील पंकज बागरेचा यांचा अपघात झाला बेशुद्ध अवस्थेत त्यांना संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना तात्काळ एमआरआय व सिटीस्कॅनची गरज होती. परंतु पेशंटला स्कॅन रुममध्ये नेण्यासाठी संस्थानचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. शेवटी माझा मुलगा निखील पिपाडा व योगेश मुनावत यांनी स्ट्रेचर लोटत पेशंट स्कॅन रुममध्ये नेले. अतिशय दुर्दैवी घटना त्यादिवशी पहावयास मिळाली. हि परिस्थीती तातडीने बदलणे गरजेचे आहे.
            अपघातात जबर जखमी झालेल्या रूग्णाला कॅज्युलीटी, सीटी स्कॅन, एमआरआय या विभागात नेण्यासाठी प्रशिक्षीत कर्मचारी दोन तीन पाळ्यात चोवीस तास तैनात असावेत. सध्या याबाबतची परिस्थीती अतिशय गंभीर आहे. ब-याचदा रूग्णाला हलविण्यासाठी कर्मचारी जागेवरच नसतात. रूग्णालयातील सर्वच कर्मचा-यांना तातडीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. रूग्णालयाच्या रिसेप्शन काऊंटरचे कर्मचारी देखील प्रशिक्षीत नाहीत. त्याचे कुणी ऐकत नाही. त्यांना पुरेशी माहिती देखील नसते असा रूग्णांचा अनुभव आहे. रूग्णालयासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमून त्यांना अधिकार देणे गरजेचे आहे. आणिबाणीच्या वेळी हे अधिकारी रूग्णाच्या नातेवाईकास मदत व मार्गदर्शन करू शकतील.अपघातग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करण्याची आणि पोलीसांत तक्रार नोंदवीण्याची गरज असते. त्यासाठी कॅज्युलीटी विभागात एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावा. तेथे पोलीस कर्मचारी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना पोलीसात तक्रार देण्यासाठी पळापळ करावी लागते. त्यांना पोलीस ठाण्यात योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. रूग्णालयातील सोनोग्राफी विभाग ब-याचदा बंद असतो. सीटीस्कॅन आणि एमआरआय करण्यासाठी तिन तीन महिन्यांची वेटींग लिस्ट असते. कर्मचा-यांवर त्याचा मोठा ताण पडतो. हे लक्षात घेऊन आणखी एक सिटीस्कॅन व एमआरआय मशिन तेथे बसवीणे गरजेचे आहे.आणीबाणीच्या प्रसंगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसतो. हे लक्षात घेऊन अतिदक्षता विभागाचा विस्तार केला जावा.
साई संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांकडून आपआपसात धक्का बुक्की व शिविगाळ होते अशा स्वरुपाच्या बातम्या वर्तमान पत्रात वाचल्या. ही अतिशय खेदजणक बाब आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या संस्थानच्या हॉस्पिटलची बदनामी होत आहेत. याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर डॉक्टरांअभावी बंद आहे. एमआरआय,सीटीस्कॅन करिता तीन-तीन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका अशा तातडीच्या रुग्णांकडे कॅज्युल्टीत लक्ष दिले जात नाही. तसेच बेड उपलब्ध नसल्याचे कारणे सांगून पेशंट बाहेर पाठवले जातात. शिर्डी संस्थानचे सुपर हॉस्पीटल नव्हे तर रेफर हॉस्पीटल झाले आहे असे वाटु लागले आहे.
                          -डॉ.राजेंद्र पिपाडा

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाखेमध्ये पालक - शिक्षक - विद्यार्थी सहविचार सभा संपन्न

पालक - शिक्षक - विद्यार्थी सहविचार सभा संपन्न


  रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाखेमध्ये दिनांक दहा डिसेंबर वार मंगळवार रोजी पालक शिक्षक विद्यार्थी सहविचार सभा संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पांडुरंग गाढवे यांनी विद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी पालक भेटीवर भर दिला पाहिजे व पालकांना विद्यालयातील उपक्रमांमध्ये  सहभागी करून घेतले पाहिजे असे सुचवले.  विद्यालयांमध्ये विद्यार्थी संस्कारक्षम बनण्यासाठी पालक शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले , यावेळी प्रभारी पर्यवेक्षक श्री तनपुरे बी एफ यांनी विद्यालयातील  ओपन हाऊस उपक्रमाची व प्रथम सत्र परीक्षेतील निकालाचे वाचन करून दाखवले.विद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती पालकांना सांगितली.  याप्रसंगी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल काका गाढवे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विद्यालयांमध्ये विद्यालयाच्या शिस्तीचे काटेकोर पालन करावे वगुरुजनांचा आदर केला पाहिजे तसेच मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या भविष्याचा विचार करून नियमित अभ्यास करावा असे सांगितले. समाजामध्ये वावरताना रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी अष्टपैलू दिसला पाहिजे तो संस्कारक्षम असला पाहिजे यासाठी ही जबाबदारी जशी शिक्षकांची आहे तशी पालक आणि आपली आहे असे सांगितले. रांजणगावच्या  सरपंच सुनीताताई कासार यांनी पालकांनी आपल्या मुलामुलींना मित्रत्वाप्रमाने समजून मुलांच्या अभ्यास व वर्तनाची चौकशी करायला विद्यालयात येऊन चौकशी करायला पाहिजे असे आवाहन केले.यावेळी पालकामधून  महेश आहेर, सुरेश तागड, वाल्मीक गाढवे, लक्ष्मण भवर, श्री सातव, श्री देसाई यांनी आपले मनोगतात पुढील सूचना केल्या पालकांनी गैरहजर विद्यार्थी असेल तर त्याचे नाव वर्गाच्या ग्रुप वर पाठवणे तसेच जो विद्यार्थी खोडकर असेल अभ्यास करत नसेल शिस्तीचे पालन करत नसेल अशा विद्यार्थ्यांची माहिती पालकांना फोन करून सांगणे व वर्गाच्या ग्रुपवरही टाकणे अशा सूचना केल्या. मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी पालकांनी केलेल्या सूचनांचे निरसन केले. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाबरोबर त्याच्या आहार व आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.तसेच विद्यालयाचे सन्माननीय सदस्य पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समन्वय असेल तर निश्चितच गुणवत्ता वाढेल असे सांगितले .या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब गाढवे, अण्णासाहेब कोते,दादासाहेब गाढवे, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनीताताई सोपानराव कासार, सोपान काका कासार, रांजणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गाढवे ,मुख्याध्यापक श्री वसावे के के सर,गुरुकुल संघाचे उपाध्यक्ष वाल्मीकभाऊ गाढवे ,चंद्रकांत घोगळ, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ पाटील गाढवे उपस्थित होते.
 कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना श्रीमती उंडे मॅडम यांनी मांडली. आभार प्रदर्शन सौ पिलगर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुकुल विभाग प्रमुख कैलास भोये सर  व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...