पालक - शिक्षक - विद्यार्थी सहविचार सभा संपन्न
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाखेमध्ये दिनांक दहा डिसेंबर वार मंगळवार रोजी पालक शिक्षक विद्यार्थी सहविचार सभा संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पांडुरंग गाढवे यांनी विद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी पालक भेटीवर भर दिला पाहिजे व पालकांना विद्यालयातील उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे असे सुचवले. विद्यालयांमध्ये विद्यार्थी संस्कारक्षम बनण्यासाठी पालक शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले , यावेळी प्रभारी पर्यवेक्षक श्री तनपुरे बी एफ यांनी विद्यालयातील ओपन हाऊस उपक्रमाची व प्रथम सत्र परीक्षेतील निकालाचे वाचन करून दाखवले.विद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती पालकांना सांगितली. याप्रसंगी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल काका गाढवे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विद्यालयांमध्ये विद्यालयाच्या शिस्तीचे काटेकोर पालन करावे वगुरुजनांचा आदर केला पाहिजे तसेच मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या भविष्याचा विचार करून नियमित अभ्यास करावा असे सांगितले. समाजामध्ये वावरताना रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी अष्टपैलू दिसला पाहिजे तो संस्कारक्षम असला पाहिजे यासाठी ही जबाबदारी जशी शिक्षकांची आहे तशी पालक आणि आपली आहे असे सांगितले. रांजणगावच्या सरपंच सुनीताताई कासार यांनी पालकांनी आपल्या मुलामुलींना मित्रत्वाप्रमाने समजून मुलांच्या अभ्यास व वर्तनाची चौकशी करायला विद्यालयात येऊन चौकशी करायला पाहिजे असे आवाहन केले.यावेळी पालकामधून महेश आहेर, सुरेश तागड, वाल्मीक गाढवे, लक्ष्मण भवर, श्री सातव, श्री देसाई यांनी आपले मनोगतात पुढील सूचना केल्या पालकांनी गैरहजर विद्यार्थी असेल तर त्याचे नाव वर्गाच्या ग्रुप वर पाठवणे तसेच जो विद्यार्थी खोडकर असेल अभ्यास करत नसेल शिस्तीचे पालन करत नसेल अशा विद्यार्थ्यांची माहिती पालकांना फोन करून सांगणे व वर्गाच्या ग्रुपवरही टाकणे अशा सूचना केल्या. मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी पालकांनी केलेल्या सूचनांचे निरसन केले. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाबरोबर त्याच्या आहार व आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.तसेच विद्यालयाचे सन्माननीय सदस्य पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समन्वय असेल तर निश्चितच गुणवत्ता वाढेल असे सांगितले .या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब गाढवे, अण्णासाहेब कोते,दादासाहेब गाढवे, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुनीताताई सोपानराव कासार, सोपान काका कासार, रांजणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गाढवे ,मुख्याध्यापक श्री वसावे के के सर,गुरुकुल संघाचे उपाध्यक्ष वाल्मीकभाऊ गाढवे ,चंद्रकांत घोगळ, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ पाटील गाढवे उपस्थित होते.
कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना श्रीमती उंडे मॅडम यांनी मांडली. आभार प्रदर्शन सौ पिलगर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुकुल विभाग प्रमुख कैलास भोये सर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा