सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

दिपिकाबाई पिपाडा यांचे मरणोत्तर नेत्रदान साईयोग फाऊंडेशनची वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली......

दिपिकाबाई पिपाडा यांचे मरणोत्तर नेत्रदान 
साईयोग फाऊंडेशनची वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली......

राहाता येथील साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या मातोश्री दिपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचे शनिवारी सकाळी ११.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मरणोत्तर त्यांचे प्रवरा हॉस्पिटलच्या नेत्रपेठीला नेत्रदान करण्यात आले.तसेच अंत्यसंस्कार नंतर आज रविवारी सकाळी रक्षा नदीत विसर्जित न करता राहाता खटकळी परिसरात साईयोग फाउंडेशनद्वारे खड्यांमध्ये टाकून त्यात वृक्षारोपण केले.त्यांच्या स्मरणार्थ साईयोग फाउंडेशनने १० ते १२ फुटांचे वड,पिंपळ,रेनट्री इत्यादी दहा वृक्षांचे त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते रोपण करून एक अनोख्या पद्धतीने वृक्षरोपणरुपी श्रद्धांजली अर्पण केली.साईयोग फाउंडेशन गेली पाच वर्षांपासून सदस्यांच्या नातेवाईकांचे पर्यावरण रक्षणार्थ अस्थी विसर्जन शक्य तेव्हा अश्या तऱ्हेने वृक्षारोपण करून करत आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य दशरथ तुपे यांनी मनोज पिपाडा यांच्या वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्याचा उहापोह करत साईयोग फाऊंडेशनला मोलाचे सहकार्य असल्याचे नमूद केले.राहाता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा यांनी उपक्रमाचे कौतुक केले.साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनीही वृक्षारोण करून कै.दिपिकाबाई यांच्या स्मृती जतन केल्याबद्दल पिपाडा कुटुंबीयांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.तसेच समाजाने यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.शेवटी मनोज पिपाडा यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी राहाता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा,जवाहरलाल पिपाडा,पंकज पिपाडा,मनोज पिपाडा,सुशील पिपाडा,दिलीप पिपाडा,गौरव पिपाडा,भूषण छाजेड,रवींद्र बोठे,गोरख दंडवते,भाऊसाहेब बनकर,मोहन तांबे,पांडुरंग गायकवाड,संदीप डांगे,ज्ञानेश्वर आरणे,उमेश लुटे,बबलू फटांगरे,रवींद्र धस,नारायण गाडेकर,संजय गोयर,योगेश वैराळ,प्रसाद लांडगे,प्रसाद बनकर,रवी निकाळे,प्रमोद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...